“अंडा सेल” म्हणजे काय रे भाऊ? तुरुंगाच्या भिंतीमागची भयानक दुनिया थरकाप उडवते
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतात न्यायालयीन प्रक्रिया होऊन शिक्षा सुनावलेल्या गुन्हेगारांना ठेवण्यासाठी तुरुंगव्यवस्था आहेत. मध्यवर्ती कारागृह, क्षेत्रीय कारागृह प्रत्येक राज्यात आहेत. गुन्हेगाराच्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून त्याला कोणत्या तुरुंगात ठेवायची आणि किती कठोर शिक्षा द्यायची हे ठरवले जाते.
‘अंडा सेल’ हा तुरुंगवासाचा असाच सगळ्यात भयानक प्रकार. कुख्यात गुंड, अतिरेकी, दहशतवादी अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना अंडा सेलमध्ये ठेवले जाते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
अंड्याच्या आकाराची एक अंधारी खोली म्हणजे अंडा सेल. प्रकाश येण्याला थोडीही जागा नाही, त्या कोठडीत चोवीस तास आरोपीने राहायचं.
सगळे विधी तिथेच उरकायचे. जेवण वगैरेही तिथेच. या खोलीची निर्मितीच गुन्हेगाराचे मानसिक खच्चीकारण करून त्याला पुन्हा असा गुन्हा करण्याचा विचारही येणार नाही या उद्देशाने केलेली असते.
अशा जागेत राहणे किती भयानक असेल याची फक्त कल्पनाच आपण करू शकतो.
अजमल कसाब, संजय दत्त, अबू सालेम या गुन्हेगारांना अंडा सेलची शिक्षा झाल्याचे आपल्याला माहित आहे. आर्थर रोड जेलमध्ये असणाऱ्या अंडा सेलमध्ये या आरोपींना ठेवण्यात आले होते.
आर्थर जेल हे मुंबईतील सर्वात मोठे तुरुंग आहे. ह्या तुरुंगातील सर्वाधिक सुरक्षित जागा म्हणून अंडा सेल ओळखले जाते.
ह्या सेलचा आकार एखाद्या अंड्यासारखा असल्याने ह्याला अंडा सेल असे म्हणतात. ह्या सेल मध्ये अतिशय गंभीर गुन्हे करणाऱ्या कैद्यालाच ठेवले जाते. हा सेल संपूर्णपणे बॉम्बप्रूफ आहे.
ह्या सेलमध्ये एकूण नऊ खोल्या आहेत ज्या अतिशय अरुंद आहेत. ह्या सेलमध्ये वीज नाही त्यामुळे कैद्यांना अंधारातच राहावे लागते.
तसेच ह्या सेलच्या बाजूंनी इलेक्स्ट्रिक फेन्सिंग आहे तसेच ह्या सेलच्या बाहेर व आत कायम गार्डस तैनात असतात.
ह्या सेलमध्ये दहशतवादी अजमल कसाब, अबू सालेम, अबू जिंदाल,छोटा राजनचा खास माणूस गँगस्टर डी .के. राव, अबू सावंत, पत्रकार जेडे ह्यांची हत्या ज्याने केली तो मारेकरी सतीश कालिया ह्यांना डांबले आहे.
जसे मुंबईच्या आर्थर जेलमध्ये अंडा सेल आहे तसेच पुण्याच्या येरवडा जेल मध्ये सुद्धा अंडा सेल आहे.
येथे हजार स्क्वेअर फूट जागेत दोन सेक्शन्स आहेत आणि ह्यात दहा बाय दहाचे कम्पार्टमेंट्स आहेत. हा सेल १९९० साली बांधण्यात आला.
–
हे ही वाचा – काळ्या पाण्याची शिक्षा एवढी भयावह का होती? जाणून घ्या…
दहशतवादी हरजिंदर सिंग जिंदा आणि सुखदेव सिंग सुखा ह्यांना १९९२ साली फाशी देण्याच्या आधी येथे ठेवण्यात आले होते तेव्हा हे सेल बांधण्यात आले होते. ह्या दोघांनी माजी आर्मी चीफ जनरल अरुण कुमार वैद्य ह्यांची निर्घृण हत्या केली होती.
आर्मी चीफ अरुण कुमार वैद्य हे पंजाब येथील सुवर्णमंदिरात झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टारचे प्रमुख होते.
ह्या अंडा सेलमध्ये स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगी ह्याला सुद्धा ठेवण्यात आले होते.
तसेच संजय दत्तला सुद्धा १९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्ब स्फोटादरम्यान अवैधरित्या शास्त्र बाळगल्यामुळे अटक करून ह्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. अंडा सेलमध्ये सामान्यपणे कट्टर गुन्हेगारांना तसेच संशयित दहशतवाद्यांनाच ठेवले जाते.
सुरक्षेच्या कारणास्तव ह्या धोकादायक कैद्यांना इतर कैद्यांपासून वेगळे ठेवले जाते.
अरुण फेरीरा हे एक राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यांना नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून २००७ साली अटक करण्यात आली होती.
–
हे ही वाचा – अचानक बेपत्ता झालेला कॉन्स्टेबल तिहार जेलमध्ये? चित्रपटात शोभेल अशी “सत्यकथा”!
२००७ ते २०१२ ही पाच वर्षे त्यांनी तुरुंगात काढली. २०१२ साली त्यांची निर्दोष मुक्तता झाली. ते जेव्हा अंडा सेलमध्ये बंदिवासात होते तेव्हा त्यांना काय अनुभव आले हे त्यांनी Colours of The Cage: A Prison Memoir ह्या त्यांच्या पुस्तकात नमूद केले आहे.
त्या पुस्तकाचा सारांश त्यांच्याच शब्दांत –
“२८ मे ते १४ जून २००७ ह्या कालावधीत माझ्यावर गोंदियात झालेल्या नक्षली हल्ल्याशी निगडित पाच केसेस ठोकण्यात आल्या. गोंदिया व गडचिरोली ह्या भागात माओवाद्यांच्या कारवाया अखंड सुरूच असतात.
गडचिरोली आणि गोंदियाच्या काही भागात सशस्त्र नक्षलवादी लोक स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस व पॅरामिलिटरीच्या तुकड्यांशी लढतात.
ग्रामीण भागावर सत्ता मिळवून हळूहळू संपूर्ण देशावर ताबा मिळवण्याचा त्यांचा मानस आहे. महाराष्ट्रात सर्वात गरीब हीच गावे आहे हा केवळ योगायोग नाही.
ह्या लोकांनी मुद्दाम ह्या ठिकाणी विकास होऊ दिला नाही किंवा त्यांना विकास होऊच द्यायचा नाहीये कारण येथे विकास झाला तर त्यांची सत्ता संपुष्टात येईल.
माझ्यावर पाच नव्या केसेस दाखल झाल्याने मला परत पोलिसांनी तेवीस दिवसांसाठी ताब्यात घेतले. मला गोंदियाजवळच्या आमगाव येथील पोलीस स्थानकात हलवण्यात आले.
तेथे माझा छळ करण्यात आला, मला पुरेशी झोप मिळू दिली जात नव्हती तसेच माझी कठोरपणे चौकशी करण्यात येत होती.
परंतु माझ्या सुदैवाने माझी ही परिस्थिती तुलनेने बरीच म्हणावी लागेल असा छळ माझ्या दुर्दैवी सहकाऱ्यांच्या वाट्याला आला.
माझ्या दोन सहकाऱ्यांच्या गुदाशयात पोलिसांनी जबरदस्तीने २० मिली पेट्रोल सोडले.
ह्याने त्यांची आतडी जळाली व त्यांना अतिशय त्रास झाला. त्यांच्या गुदद्वारातून रक्तस्त्राव झाला, त्यांना असह्य पीडा सहन करावी लागली. त्या पोलीस अधिकाऱ्याला हे ट्रेनिंग दरम्यान सांगितले गेले असावे की २० मिली पेट्रोलने माणूस मरत नाही परंतु त्याला असह्य वेदना होते.
अशोक रेड्डी ह्यांनी त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी तक्रार केली तेव्हा डॉक्टर सुद्धा पोलिसांना सामील असल्याने त्यांनी अशोक रेड्डीच्या शारीरिक त्रासाचे पाइल्स असे निदान केले.
सुदैवाने माझ्यावर ही वेळ आली नाही. पोलीस त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून प्रश्नांची यादी मिळाल्यानंतर दर दोन दिवसांनी येऊन माझी चौकशी करत असत.
मी त्यांच्या पहिल्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर ते पुढचा प्रश्न विचारत नसत आणि तिथेच माझ्यावर अत्याचार होण्यास सुरुवात होत असे.
बाजीराव बेल्ट मागवून त्याने माझ्या हातांच्या व पायांच्या तळव्यावर मारत असत. ह्या ठिकाणी जोरात मारल्याने आतून दुखापत होते, त्रास होतो परंतु ती बाहेरून दिसत नाही. आणि त्याचा पुढे अनेक दिवस,वर्षे सुद्धा त्रास होऊ शकतो.
ह्यामुळे पर्मनंट नर्व्ह डॅमेज होऊ शकते परंतु बाहेरून दुखापतीची काहीच लक्षणे दिसत नसल्याने मी ह्याविषयी तक्रार केली तरी कुणीही विश्वास ठेवला नसता.”
तर असे हे अंडा सेल म्हणजे कैद्यांसाठी भयानक शिक्षा असते. आरोपीने जर खरंच गुन्हा केला असेल तर तो अशी खडतर शिक्षा भोगण्याच्याच लायकीचा आहे.
परंतु चुकून एखाद्या निरपराध व्यक्तीला अंडा सेल मध्ये जावे लागल्यास त्याला भयंकर शारीरिक व मानसिक त्रास भोगावा लागतो. त्या व्यक्तीला ह्या अंडा सेलमधील भयानक आठवणी पुढे आयुष्यभर छळतात.
===
हे ही वाचा – कुप्रसिद्ध गुन्हेगारांसाठीच्या दक्षिण आशियातील सर्वांत मोठ्या जेलबद्दलची रंजक माहिती…
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.