' मुलींनो…तुमची “महत्वाकांक्षा” पूर्ण करण्यासाठी हे ८ करिअर ऑप्शन्स परफेक्ट आहेत! – InMarathi

मुलींनो…तुमची “महत्वाकांक्षा” पूर्ण करण्यासाठी हे ८ करिअर ऑप्शन्स परफेक्ट आहेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

अलीकडील काळात स्त्रियांचे जग विस्तारत चालले आहे. काळानुसार त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रात वावर वाढतोय.

पूर्वी स्त्रियांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासही पुरेसे सक्षम समजले जात नव्हते. हळू हळू आपल्या बेड्या तोडत स्त्रियांनी आपली कार्यक्षमता दाखवण्यास सुरुवात केली.

तेव्हा कुठे त्या इथवर येऊन पोहोचल्या आहेत.

सुरुवातीला जेव्हा महिला नोकरीसाठी घराबाहेर पडू लागल्या तेव्हा त्यांच्यासाठी काही ठराविक नोकऱ्याच उपलब्ध असत. स्त्रियांना हे जमणार नाही किंवा असेच काहीतरी जमते असा काहीसा संकुचित ददृष्टीकोन त्यावेळी होता.

पण आता जी क्षेत्रं फक्त पुरुषांची म्हणून समजली जात होती तिथेही महिला कार्यरत होत आहेत.

 

women-jetpiloat-inmarathi
elle.in

 

ही महिलांची कामे किंवा ही पुरुषांची कामे या विभागणीला न जुमानता आपल्याला जे जमेल, जे आवडेल ते काम करताना हल्लीच्या महिलांचा कल दिसतो.

ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे तेच निवडून मोठमोठी ध्येये निश्चित करताना आणि ती पूर्ण करताना अनेक स्त्रिया दिसतात.

असे असले तरीही काही ठराविक नोकऱ्यांमध्ये स्त्रियांना अधिक प्राधान्य दिल्याचे दिसते.

कारण स्त्रियांची व पुरुषांची कामे अशी विभागणी आपण जरी करत नसलो तरी काही क्षेत्रांत स्त्रिया अधिक सरस असल्याचे दिसते तर काही क्षेत्रात पुरुष.

कारण मानसशास्त्रीय दृष्ट्या स्त्री आणि पुरुषामध्ये जो फरक असतो त्यानुसार ते काही कामे अगदी सहज करतात.

मग अशा अंगभूत गुणांचा फायदा आपल्या प्रगतीसाठी करून घेता आला तर उत्तमच ना?

म्हणूनच आज आम्ही अशी काही क्षेत्रं सांगणार आहोत जिथे मुलींना अधिक प्राधान्य दिले जाते आणि त्यांच्या कौशाल्यानाही वाव मिळतो.

 

१. पब्लिक रिलेशन (पी.आर.)

एकाच वेळी अनेक कामे करण्यात आणि सर्वांशी जबादारीने वागण्यात स्त्रियांची बरोबरी केली जाऊ शकत नाही हे तर मानसशास्त्रानेही मान्य केले आहे.

नेमकी हीच कौशल्य कोणताही व्यवसाय मोठा करण्यासाठी लागतात. लोकांशी अधिकाधिक आणि चांगले संबंध सांभाळणे खूप आवश्यक असते.

 

women-complaint-inmarathi
www.shutterstock.com

 

अशावेळी जर जनसंपर्क सांभाळणारी व्यक्ती स्त्री असेल तर नक्कीच तिच्या या गुणांचा खूप फायदा होतो.

त्यामुळेच हल्ली पब्लिक रिलेशन मॅनेजरची नोकरी स्त्री उमेदवाराला देण्याकडे अनेक कंपन्यांचा कल असतो.

 

२. डीझाइनिंग

स्त्रियांच्या कपडे आणि अलंकारांबद्द्लच्या आवडीविषयी नव्याने बोलायला नको. जवळपास सगळ्याच स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि कपडे सतत खरेदी करत असतात.

त्यामूळे आपसूकच त्यांचे त्याबाबतचे ज्ञान अधिक असते.

याच ज्ञानाचा उपयोग नवीन उत्पादन डीझाइन करताना झाला तर विक्री निश्चित असते.

 

fashion designing inmarathi
shilpaahuja.com

 

म्हणूनच विविध उत्पादने बनवणाऱ्या कंपनी डीझाइनर म्हणून स्त्रीयांना प्राधान्य देतात.

 

३. कौन्सेलर

हल्ली विविध क्षेत्रात कौन्सेलरची गरज भासते. शाळा, कोलेज, कंपनीज, हॉस्पिटल्स सगळीकडेच कौन्सेलर असतात. इतरांच्या समस्या जाणून घेणे, त्यांना अधिक कार्यक्षम होण्यास प्रोत्साहन देणे, धीर देणे अशा प्रकारचे काम हे कौन्सेलर करतात.

ते करताना समोरच्याला तुमच्याबद्दल विश्वास वाटणे आणि मन मोकळे करण्याची इच्छा होणे आवश्यक असते.

 

Meaning of 24 spokes of Ashok Chakra.Inmarathi1
psychologytoday.com

 

असा संवेदनशीलपणा स्त्रियांमध्ये आपसूकच असतो. शिवाय शांततेत ऐकून घेत सांत्वन करणेही त्यांना उत्तम जमते. त्यामुळेच या क्षेत्रात त्यांची संख्या वाढतेय.

 

४. अकाऊंटंट/फायनान्स

सततच्या कौटुंबिक जबाबदारीमुळे चोख हिशोब ठेवण्याची आणि योग्य आर्थिक नियोजनाची सवय प्रत्येक स्त्रीला असते. त्यामुळे त्या मोठे व्यवहारही अतिशय योग्य प्रकारे हाताळू शकतात.

म्हणूनच बँक आणि फायनान्स क्षेत्रात स्त्रियांना बराच वाव आहे.

 

bank-inmarathi
Livemint.com

 

५. एयर होस्टेस

या नोकरीला एक वेगळेच वलय आहे. इथे फक्त सौंदर्य महत्त्वाचे आहे असा अनेकांचा समाज असतो. पण एयर होस्टेसची नोकरी तितकीशी सोपी नसते.

त्यासाठी खूप संयम, त्याग आणि लोकांची काळजी घेण्याची सवय असावी लागते. वेळप्रसंगी धाडसही दाखवावे लागते.

 

Air hostes-inmarathi01
wikipedia.org

 

थोडक्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे गुण आणि सौंदर्य यांचा मिलाफ असणे गरजेचे असते. तो पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये अधिक दिसतो. म्हणून तर एयर होस्टेस स्त्रिया असण्यावर अधिक भर दिला जातो.

६. कस्टमर केयर/ रिसेप्शन

या नोकरीत सतत खूप प्रश्न आणि वैतागलेल्या लोकांना तोंड द्यावे लागते. वेळप्रसंगी खूप सुनावलेही जाते. पण तिथे नोकरी करणारी व्यक्ती त्या संपूर्ण कंपनी किंवा उद्योगाचे प्रतिनिधित्व करत असते.

त्यामुळे अजिबात वैतागून न जाता, सतत हसतमुखाने सर्वांच्या समस्या ऐकत समाधानकारक उत्तरे देणे गरजेचे असते.

 

women-inmarathi
officechai.com

 

अर्थातच हेच काम कुटुंबात सुद्धा करावे लागत असल्याने महिला यात तरबेज असतात. म्हणून तर कुठेही जा हसतमुखाने स्वागत करणारी एखादी स्त्री आपल्याला भेटतेच भेटते.

 

७. जाहिरात आणि मनोरंजन

टी.व्ही., सिनेमे, जाहिराती सगळीकडेच नवनवीन चेहरे झळकताना दिसताना. सगळ्याच भाषांमधल्या इंडस्ट्रीचा व्याप प्रचंड वाढला आहे.

हे क्षेत्र फक्त सिनेम्यांपुरते मर्यादित न राहता मालिका, मनोरंजक कार्यक्रम, जाहिरात, मॉडेलिंग, सूत्रसंचालन असे विस्तारले गेलेय.

परिणामी योग्य संभाषण कौशल्ये आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असणाऱ्या लोकांचीही जास्त गरज भासते. त्यामुळे इथे स्त्रियांना त्यांची कौशल्ये दाखवण्याची संधी मिळतेच मिळते.

 

Film-Production-inmarathi
premiumbeat.com

 

८. नर्सिंग

स्त्रिया पूर्वापार सेवा सुश्रुषा करत आल्या आहेत. मग ते स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेणे असो वा नातेवाईकांची. पूर्वी त्यांना ते बंधनकारक असत. त्यातच त्या मग्न असत.

आता मात्र परिस्थिती बदलली आहे. त्या नोकरीसाठी बाहेर पडतात. पण तरीही आजारी व वृद्ध लोकांसाठी सेवा सुश्रुषा करण्यासाठी कुणाचीतरी गरज भासतेच.

त्यामुळे ज्यांना अशी सेवा करण्यात रस आहे अशा मुली त्यांचा करियर ऑप्शन म्हणून याकडे बघू शकतात.

 

nurse inmarathi
nursehow.blogspot.in

 

या सर्व नोकऱ्या मुली अत्यंत उत्तम प्रकारे करू शकतात. शिवाय त्यांच्यातील कौशल्यांमुळे त्यांना या क्षेत्रांत प्राधान्यही आहे.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?