Site icon InMarathi

“कुठवर रडाल ब्राह्मणांनो?”

brahmin-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आहे. कालपासून त्याबद्दल चर्चा झडताहेत. त्यावर काही ठराविक प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. त्यातल्या बहुतांशी सो कॉल्ड पांढरपेशी ब्राह्मण समाजाकडुन बघायला मिळालेल्या प्रतिक्रिया अश्या आहेत :

आपला दबाव गट तयार करायला हवा,

This country has no future,

माझ्या मुलांना मी विदेशात पाठविलं की मी ह्या Hypocrite देशात सुखाने मरायला मोकळा,

आता ब्रेन ड्रेन वाढेल,

ब्राह्मण वर्गाने देखील आरक्षण मागावे,

एक ब्राह्मण मुख्यमंत्रीच ब्राह्मणांच्या जीवावर उठला आहे,

आता आमच्या वाट्याला केवळ ३२% जागाच उरल्या आहेत

वगैरे वगैरे.

तार्किक दृष्टया सगळे मुद्दे वरवर अचुक वाटतात. पण व्यावहारिक दृष्टया विचार केला तर त्या कितपत लागू होतात ह्याचा विचार तुम्ही केलाय?

महाराष्ट्राचा विचार केला तर आज किती ब्राह्मण राजकीय आणि सामाजिक दृष्टया संघटित आहे? तुमच्या व्होट बँक आहेत का की तुम्हाला कुठलंही सरकार/पक्ष विचारणार आहे?

 

connectedtoindia.com

राजकीय जाऊ देत किती ब्राह्मणांना पांढरपेशा स्वभाव सोडुन थेट राजकारणात करिअर म्हणून उतरावंस वाटतं? का समाजाला आणि भारताला शिव्या देता ना मग आजुबाजुला झालेला कचरा साफ करायला हात का धजवत नाही तुमचे?

भारत देश सोडुन जाणार किंवा ब्रेन ड्रेन होणार असं म्हणतांना तुम्हाला तुमच्या पासपोर्टची जागतिक स्तरावरील किंमत माहिती आहे का?

आणि देश सोडुन जाणार म्हणजे कुठे जाणार? अमेरिका, युके, ऑस्ट्रेलिया, सिंगापुर की २०३० साली मुस्लिम मेजॉरिटीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आणि कायम भीतीच्या सावटाखाली वावरणाऱ्या युरोपात?

तिकडे काहीच समस्या नसतील असं वाटतं का तुम्हाला? तिकडच्या वर्णभेदी कमेंट तुम्हाला फुलांसारख्या वाटतात का?

आज तुमची मुलं परदेशात जाणं जमत नसेल तर मुंबई, पुणे किंवा फारफार तर नागपुर ह्याबाहेर जाण्याचा विचार करत नाहीत, तुमच्या मुली PCMC मध्ये राहत असतील हिंजवडीत नोकरी करत असतील तर मगरपट्टा-हडपसर भागातील स्थळं सर्रास नाकारतात कारण त्यांना कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायचंच नसतं.

 

glassdoor.com

ह्या सगळ्या गोष्टींचा जरा थंड डोक्याने विचार करूयात का? जे ब्राह्मण लोक आधीच देशाबाहेर गेले आहेत त्यांचं जाऊ देत पण जे देशात आहेत त्यांनी मात्र जरूर विचार करावा.

माझी माझ्या कर्मावर प्रचंड श्रद्धा आहे. बोर्डात आणि CET त चांगले मार्क पडून सुद्धा अभियांत्रिकीला चांगलं महाविद्यालय आणि चांगली शाखा हे कॉम्बिनेशन काही मिळत नव्हतं. तेंव्हा मी आणि माझा मित्र Vikram दोघांनीही सरळ डिप्लोमा ला प्रवेश घेतला. त्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आमचे बोर्ड आणि CET चे गुण बघुन म्हणाल्या होत्या.

“You are taking worst decision of your life, पॉलिटेक्निक करून अभियांत्रिकीला जाणाऱ्या मुलांची संख्या केवळ २ टक्के असते आणि पुढे अभियांत्रिकी झाल्यावर कॅम्पस प्लेसमेंट होणाऱ्या डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांची संख्या ०.५% असते”

तरीही आम्ही मागे हटलो नाही ह्यासाठी मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या शिव्या देखील खाल्ल्या. डंके की चोटपर अभियांत्रिकीला प्रवेश घेतला, आणि त्याच डंके की चोटपर कॅम्पस मध्ये सिलेक्शन देखील मिळवुन दाखविलं.

ह्या सगळ्यात कुठे मला आरक्षण किंवा माझी जात आड आली नाही. शिक्षण पूर्ण केल्यावर जॉईनिंग डेट यायच्या आधी वर्षभर वेब डेव्हलपमेंटचे वर्कशॉप घेतले.

 

Gensofts.com

पैसे किती मिळाले हा भाग वेगळा पण त्यात कुठेही आरक्षणाची गरज पडली नाही. कंपनीत जॉईन झालो तेही हट्टाने मागुन महाराष्ट्राच्या बाहेर सुदूर चेन्नई सारख्या अत्यंत कठीण शहरात. तिकडुन हट्टाने कोच्ची मध्ये प्रोजेक्ट मागुन घेतलं. तिकडे आरक्षण आड आलं नाही.

प्रांतिक आणि भाषीय राजकारण मात्र फार मोठा अडथळा होता.

आपल्याच तोंडावर ऑफिस मधले लोक त्यांच्या भाषेत आपल्या विरुद्ध राजकारण करायचे पण समजायचं नाही. त्यावर उपाय म्हणून स्थानिक संघ स्वयंसेवक बंधु मदतीला आले.

स्थानिक भाषा शिकलो, आपल्या विरुद्ध होणारे राजकारण कळु लागले, मग काय उतरलो त्या गलिच्छ गटारात आणि त्यांच्या प्रदेशात त्यांना त्यांच्याच राजकारणात चितपट करत बराच मोठा पल्ला गाठला.

आजवर इतका मान मिळविला आहे की गल्फमधला सगळ्यात यशस्वी कन्सल्टंट पैकी एक आणि कितीही Escalation असलं तरी शांत डोक्याने ते तडीस नेणारा ही माझी ख्याती आहे.

 

rjgeib.com

स्वतःचीच प्रशंसा किंवा लाल करून घेणं म्हणून नाही पण सांगण्याचं तात्पर्य हे की ह्यात कुठेही आरक्षण आड आलं नाही. माझे अनेक ब्राह्मण मित्र हेच काम स्वतःला सिद्ध करत विविध क्षेत्रात जगाच्या विविध कानाकोपऱ्यात करत आहेत त्यांना आरक्षण आड आलं नाही.

किती ब्राह्मण युवक आज मुंबई पुण्याच्या बाहेर ह्या गोष्टींचा विचार करणार आहे? डॉक्टर, इंजिनीयर, CA, MBA ह्याच्याबाहेर विचार करणार आहे?

AI, IOT बूम मध्ये येत असतांना, जगभरातील कंपनी त्यांच्या सपोर्ट काँट्रॅकक्ट वर पुनर्विचार करण्याचं धोरण राबवत असतांना अजुन किती वर्ष IT च्या भरवशावर ऑनसाईटची स्वप्न बघत पुण्यात हिंजवडीच्या ODC त स्वतःवर कुढत बसणार आहेत?

किती दिवस पब मध्ये जाऊन, पिज्जा खाऊन एका जाण्यात २-२ दोन हजाराच्या नोटा बरबाद करणार आहेत? तो पिज्जा खातांना कधीतरी विचार मनात आला का की Jubilant Group चे शेअर्स तुमच्या अभियांत्रिकी ते आजपर्यंत किती टक्के वाढले?

 

 

तेच २ हजार चार वर्षांपूर्वी गुंतविले असते तर आज त्याचे किती पट झाले असते?

भूतानमध्ये आज Book my show सारखं ऍप तुम्ही डेव्हलप केलं तर ते त्या देशातील पाहिलं ऍप ठरेल आणि त्याला तिथल्या राजाचं इतकं बॅकिंग असेल की तुम्ही ते तिथल्या सरकार ला विकू देखील शकाल, किती कमवू शकाल ह्याची कल्पना आहे का कुणाला?

आज केरळ, ओरिसा ह्या सारख्या छोट्या राज्यात IT आणि infra बूम होतंय किती मराठी ब्राह्मण तिकडे जायला तयार आहेत?

कदाचित हाताच्या बोटावर मोजण्या इतपत. सुदैवाने आजच्या ब्राह्मणांसारखा विचार पेशव्यांनी केला नाही, नाहीतर शनवारवाड्याच्या बाहेर पडून दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न सत्यात उतरविण्याची धमक राऊंमध्ये आलीच नसती.

मागे एक स्थळ आलं होतं तेंव्हा मुलीच्या वडिलांनी प्रश्न केला की भारतात वापस आल्यावर पुण्यात स्थायिक होणार का तुम्ही? मी कारण विचारलं तर म्हणाले नाही गल्फ मध्ये मुली सुरक्षित नसतात ना?

 

shutterstock.com

आणि पुणे म्हणजे कसं १२-१४ तासांत नागपूर टच आणि मराठमोळं वातावरण, संस्कार! मी म्हटलं काका तुम्हाला खात्री आहे की पुण्यात तुमची मुलगी सुरक्षित आहे? आणि ‘टच’च म्हणाल तर मी नागपूरला ६ तासात टच होतो, संस्कार काय तुम्ही लहानपणी जे तुमच्या पाल्यांवर कराल त्यावर तुमचा विश्वास नको का?

काकांना मी उर्मट वाटलो असेन पण परत काही त्यांचा फोन मला आला नाही.

सांगण्याचं तात्पर्य रडणाऱ्या व्यक्तीला कोणी भीक देत नाही, मेहनतीने कमवायला शिका, कुणाच्या बापात किंवा आरक्षणात दम नाही की तुमच्या बुद्धिचातुर्याला अडवू शकेल. जमल्यास विचार करा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version