Site icon InMarathi

दूरदर्शनवरील या ९ अभिनेत्रींनी कोवळ्या तरुणाईचा ‘कलिजा खलास’ केला होता!

restaurent-inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

नव्वदीचे दशक म्हणजे केबल टीव्ही चाळीतल्या जवळजवळ नव्वद टक्के घरात पोहोचलेले.

टीव्ही मालिकांची लोकप्रियता ‘सातवे आसमान पर’ वगैरे होती ते दिवस.

सास बहू टाईप टीव्ही मालिकांचा जमाना याच दरम्यान सुरू झाला. तेव्हा अशा मालिका नवीन असल्याने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घ्यायला त्यांना वेळ लागला नाही.

काही मालिका तर इतक्या लोकप्रिय झाल्या की त्या टीव्हीवर प्रक्षेपित होत असताना रस्त्यावरची गर्दी निवळायची.

आज अशा मालिका प्रौढ वर्ग वगळता पाहिल्या जात नाहीत, पण तेव्हा तरुण मुले या मालिका अगदी मन लावून बघायचे.

याच दरम्यान काही नवीन अभिनेत्रींनी छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली आणि वयात आलेल्या पोरांच्या हृदयाचा ताबा वगैरे घेतला.

युट्युब वगैरे अशी साधने तेव्हा उपलब्ध नव्हतीच. त्यामुळे जे दिसतंय ते पाहण्याशिवाय पोरांना पर्याय नव्हता.

अशात सौंदर्य आणि आकर्षकतेचं वरदान लाभलेल्या टीव्हीवरील अभिनेत्री म्हणजे कॉलेजच्या कट्ट्यावरील चर्चेचा विषय बनल्या..

त्यापैकीच काही अभिनेत्रींची या लेखात आपण आठवण काढणार आहोत..

१. श्वेता साळवे

हिप हिप हुरर्ये या मालिकेपासून श्वेता साळवे हिने आपल्या टीव्ही करिअरला सुरुवात केली.

 

MissMalini.com

 

पहिल्या मालिकेतच तिने कमालीची लोकप्रियता कमावली. त्यानंतर तिने केलेल्या प्रत्येक भूमिकेत तिचा अभिनय आणि सौंदर्य खुलतच गेले.

त्यानंतरही सिरिअल असो वा डान्स रिअॅलिटी शो, अशा माध्यमातून ती प्रेक्षकांना दिसत राहिली.

२. शमा सिकंदर

 

youtube.com

 

‘ये मेरी लाईफ ही’ मालिका आठवतीय?

तरुणांची भाषा बोलणारी, मनातल्या प्रत्येक भावना मांडणारी ही मालिका चांगलीच गाजली.

पण ही मालिका आठवताच नजरेसमोर येतो, तो निरागस शमाचा चेहरा.

शमाची ही भूमिका एका गोड आणि निष्पाप मनाच्या मुलीची होती. तिने भूमिका उत्तम साकारलीच पण शमाचा निरागस चेहरा आणि गालावरील खळी यावर सगळेच तरुण फिदा होते.

३. आमना शरीफ

 

TellyChakkar.com

 

खरंतर त्या काळात आमनाच्या अभिनयापेक्षा तिचा मालिकेतील प्रियकर सुजल आणि तिच्या रोमान्सची अधिक चर्चा व्हायची.

परंतु आमना मालिकेत अत्यंत साधी पण कमालीची आकर्षक दिसायची. त्यामुळे तिच्या सौंदर्याने तिचा वेगळाच चाहता वर्ग निर्माण केला होता.

४. उर्वशी ढोलकिया

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेने समस्त महिला वर्गाला वेड लावलेच होते. पण त्यात कोमोलिकाची एन्ट्री झाली आणि अचानक तरुणही त्या मालिकाचे चाहते झाले.

 

 

याचे कारण म्हणजे या भूमिकेत असलेल्या उर्वशी ढोलकियाचे सौंदर्य, तिचा नखरेल अंदाज, तिची केस उडवण्याची पद्धत आणि तिची एकंदर अदा.

इतर वेळी बायकांच्या मालिकांना वैतागणारा पुरुष वर्ग ही मालिका मात्र मन लावून बघत असे.

५. कविता कौशिक

हे नाव घेतले की डोळ्यासमोर पटकन कमनीय बांध्याची पण अत्यंत बिनधास्त अशी पोलीस ऑफिसर डोळ्यासमोर येते.

 

Hindustan.com

 

कविताचा अंदाज यात खूपच अनोखा होता. मालिकेत ज्याप्रमाणे या ऑफिसरसाठी कित्येक जण आपणहून अटक व्हायला असायचे तशीच स्वप्नरंजने तरुण प्रेक्षकवर्ग सुद्धा करायचा.

६. श्वेता तिवारी

 

 

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतील कोमोलीकाच्या नखरेल अदांनी सर्वांना वेद लावलेच होते.

पण याच मालिकेतील प्रेरणाच्या सध्या राहणीमानावर आणि सोज्ज्वळ स्वभावावर भाळलेले सुद्धा काही कमी नव्हते. याच भूमिकेतून श्वेता तिवारीने कित्येक चाहते कमावले.

तेंव्हापासून सुरु झालेली तिची घोडदौड आजही सुरुच आहे.

७. सुक्रिती कांदपाल

 

 

‘दिल मिल गये’ ही तरुण डॉक्टर्सची मालिका म्हणजे त्या काळात एक वेगळीच दुनिया होती. त्यांची मजा, मस्ती, चिडवा चिडवी आणि एकमेकांच्या प्रेमात पडणे. सगळेच वेगळे होते.

त्यातच भर म्हणून डॉ. रीधिमा हे पात्र.

अतिशय सुंदर पण शांत अशी ही तरुण डॉक्टर सगळ्यांच्या मनात घर करून बसली होती. तिचे लाजणे आणि नाजुकसे हास्य बघून तर प्रत्येक तरुण घायाळ होत असे.

८. शिल्पा आनंद

 

catchnews.com

 

‘दिल मिल गये’ मालिकेतील डॉ. रीधिमा हे पात्र बदलले म्हणून कित्येक तरुण निराश झाले होते. पण त्यांची ही निराशा शिल्पा आनंदने फार काळ टिकू दिली नाही.

सुक्रितीची भूमिका करून तिच्या चाहत्यांना आपलेसे करणे तसे कठीणच होते. परंतु शिल्पानेही स्वतःचे सौंदर्य, अभिनय आणि अनोख्या अंदाजाने लवकरच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

९. अनिता हसनंदानी

 

news18.com

 

‘कभी सौतन कभी सहेली’ मध्ये २००१ मध्ये अनिताने सर्वांची माने जिंकली होती. तिचे सौंदर्य आजवर टिकून आहे.

आजही वेगवेगळ्या टी व्ही शोज आणि मालिकांमधून तिच्या सौंदर्याचे दर्शन होते.

अशा या सुंदर आणि आकार्षक अभिनेत्रींनी सर्व तरुणांच्या मनावर गारुड केले होते.

अशाच अजून चीरतरुण अभिनेत्रींची तुम्हाला आठवण झाली तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version