Site icon InMarathi

तुम्ही जास्त खर्च करावा म्हणून, ‘चालूगिरी’ करत आहेत हॉटेल वाले!

Tricks Indian restaurents Inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

सर्वांनाच बाहेरचे चटपटीत खाणे आवडते. मग ते महागड्या हॉटेल मधील असो वा छोट्याशा गाड्यावरील. पण नेहमीच्या घरच्या जेवणापेक्षा वेगळ्या चवीचे चमचमीत पदार्थ खाणे सगळेच पसंत करतात.

काही लोक बदल म्हणून असे पदार्थ खातात तर काहींचा हा जवळपास रोजचाच कार्यक्रम असतो. वजन वाढतेय, आरोग्य बिघडतेय म्हणून कितीतरी लोक असे घराबाहेरील पदार्थ खाण्याचे टाळतात. पण हे चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा मात्र नेहमीच सगळ्यांना होते.

 

 

 

पण ही चव जेवढी सुखावणारी असते तेवढीच खिसा हलका करणारीही. साधी कॉफी प्यायला एखाद्या छानशा कॅफेत गेले तरीही पटकन बरेच पैसे खर्च होतात. मग विचार येतो एवढ्या पैशांत तर घरी कितीतरी वेळा कॉफी करून पिता आली असते.

कॉफीच काय इतर काहीही खायला प्यायला गेलात तरी किंमत बघुन हा विचार एकदा तरी मनात येतोच. त्यातल्या त्यात आईबरोबर गेलात तर चांगलेच सुनावले जाते.

या गोष्टी कितीही लक्षात आल्या तरी खर्च होतोच. हॉटेल्समध्ये तुम्ही जास्त खर्च करावाच म्हणून अनेक युक्त्या असतात ज्या तुमच्या लक्षात येत नाहीत. आज आम्ही या युक्त्या आणि अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्याने तुम्ही जास्तीचा खर्च टाळू शकाल.

१. मेन्यू कार्ड

प्रत्येक ठिकाणी मेन्यू कार्ड आकर्षक करण्याचा किती प्रयत्न केलेला असतो हे तुम्ही बघितलेच असेल. या कार्ड मध्ये काही पदार्थ जरा भडक रंगात किंवा रंगीत चौकटींमध्ये लिहिलेले असतात.

 

indiamart.com

यामागे आकर्षक दिसणे एवढेच कारण निश्चितच नाही. तर जास्त महाग किंवा त्यांना फायदेशीर असेच पदार्थ भडक केलेले असतात. हे करण्यामागचे कारण असे की अशाप्रकारे लिहिलेले पदार्थ आपल्या नकळत आपल्या मेंदूचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे आपला तेच पदार्थ मागवण्याचाकडे कल वाढतो.

२. पदार्थांची नावे

बऱ्याच कॅफे आणि विदेशी पदार्थ मिळणाऱ्या ठिकाणी पदार्थांच्या नावांना नात्यांची नावे दिलेली असतात. जसे की, अंकल्स पिझ्झा, मॉम्स मॅजिक केक, ग्रँडमदर्स चोकलेट. अशी नावं देण्यामागे नातेवाईकांना आदर वगैरे देण्याचा हेतू अजिबात नसतो.

 

examples.com

अशी नावे वाचताना वाचणाऱ्याच्या त्या त्या व्यक्तींसोबतच्या आठवणी जागृत होतात. त्या आठवणींत रमून व्यक्ती संवेदनशील होते व अशाच काहीतरी नावाचा पदार्थ मागवते. या युक्तीने पदार्थाचा खप २७% ने वाढत असल्याचे सिद्ध झाले आहे.

३. मेन्युची जागा

नीट लक्ष देऊन बघितल्यावर लक्षात येते की मेन्यू कार्डच्या डाव्या बाजूच्या खालील कोपऱ्यात फारसे महागडे पदार्थ नसतात. यामागे सुद्धा कारण आहे. जवळपास सगळेच या कोपऱ्यात फारसे लक्ष देत नाहीत. हा सगळ्यांकडून दुर्लक्षित केला जाणारा भाग असतो. त्यामुळे इथले पदार्थ न मागवणे हॉटेल्सच्या फायद्याचेच असते.

 

example.com

 

४. वातावरण

शांत, प्रसन्न, छान सजवलेल्या जागी बसायला कुणाला आवडत नाही? हॉटेल्सच्या सजावटीत याचीच काळजी घेतली जाते. तिथले वातावरण अत्यंत प्रसन्न वाटावे अशीच सजावट केली जाते. शिवाय त्याला छानसा सुगंध आणि संगीताचाही टच दिला जातो.

 

thehotelairport.com

 

त्यामुळे तिथे बसणे सुसह्य वाटतेच. शिवाय पैसे खर्च करताना फारसा पश्चातापही होत नाही.

५. पाणी

हल्ली सगळ्याच हॉटेल्समध्ये ‘ पाणी कोणते देऊ?’ असे विचारण्याची पद्धत आहे. पॅकेज प्युरीफाईड पाणी आणि साधे पाणी असे दोन पर्याय उपलब्ध असतात.

 

everydayhealth.com

असे विचारल्यावर साहजिकच साधे पाणी चांगले आहे की नाही अशी शंका उत्पन्न होते. शिवाय काहींना साधे नळाचे पाणी जरा जुन्या पद्धतीचेही वाटते. त्यामुळे सहसा बाटलीतलेच पाणी मागवून हॉटेल्सच्या उत्पन्नात भर घातली जाते.

६. स्पेशल मेन्यू

स्पेशल आणे, स्पेशल राहणे आणि स्पेशल खाणे कुणाला आवडत नाही? याचाच फायदा स्पेशल मेन्यू ठेवून घेतला जातो. एकतर हा मेन्यू मेन्यकार्डमध्ये न लिहिता तोंडी सांगितला जातो. किंवा मेन्यूकार्डवर असला तरी त्याची किंमत दिलेली नसते. पण काहीतरी वेगळे आणि खास असावे या समजाने किंमतीचा विचार न करता तो मागावला जातो.

 

northchina.co.uk

७. बुफे पद्धत

या पद्धतीत एक ठराविक रक्कम दिली की हवे तेवढे पदार्थ कितीही खाता येतात. आता असे काहीतरी आहे म्हटल्यावर आपण भरपूर खाऊन पैसे वसूल करू असाच विचार प्रत्येकाच्या मनात येतो. पण इथेही आपल्याला फसवण्याची युक्ती वापरली जाते. या पद्धतीत जेवणापूर्वी भरपूर सलाड, ज्यूस, सुप्स घेण्याचा आग्रह केला जातो.

 

reynolds.com

आपण स्टार्टर म्हणून हे प्रकार घेतोही. पण त्यांच्यामुळे आपली भूक कमी होते व मंदावते आणि नंतर भरपूर जेवण जातच नाही.

८. किंमत

मेन्यू कार्डमध्ये किंमती जरी दिलेल्या असल्या तरी त्यांच्यापुढे रुपयांचे चिन्ह दिले जात नाही. फक्त अंकांत किंमत दिली जाते. असे केल्याने आपण पैसे खर्च करतोय वगैरे अशी भावना होत नाही. मग खुल्या दिलाने खर्च केला जातो.

 

अशा प्रकारच्या युक्त्या वापरून हॉटेल्स ग्राहक जास्तीत जास्त खर्च कसा करतील याची सोय करतात. आपण या युक्त्या लक्षात ठेवून त्यांच्या बळी पडलो नाही तर नक्कीच बराच खर्च कमी करू शकू.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version