' इंटेरनेटच्या माध्यमातून कोणताही व्यवहार करताना ‘ह्या’ गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी! – InMarathi

इंटेरनेटच्या माध्यमातून कोणताही व्यवहार करताना ‘ह्या’ गोष्टींची खबरदारी घ्यायलाच हवी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग समजले जाते. या दोन्हीच्या मदतीने आपले जगणे अधिकाधिक सोपे करण्यासाठी संशोधकांचे सतत प्रयत्न सुरु असतात. त्यामुळेच रोज नवनवीन तांत्रिक गोष्टींचा शिरकाव आपल्या विविध कामांत होत असतो.

सुरुवातीला इंटरनेट आले, मग वेबसाटस् आणि हे जाळे वाढत जाऊन त्याने आपले जगच व्यापून टाकले. पूर्वी फक्त कॉम्पुटरवर आणि श्रीमंत लोकांनाच परवडू शकणाऱ्या या गोष्टी आता सहज मिळतात.

प्रत्येकालाच या सुविधा आपल्याकडे असाव्यात असे वाटते. जरी कुणाला असे वाटत नसेलही तरी ती काळाची गरज बनली आहे. प्रत्येक काम या सुविधांशिवाय अडून बसते.

प्रत्येक सेवा, सुविधा, व्यवसाय या अधिकाधिक अत्याधुनिक कशा होतील हा त्या त्या क्षेत्रातील लोकांचा प्रयत्न असतो.

शिवाय या धावपळीच्या जगात आपली कामे घरबसल्या, कमी वेळात, कमी श्रमात कशी होतील याकडेच सर्वांचा कल असतो. त्यामुळेच इंटरनेट आणि ऑनलाईन सुविधांचा वापर प्रचंड वाढलाय.

 

multitalent-inmarathi
humanresourcesonline.net

 

जो या सुविधांचा वापर करत नाही त्याला काळाच्या मागे समजले जाते.

पण म्हणतात ना काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवावेही लागते. तसेच या तंत्रज्ञानाचे झालेय. त्याच्यामुळे कामे जशी सोपी झालीत तसेच गैरव्यवहार करणेही तितकेच सोपे झालेय.

कारण तंत्रज्ञानाचा समाजाच्या फायद्यासाठी उपयोग व्हावा असे अनेकांना वाटते तसेच याचा दुरुपयोग स्वतःच्या फायद्यासाठी व्हावा असे वाटणारेही कमी नाहीत.

शिवाय ऑनलाईन व्यवहार करत असताना समोरून आपल्याशी कोण बोलतेय, आपण करत असलेला व्यवहार खरंच सुरक्षित आहे का हे तपासणे नेहमीच शक्य नसते. त्यामुळे यात सहजच कुणाचीही फसवणूक होऊ शकते.

असे तुमच्या बाबतीत होऊ नये असे तुम्हाला वाटते का? हो ना. मग आम्ही सांगणार आहोत ऑनलाईन व्यवहार करत असताना घ्यायच्या खबरदाऱ्या.

 

१. पायरेटेड आणि बेकायदेशीर सॉफ्टवेअर, ऍप्लिकेशन कधीही वापरू नका

डेस्कटॉप किंवा मोबाईलवर आपण अनेकदा गरज पडेल तसं नवीन ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो. ते इंस्टॉल करताना आपल्या डिव्हाईस मधल्या महत्वाच्या माहितीचा एक्सेस आपण देत असतो.

म्हणजे थोडक्यात नीट खात्री न करता परमिशन देतो.

 

apps-marathipizza
bgr.in

 

ती दिल्यावर आपल्या फोनमधील खाजगी माहिती त्या अप्लिकेशनच्या बॅकएंडला पाहता येते. या माहितीचा गैरवापर करून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सर्रास घडतात.

त्यामुळे आपल्या फोनमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये नवीन सॉफ्टवेअर घेताना ते पायरेटेड नसल्याची आणि कायदेशीर असल्याची खात्री करून घ्या.

 

२. इंटरनेटवर जे दिसेल ते सगळंच डाउनलोड करू नका

मोबाईलमध्ये इंटरनेट असणे आणि त्याला भरपूर स्पीड असणे ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही.

पुरून उरेल इतका इंटरनेट डेटा असल्यावर तर विचारूच नका, इंटरनेटवर काम करताना, सोशल साईट्सवर अनेक गोष्टी आपल्याला दिसतात ज्या आपण तत्क्षणी डाउनलोड करतो.

मोबाईलची स्पेस भरपूर असल्याने तीही काळजी नसते.

 

download-marathipizza
bestvpn.com

 

या अनावश्यक घेतलेल्या अप्लिकेशनमुळे आपला खाजगी डेटा लीक होण्याची शक्यता असते. त्यामुळे इंटरनेटवर जे दिसेल ते लगेच डाउनलोड करू नका.

 

३. ऍप्लिकेशन आणि सॉफ्टवेअर इन्स्टॉल करताना प्रत्येक नियम आणि अट व्यवस्थित वाचा.

आपण एखादं अप्लिकेशन इन्स्टॉल करतो. ते करत असताना आपल्या फोनमधली कोणती माहिती घेता येईल याची परवानगी ते ऍप्लिकेशन घेते.

ऍप्लिकेशन फंक्शन होण्यासाठी ती माहिती गरजेची असते म्हणून आपण परमिशन देतो. पण ती देताना आपण नेमकी कुठली माहिती देत आहोत हे न वाचताच परमिशन देऊन टाकतो.

 

Whatsapp feature.inmarathi1
Bgr

 

उदाहरणार्थ एखादं गेम असेल तर त्याला तुमच्या मेसेज बॉक्सचा एक्सेस कशाला हवा? या गोष्टी नियम व अटी वाचताना लक्षात येतात. त्यामुळे ते इन्स्टॉल करताना सगळे नियम लक्षपूर्वक वाचा.

 

४. अँटिव्हायरस आणि अँटीमालवेअरचा वापर करा.

मुख्यतः कम्प्युटरच्या मदतीने पैशांची देवाण घेवाण तुम्ही करत असाल तर ही गोष्ट विसरू नका. चांगल्या प्रतीचा अँटीव्हायरस तुमच्या कम्प्युटरमध्ये येणाऱ्या व्हायरस आणि मालवेअरना रोखून धरत असतो.

त्यामुळे तुमची खाजगी माहिती अबाधित राहते.

 

virus-marathipizza1

 

एखादा व्हायरस कम्प्युटरमध्ये आल्यानंतर तुमचा वैयक्तिक डेटा एक्सेस करून तो थर्ड पार्टीला पुरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे कम्प्युटर वापरून ऑनलाईन व्यवहार करत असाल तर अँटीव्हायरस आणि अँटीमालवेअरचे प्रोटेक्शन घ्यायला विसरू नका.

५. वेगवेगळ्या साईट्स साठी वेगळे पासवर्ड ठेवा

जवळपास सगळेच अगदी याउलट करतात. पासवर्ड विसरू नये किंवा प्रत्येकवेळी वेगळा पासवर्ड आठवण्याच्या फंदात पडायला नको म्हणून बरेच जण एकच पासवर्ड सगळीकडे ठेवतात.

त्यामूळे वेळही वाचतो आणि विसरण्याची भीतीही राहत नाही.

 

online-shopping-inmarathi06
diariodominho.pt

 

पण हा विचार केला जात नाही की जर आपला एक पासवर्ड क्रॅक केला तर सगळ्याच अकौंटचे लॉगीन करता येऊ शकते. म्हणजेच जरा त्रास वाचवण्याच्या नादात आपले मोठे नुकसान होऊ शकते.

त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ठिकाणी वेगळा पासवर्ड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

 

६. टू स्टेप ऑथेन्टिकेशन

हल्ली बऱ्याच वेबसाईट टू स्टेप ऑथेन्टिकेशनचा वापर आपल्या सिस्टीम मध्ये करतात. खऱ्या युजर व्यतिरीक्त अजून कुणी त्याचे अकाऊंट वापरू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते.

यामध्ये लॉगीन करताना युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर वन टाईम पासवर्ड पाठवला जातो.

 

otp-inmarathi (1)
msg91.com

 

तो पासवर्ड टाकला तरच अकाऊंट वापरता येऊ शकते. यामुळे युजरच्या अपरोक्ष त्याचा पासवर्ड कुणी वापरला तरीही त्याचा फारसा फायदा होत नाही.

 

७. वर्च्युअल की-बोर्डचा वापर करा

बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहार करताना बँकेने उपलब्ध करून दिलेल्या वर्च्युअल की-बोर्डचाच वापर करा.

जरी तुमच्या कॉम्पुटरमध्ये व्हायरस असेल तरी या की-बोर्डवरून पासवर्ड आणि इतर माहिती लीक होत नाही. पण जर तुम्ही तुमचा कीबोर्ड वापरला तर त्यावरून व्हायरसला पासवर्ड सहज लीक करता येऊ शकतो.

 

5 dot.marathipizza.2
store.storeimages.cdn-apple.com

याव्यतिरीक्तही अजून काही अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या ऑनलाईन व्यवहार करत असताना लक्षात ठेवायला हव्यात.

  • कधीही तुमच्या ए. टी. एम. कार्डचा सी. व्ही. व्ही. कोड, पासवर्ड, एक्सपायरी आणि इतर माहिती कुणाशीही शेयर करु नका.
  • आपल्या पासवर्ड, युजरनेम आणि इतर माहिती बद्दल कुणालाही फोन किंवा मेसेजवरून माहिती देऊ नका.
  • सेक्युअर असलेल्या वेबसाईट वरूनच आर्थिक आणि इतर महत्त्वाचे व्यवहार करा.

ही काळजी जर तुम्ही ऑनलाईन  व्यवहार करताना घेतली तर नक्कीच फसवणूक टाळू शकता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?