Site icon InMarathi

चूल- मूल, मातृत्व-करिअर: स्त्रियांसमोरील प्रश्नांना ठोसे लावणारी मेरी कॉम प्रत्येक स्त्रीने समजून घ्यायला हवी!

mery kom inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

लेखिका : रुपाली पारखे- देशिंगकर

उत्तरेला नागालँड, दक्षिणेला मिझोरम, पश्चिमेला आसाम आणि उत्तरेला म्यानमार [ बर्मा ] अश्या भौगोलिक परिस्थितीत असलेल्या २२,३२७ स्क्वेअर किलोमीटर्सच्या प्रदेशात गर्द हिरवाईत विसावलेल्या मौल्यवान मण्याबद्दल अर्थात भारताच्या मणिपूर रत्नाबद्दल आज लिहिताना उर अभिमानाने भरून आलाय.

१९७२ साली जन्माला आलेल्या या लहानशा राज्याने देशाला एक अद्वितीय रत्न दिलंय.

या रत्नाचं नाव आहे चुंगनेईयाँग मेरी कोम मांगते उर्फ मॅग्निफिसंट मेरी, अर्थात एम सी मेरी कोम.

 

 

ग्रामीण मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यातल्या मोइरांग लामखाई भागातल्या कांगाथेई गावात मांगते तोंपा कोम आणि मांगते अखाम कोम या अतिशय गरीब जोडप्याच्या पोटीं दोन मुली आणि एक मुलगा जन्माला आले.

या तीन मुलांमध्ये सर्वात मोठी असलेली १९८३ साली जन्माला आलेली मेरी मैदानी खेळांमध्ये प्राविण्य बाळगणारी होती.

शाळेच्या मैदानी खेळात प्राविण्य दाखवत असताना तिचं आयुष्य अतिशय सामान्य मुलांसारखं होतं.

कुळाने भात शेती कसणारे आईवडील आणि तीनही भावंडं अतिशय सामान्य अशा परिस्थतीत आयुष्य कंठत असतानाच मैदानी खेळात प्राविण्य कमावणाऱ्या मेरीला बॉक्सिंग खेळायची आवड लागली.

 

 

मात्र, या पुरुषी खेळामुळे मार लागून तिचा चेहेरा खराब होईल आणि पुढे तिचं लग्न जमायला अडचण होईल म्हणून तिच्या वडीलानी तिला हा खेळ खेळायला बंदी केली होती. तरीही मेरी लपूनछपून बॉक्सिंग शिकत होती.

आठवीनंतर मेरी पुढील शिक्षणासाठी इंफाळला आली.

दुर्दैवाने, तिथून ती दहावीची परीक्षा अनुत्तीर्ण झाली म्हणून ओपन स्कुल मधून तिने दहावी पूर्ण केलं आणि नंतर चुराचांदपूरहूनच आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

१९९८ साली मणिपूरच्या डिंकोसिंग ने बँकॉक अशियन खेळात बॉक्सिंगमध्ये जिंकलेल् या सुवर्णपदकाने मणिपूरमधल्या अनेक मुलामुलींना बॉक्सिंगकडे वळवलं हे मेरी आवर्जून सांगते.

 

 

मुळातच मेहेनती स्वभावाच्या मेरीने लपूनछपून खेळायला सुरुवात केलेल्या बॉक्सिंग खेळाने तिचं आयुष्य बदलून टाकलं.

मणिपूरच्या एम नर्जित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तिने राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा २००० साली जिंकली आणि पेपेरमध्ये नाव आल्यावर तिच्या वडिलांना याबद्दल कळलं.

तीन वर्षांनी त्यांचं मन वळवण्यात मेरी यशस्वी झाली आणि पूर्णवेळ बॉक्सिंग खेळ खेळायला लागली. देशभर बॉक्सिंगच्या स्पर्धाना जाता-येताना, बंगलोरच्या रेल्वे प्रवासात तिचं सामान चोरीला गेलं.

आणि त्याच प्रवासात तिची ओळख तिच्या भावी पतीशी झाली.

 

youtube.com

 

फुटबॉलपटू असलेल्या कारुंग ऑनखोलेरची मेरीशी पुन्हा दिल्लीत भेट झाली.

ईशान्य भारत विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असलेला ऑनखोलेर उर्फ ओन्लेर दिल्ली युनिव्हर्सिटीत कायद्याचा अभ्यास करत होता. मेरी त्यावेळेस पंजाब इथे होणाऱ्या राष्ट्रीय खेळांसाठी चालली होती आणि त्याने तिला त्यासाठी मदत केली.

या मदतीचं पर्यावसान भेटीगाठी आणि प्रेमात होऊन चार वर्षांनी २००५ साली त्यांचं लग्न झालं.

हे सर्व होईपर्यंत मेरी कोम हे नाव जागतिक बॉक्सिंगच्या क्षितिजावर चमकायला लागलं होत.

लग्न होईपर्यंत मेरी ज्युनिअर गटात तीन वेळा जगज्जेती झाली होती. दोन वेळा अशियन जेती झालेली मेरी संसारातही रमत होती.

लग्नानंतर चौथ्यांदा जगज्जेती झाली आणि त्याच वेळेस ती रेचुंगवार खूपनेईवार या जुळ्या मुलांची २००७ साली पहिल्यांदा आई झाली.

 

news18.com

 

जेमतेम वर्षभर घेतलेल्या ब्रेकनंतर मेरी पुन्हा एकदा आपले बॉक्सिंग ग्लोव्ह्ज चढवून ठोसे मारायला तयार झाली आणि २००७ साली तिने पाचव्यांदा महिलांचं जागतिक विजेतेपद पटकावलं.

मेरीची ही विजययात्रा लिहायची म्हटली तर खूप मोठी आहे.

२०१२ पर्यंत तिने सहा वेळा जगज्जेतेतपदावर आपलं नाव कोरलं होतं.

जोडीला अशियन खेळ, अषियां चॅम्पिअनशिपही जिंकली होतीच.

२०१२ साली, ऑलिम्पिकच्या कास्य पदकावर आपलं नाव कोरून तिने लहानशी विश्रांती घेतली ती आपला तिसरा लेक प्रिंसच्या वेळी बाळंतपणाची रजा म्हणून.

आपला धाकटा लेक वर्षांचा व्हायच्या आत २०१४ साली तिने आपल्या अनुभवी ठोश्यांनी अशियन विजेतेपदावर आपलं नाव उमटवलेलं होतं.

२०१७अशियन चॅम्पियनशिप जिंकत, २०१८साली कॉमनवेल्थ गेम जिंकत मेरीने सर्व स्पर्धांवर नाव कोरण्याचा इतिहास घडवला.

सर्वावर कडी म्हणजे मेरीने काल नवीन इतिहास घडवलाय सहाव्यांदा जागतिक विजेतेपदावर स्वतःच नाव कोरणारी ती पहिली स्त्री झालीय.

मणिपूरच्या लहानशा खेड्यातून आलेल्या या पस्तीस वर्षीय स्त्रीने अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, खेलरत्न सारखे देशातले मानाचे पुरस्कार पटकावले आहेत.

 

Edubilla.com

 

लिम्का रेकॉर्डबुकमध्ये समाविष्ट झालेली मेरी अनेक परदेशी पुरस्कारांचे मानकरी ठरली आहे. २०१३ साले आलेलं ‘अनब्रेकेबल’ हे तिचं आत्मचरित्रं भरपूर गाजलं.

ज्यामुळे २०१४ साली तिच्या जीवनावर अभिनेत्री प्रियांका चोप्राने मेरी कोम हा चित्रपटही बनवला आहे.

अतिशय आक्रमकपणे प्रतिस्पर्ध्याला ठोसे मारणारी मेरी प्राण्यांच्या बाबतीत कोमल हृदयाची असून पेटा इंडिया ह्या प्राणी संघटनेसाठी तिने सदिच्छा दूत म्हणून काम केलंय.

मेरीला कायम वाटतं की “मुलांना शाळेत असतांनाच क्रूरता हटवण्यासाठी शिकवलं पाहिजे. आपल्याला प्राण्यांशी प्रेमाने वागणं आवश्यक आहे, कारण त्यांना आपले गरज आहे.”

अतिशय आक्रमकतेने प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडणारी मेरी कोम जेव्हा हे विधान करते तेव्हा त्यावर अनेकजण नक्कीच विचार करतात.

अशा या मेरीचा प्रतिकूल परिस्थितीत जगज्जेतेपदाला गवसणी घालण्याच्या पराक्रमाचं आणि प्रयत्नांचं कोतुक म्हणून २०१३ साली माय होम इंडियाने श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते तिला वन इंडिया अवॉर्ड देऊन सन्मानित केलं.

 

epao.com

मेरी कोम चा माय होम इंडियाला अभिमान आहे.

देशाच्या दूर ईशान्य भागातल्या राज्यांमध्ये आयुष्यभर निस्वार्थीपणे आभाळाएवढं काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय वन इंडिया अवॉर्ड च्या माध्यमातून संपूर्ण देशाला माय होम इंडियाकडून करून दिला जातो.

२०१० पासून मुंबईत सुरु झालेली वन इंडिया अवॉर्डची परंपरा २०१८ सालीही सुरू आहे.

२०१८ सालाचा माय होम इंडियाचा वन इंडिया पुरस्कार दिला गेला.

 

 

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version