दिवसाला लाखोंची पोटं भरणारी, ही आहेत देशातली काही मोठी “स्वयंपाकघरे”!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपला भारत देश हा खाण्यापिण्याच्या बाबतीत जगप्रसिद्ध आहे. भारतीय खाद्यसंस्कृती असावी तर ती भारतासारखी असा भारताचा जगभर नावलौकिक आहे. भारतातील विविध राज्यांची, प्रदेशांची स्वत:ची अशी खास खाद्यवैशिष्ट्ये आहेत.
विविध राज्यांतील आणि प्रदेशांतील या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याचे सर्वोत्तम ठिकाण म्हणजे त्या त्या राज्यातील व प्रदेशातील मंदिरे!
भारतात जेवढी मोठमोठी मंदिरे आहेत ती येणाऱ्या भाविकांना दरोरोज महाप्रसाद देतात. महाप्रसाद म्हणजे पंचपक्वान्नांनी युक्त जेवणचं असते.
असे जेवण ज्यात तुम्हाला त्या त्या राज्यातील किंवा प्रदेशातील अनोखे पदार्थ चाखायला मिळतात.
या मंदिरातून दिवसाला हजारो लोकांसाठी महाप्रसाद तयार केला जातो. आता हजारो लोकांसाठी जेवण बनवायचे म्हटले तर ते जेवण बनवण्यासाठी लागणारी जागा अर्थात स्वयंपाकघर देखील तितकेच प्रचंड हवे.
या मंदिरांची देखील स्वत:ची स्वतंत्र स्वयंपाकघरे आहेत. ही स्वयंपाकघरे इतकी प्रचंड मोठी असतात की क्षणभर आपण स्तब्धचं होऊन जातो. चला तर मग जाणून घेऊया या भारतातील भव्यदिव्य स्वयंपाकघरांबद्दल !!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
स्वर्ण मंदिर, अमृतसर
शीख धर्मियांच सर्वात पवित्र स्थान म्हणजे अमृतसरचं स्वर्ण मंदिर होय. या मंदिरात तयार होणारा प्रसाद जवळपास १ लाख लोकांमध्ये वाटला जातो. ‘गुरु का लंगर’ या नावाने प्रसिद्ध असणारे स्वर्ण मंदिराच्या या स्वयंपाकघराला जगातील सर्वात मोठ्या स्वयंपाकघराचा दर्जा प्राप्त आहे. मुख्य म्हणजे भाविकांना हा प्रसाद मोफत दिला जातो.
धर्मस्थळा, कर्नाटक
बाहुबलीच्या रूपातील भगवान शिवशंकरांची या मंदिरात आराधना केली जाते. धर्मस्थळाच्या या मंजुनाथ मंदिरामध्ये दिवसाला तब्बल ५० हजार लोक दर्शनासाठी येतात. आता एवढी लोकं येणार म्हणजे ती महाप्रसाद न घेतल्याशिवाय थोडी परतणार आहेत. म्हणून त्यांच्यासाठी जेवण बनवण्यासाठी मंदिर संस्थांनाने उभारलेले स्वयंपाकघर अतिशय प्रचंड आहे.
शिर्डी, महाराष्ट्र
शिर्डीबदल आपणा सर्वांनाच माहिती आहे. तुमच्यापैकी काही जणांना शिर्डी मंदिराचे भव्य स्वयंपाकघर पाहण्याचा योग देखील आला असेल. तेथील लगबग पाहण्यासारखी असते. साईबाबांच्या दर्शनासाठी दर दिवसाला येणाऱ्या ४० हजार भाविकांसाठी इथे रोज महाप्रसाद बनवला जातो.
ISKON मंदिर
भारतातील हे एक असे मंदिर आहे जेथे दरोरोज जगभरातून भाविक येतात. या जगभरातून येणाऱ्या भाविकांसाठी रोज मंदिरातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. जन्माष्टमीच्या दिवशी तर महाप्रसाद तब्बल तीन पट जास्त बनवला जातो. हेच कारण आहे की या मंदिराचे स्वयंपाकघर ISKON मंदिरापेक्षा देखील मोठे आहे.
जगन्नाथ मंदिर, पुरी
पुरीच्या जगन्नाथ मंदिरामध्ये दर दिवसाला प्रसादाच्या रूपामध्ये ५६ प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जातात. भगवान जगन्नाथाला नैवेद्य दाखवल्यानंतर हे ५६ खाद्यपदार्थ भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटले जातात. इतके पदार्थ बनवण्यासाठी उपयोगी येते जगन्नाथ मंदिराचे अतिभव्य स्वयंपाकघर !
अजून काही मोठ्या मंदिरांच्या प्रचंड स्वयंपाकघरांबद्दल तुम्हालाही माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा !
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.