Site icon InMarathi

“मोदी चड्डी घालायचे, तेव्हा भारतात (नेहरूंमुळे) उद्योगांचं जाळं उभं राहिलं होतं”: काँग्रेसचं ‘प्रदर्शन’

exhibition-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सध्या देशातील राजकीय वातावरणाला वेगळाच रंग चढलाय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकाला दोष देण्याचे प्रसंग सततचा चर्चेचा विषय झाले आहेत. सगळ्याच राजकीय नेत्यांचा एखाद्या मोहीमेवर असल्याप्रमाणे नवनवीन मुद्दे घेऊन अव्याहतपणे टीकास्त्रांचा मारा सुरु आहे.

काही मुद्द्यांवरून समाजात संभ्रम निर्माण होतोय, काहींवरून वादही होतात. पण सगळ्यात जास्त होतेय ते मनोरंजन. रोज काहीतरी नवीन विषय आणि नवीन पद्धतीने मनोरंजन अशी काहीशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे.

याचाच एक नवीन प्रकार पुण्यात बघायला मिळाला. सोनिया गांधी यांच्या जन्मदिवसानिमित्त कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी यांनी एका प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बालगंधर्व कलादालनात कॉंग्रेसच्या काळात झालेला देशाचा विकास दाखवणारे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे आहे.

‘लय झाली मन की बात, येऊन पहा काम की बात’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे. अर्थातच या शीर्षकामुळे प्रदर्शन नक्की केलेला विकास समोर आणण्यासाठी आहे की उणेदुणे काढण्यासाठी हा प्रश्न पडतोच. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला प्रदर्शनातील काही छायाचित्रे बघून नक्कीच मिळेल.

 

प्रदर्शनाच्या प्रसिद्धीसाठीचे होर्डिंग

 

 

या प्रदर्शनाचे उदघाटन काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मिळाले ना उत्तर?

Indiaआता याला प्रत्युत्तर म्हणून कोणता नवीन चर्चेचा विषय समोर येतो आणि तो किती मनोरंजक असेल याचा विचारच  करायला नको.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version