आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : तन्मय केळकर
===
बाबरी प्रकरणावरील लेखमालेतील हा शेवटचा, तिसरा भाग. आधीचे दोन भाग :
भाग १ : बाबरी मशीद पाडण्यापर्यंत प्रकरण गेलंच कसं? : बाबरी मशीद प्रकरणाचा इतिहास
भाग २ : अयोध्येतील “त्या” धर्मस्थळाला ‘मशीद’ म्हणणं हा मुळात इस्लामचा अपमान…!
===
भारतात हिंदुत्ववादी चळवळी जवळपास गेल्या शतकभर सुरू आहेत. त्यांच्यावर बऱ्याचदा इस्लामद्वेषाचा व मुस्लिमद्वेषाचा आरोप केला जातो.
इस्लामद्वेष त्यांच्यामुळेच उदयाला आला अशी इतिहासाची मांडणी केली जाते. अशा चळवळी अस्तित्वातच नसत्या तर आज भारतात इस्लामद्वेष नसता असं क्षणभर मानू.
पण आजच्या घडीला जगात इतरत्र जर नजर टाकली तर असं दिसून येतं की युरोप/ अमेरिकेपासून चीनपर्यंत जगात जिथे जिथे मुस्लिम अल्पसंख्य आहेत तिथे तिथे आज इस्लामविरोधी विचार आणि चळवळी जोर धरत आहेत.
यांपैकी कित्येक देशांमध्ये शतकभर सातत्याने व संघटितपणे सुरू असलेल्या इस्लामविरोधी राजकीय चळवळी नाहीत जशा त्या भारतात आहे. तरीसुद्धा भारतासोबतच आज जगभर इस्लामविरोधी प्रवृत्ती वाढत चाललेली दिसते.
यामागील कारणांचं विश्लेषण केल्यास लक्षात येते की आज इस्लामविरोधी बनत चाललेल्या या प्रत्येक देशवासीयांची व जवळपास प्रत्येक धर्माच्या अनुयायांची कधी ना कधीतरी इस्लामी झेंड्याखाली धर्मांध हेतूने कत्तल झालेली आहे.
अशा सरेआम हिंसाचारातच साहजिकपणे धर्मस्थळांचा विध्वंससुद्धा सढळ हस्ते केला गेला.
इस्लाममध्ये परधर्मीयांची प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करण्याचा उन्माद जन्मतःच आहे. धर्मसंस्थापक मोहम्मदानेच पुरेशी लष्करी ताकद कमावल्यानंतर मक्केतील काबा मंदिरावर हल्ला करून त्यातील ३५० हून अधिक मूर्ती तोडल्या होत्या.
जसजसा इस्लाम अरबस्तानबाहेर पसरत गेला तसतशा तिथल्या मूलनिवासी संस्कृती व भाषेचा नायनाट झाला. पर्शियातली अग्नी मंदिरे विझली. तिथून परागंदा झालेले अग्निपूजक पारशी जगभर पसरले व त्यांपैकी भारतात आलेले स्थिरावले.
तुर्कीच्या राजधानीमधील म्हणजेच कॉन्स्टॅन्टिनोपल शहरातील (आजचं इस्तंबूल) Eastern Orthodox Church च्या मुख्यालयाचं रूपांतर (= Hagia Sophia = ज्ञानप्रासाद) मशिदीत केलं गेलं.
ईजिप्तची फारोहा संस्कृती व मूळ Coptic भाषा नामशेष झाली. तो संपूर्ण समाज अरबी भाषिक सुन्नी मुस्लिम बनला. लेबनॉन, सीरिया, जॉर्डन, तुर्की, पॅलेस्टाईन हे भूभाग पूर्वी 100% ख्रिस्ती होते हे आज कुणाला सांगूनही पटणार नाही.
ज्यू (यहुदी) धर्मियांच्या अनेक कत्तली शतकात वेळोवेळी झाल्या आहेत. कुराणमध्ये व मुस्लिमांच्या मनातही ज्यूंबद्दल तीव्र द्वेष असतो. तुमच्या कोणत्याही मुस्लिम मित्राला ज्यूंबद्दलचे मत विचारा.
भारतीय मुस्लिमाचा एखादा ज्यू (यहुदी) मित्र असणं किंवा एखाद्या ज्यू (यहुदी) व्यक्तीला तो ओळखत असणं/ पाहिलेलं असणं फारच दुर्मिळ. तरीही त्याच्या बोलण्यात ज्यूंबद्दल इतका विखार, द्वेष, तिरस्कार जाणवेल की जणू एखाद्या ज्यूने त्याच्या दोन्ही किडन्या पळवल्या असाव्यात.
भारतातील इस्लामी धार्मिक हिंसाचाराबद्दल जितकं लिहावं तितकं कमीच. धर्मांतर न केल्याबद्दल गुरू तेग बहाद्दूर, गुरू गोविंद सिंहांचे ४ वीर पुत्र व इतर अनेक अनेक निष्पाप शीख नागरिक मारले गेले. त्यांची स्मारकं आजसुद्धा उभी आहेत.
इस्लामी धर्मांधतेमुळे मारल्या गेलेल्या निष्पाप हिंदू/ शीख नागरिकांची यादी तर न संपणारीच आहे. सुबेग सिंघ, शानबाझ सिंघ, मणी सिंघ, काका हकीकत राय, बाबा बंदा सिंघ बहादूर अशी भली मोठी न संपणारी यादी देता येईल.
मथुरेचं श्रीकृष्ण मंदिर, वाराणसीचं विश्वेश्वर मंदिर, अयोध्येचं श्रीराम मंदिर ही हिंदूंची सर्वात पवित्र श्रद्धास्थानं तोडून तिथे मशिदी बनवण्याचं पाप मुघल बादशाहीच्या माथी आहे. ही गोष्ट छुपेपणाने झालेली नाही.
“तुम्हां काफ़िरांच्या पवित्र स्थळांचा विध्वंस करून आम्ही आमचा धर्म तुमच्यावर लादणारच” या कुराणप्रणित धर्मांधतेमुळेच दिल्लीत २६ जैन मंदिरं तोडून त्या ठिकाणी मशीद बांधली गेली व त्याला नाव दिले गेले – क़ुव्व्वत उल इस्लाम (इस्लामची शक्ती).
याच धर्मांधतेमुळे नालंदा विद्यापीठातील शतकानुशतके संचित केलेली ज्ञानसंपदा बख्तीयार खिलजीने सहा महिने जाळली व तिथल्या बौद्ध भिक्षूंच्या सरसकट कत्तली केल्या.
भारतात इतका धार्मिक विध्वंस करूनसुद्धा इथली संपूर्ण जनता इस्लामी झेंड्याखाली का आणता आली नाही याची खंतसुद्धा उर्दू शायरीतून अधुनमधुन डोकावते. एक उर्दू शायर मोहम्मद अल्ताफ़ हुसेन म्हणतो –
दिन हिजाज़ का बेबाक बेड़ा
निशाँ जिसका अक़्साई आलम में पहुंचा
गये मिस्र यूनान गये ईरान
किये पस्सी पार जिसने सातों समंदर
वह आख़िर डूबा दरिया ए गंगा में आकर
इस्लामच्या दिग्विजयी नौदलाचा ध्वज जगात दूर दूरपर्यंत पसरला. इराणला पोचला, ग्रीसमध्ये पोचला, साता समुद्रापार फडकला. पण शेवटी बुडाला तो ह्या गंगेच्या खोऱ्यात पोहोचल्यावर….
म्हणजेच, ज्यू, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, पारशी, शीख अशा जगातील जवळपास प्रत्येक धर्मानुयायांच्या कत्तली इस्लामी झेंड्याखाली केल्या गेल्या आहेत. हा सर्व इतिहास मुस्लिम इतिहासकार नाकारत नाहीत. मुस्लिमबहुल ठिकाणी या गोष्टी अभिमानाने सांगितल्या जातात. मुस्लिम अल्पसंख्य असलेल्या ठिकाणी हा इतिहास लपवण्याचा प्रयत्न होतो. (तिथेही नाकारण्याचा प्रयत्न होत नाही.)
हा सर्व इतिहास जगभरातील मुस्लिमेतर समुदायांच्या collective memory मध्ये अजूनही ताजा आहे.
हे सगळं करून सवरून वर “मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना” अशी धादांत खोटी अफवा पसरवली जाते ती वेगळीच. मग याचा परिणाम म्हणून इस्लामद्वेष अथवा मुस्लिमद्वेष वाढला तर त्यात नवल ते काय?
या सर्व हिंसाचाराचा बदला म्हणून आज हजारो मशिदी पाडल्या गेल्या पाहिजेत असं म्हणणाऱ्या बिनकामी हिंदुत्ववाद्यांपैकी किंवा इस्लामद्वेष्ट्यांपैकी मी नाही.
बाबरीसारख्या घटना पुन्हा घडल्या तर तो मुस्लिमेतर बहुसंख्यांक समुदायाचा उन्माद व झुंडशाहीच असेल. यावरील उपाय हिंसाचार नक्कीच नाही. पण मुस्लिम व मुस्लिमेतर यांच्यात फक्त भारतातच नव्हे तर जगभरात वाढत चाललेल्या तिरस्काराचा स्फोट जगाला अभूतपूर्व विनाशाकडे नेऊ शकतो हे मात्र नक्की.
हा बाँब defuse करण्यासाठी गरज आहे अप्रिय सत्याचा स्वीकार करण्याची. ते अप्रिय सत्य म्हणजे “मज़हब ही है सिखाता आपस में बैर रखना” आणि विशेषतः इस्लाममधील परधर्मद्वेष्ट्या शिकवणीमुळे झालेला हिंसाचार.
हे सत्य फक्त मुस्लिमांनाच अप्रिय नाही. तर सर्व religion सर्व बाबतीत समान आहेत आणि प्रत्येक religion इतर प्रत्येक religion चा परमादर करतो या अफवेचं बाळकडू पिऊन मोठ्या झालेल्या काफ़िरांनाही या सत्याची allergy आहे. या असत्याचा आधार घेऊन समस्या (तिरस्कार) लांबवता येईल, पण थांबवता नाही येणार.
या अप्रिय सत्याचा स्वीकार करत आपल्या पूर्वजांनी भूतकाळात केलेल्या अक्षम्य अपराधांची कबुली देत जगभर मुस्लिमांनी त्या त्या देशातील मुस्लिमेतरांची माफी मागितली पाहिजे. किमान काही संघटना किंवा काही उलेमांनी जरी अशी मने जिंकणारे कृती केली तरीही जगभर वाढणारा Islamophobia कमी होऊन दुभंगलेली मने व तिरस्कार कमी व्हायला मदत होईल.
अशा प्रकारे माफी मागणे हीसुद्धा काही नवीन संकल्पना नाही. भारतातीलच काही समुदायांनी हे केलेलं आहे. उदा. हिंदू (तथाकथित) उच्चवर्णीय.
“तुमच्या पूर्वजांनी आमच्यावर अत्याचार केले/ आमचं शोषण केलं” असा आरोप मुख्यतः २ जनसमूहांवर होतो – हिंदू उच्चवर्णीय (विशेषतः ब्राह्मण) व मुस्लिम.
यांपैकी हिंदू उच्चवर्णीयांनी आपल्या पूर्वजांचे ऐतिहासिक अपराध मान्य केले आहेत. उच्चवर्णीय कुटुंबात जन्मलेल्या अनेक विचारवंतांना आपल्या पूर्वजांनी केलेल्या ऐतिहासिक चुकांबद्दल जाणीव, स्वीकार व त्यामुळेच मनात अपराधी भावना असते. समतावादी, प्रगतिशील विचारांच्या चळवळींमध्ये तथाकथित उच्चवर्णीय कुटुंबात जन्मलेल्या नागरिकांचा लक्षणीय सहभाग असतो.
परंतु मुस्लिमांमध्ये सुशिक्षित, स्वतःला प्रगतिशील विचारवंत म्हणवणारे कोणीही आपल्या समधर्मी राज्यकर्त्यांचे ऐतिहासिक अपराध मान्य करताना व वर्तमानातील धर्मिक आक्रस्ताळेपणाला विरोध करताना दिसत नाहीत.
उलट वस्तुस्थिती नाकारण्याचा खोटारडा प्रयत्न होतो. काही वेळा तर त्या हिंसाचाराचं समर्थनही केलं जातं (खाजगीत अथवा उघडपणे). मग याचा परिणाम म्हणून इस्लामद्वेष अथवा मुस्लिमद्वेष वाढला तर त्यात नवल ते काय?
आज बाबरी विवादाच्या निमित्ताने हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या विवादित जमिनीवर मालकी कुणाची प्रस्थापित होते हा प्रश्न फक्त कायद्याचा आहे. तो न्यायालयात हाताळला जाईल. पण त्या पलीकडे जाऊन एक समाज म्हणून सिंहावलोकन व आत्मपरीक्षण होणं आवश्यक आहे.
अप्रिय सत्यापासून पाठ न फिरवता तिरस्काराच्या मुळावर घाव घालणं गरजेचं आहे.
राम मंदिराच्या या ऐतिहासिक क्षणानंतर तरी आशा करूया की अज्ञान व तिरस्काराचा अंधःकार मिटेल; बंधुता व सहिष्णुतेच्या नवप्रकाशाकडे आपण सर्व वाटचाल करू.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.