आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
उत्तम क्षमतेच्या कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपमध्ये सहसा इंटेलचा प्रोसेसर असतो आणि प्रोसेसर निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये इंटेलच जगप्रसिद्ध आहे हे देखील आपण जाणतोच! पण Intel Core i3, i5, i7 आणि i9 यांसारख्या त्यांच्या प्रोसेसरच्या नावांमुळे बहुधा ग्राहक बुचकळ्यात पडतात. मुख्य म्हणजे त्यांना यातला फरकच माहीत नसतो. तुम्हाला देखील यामधला नेमका फरक माहीत नसेल. चला तर मग आज जाणून घेऊया या तीन प्रकारच्या प्रोसेसरमधला मुलभूत फरक !
पूर्वी CPU power त्याच्या वेगावर मोजली जायची. म्हणजे CPU जेवढा फास्ट तेवढी त्याची power जास्त असे मानले जायचे. पण हे साफ खोटे होते कारण पूर्वीचे CPU जरी वेगवान असले तरी तितके powerful मुळीच नव्हते.
उदा. 3.0 GHz वर चालणारा CPU हा 2.5 GHz वर चालणाऱ्या CPU पेक्षा फास्ट चालतो, परंतु 2.5 GHz वर चालणारा CPU हा 3.0 GHz वर चालणारा CPU पेक्षा जास्त काळ उत्तम काम करून दाखवतो. हीच बाब हेरून इंटेलने CPU च्या वेगावर भर नं देता तो “किती काळ” उत्तम काम करू शकतो यावर भर देत Core या नावाने प्रोसेसर सादर केले आणि त्यांनी क्रांती घडवून आणली.
Intel Core i3, i5 i7 आणि i9 मध्ये फरक काय?
एका वाक्यात सांगायचे झाल्यास Core i7s हा Core i5s पेक्षा उत्तम आहे आणि Core i5s हा Core i3s पेक्षा उत्तम आहे.
परंतु यापुढेही एक महत्त्वाचा फरक आहे तो म्हणजे performance !
Core i3s चीप या स्वस्त आणि परवडणाऱ्या कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपमध्ये आढळतात. म्हणजे जी व्यक्ति कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपवर heavy काम करत नाही, त्यासाठी Core i3s हा उत्तम पर्याय ठरतो. Core i3s ची Cache size कमी आहे.
जी व्यक्ति कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपमध्ये heavy software किंवा games वापरतात त्यांच्या कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपमध्ये Core i5s असणे महत्त्वाचे आहे. Core i5s असणारे कॉम्प्यूटर आणि लॅपटॉप काहीसे महागडे असतात.
Core i7s हा लेटेस्ट प्रोसेसर असून तो अतिशय महागड्या कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपमध्ये आढळतो. Core i7s त्या व्यक्तींसाठी सर्वोत्तम आहे जे premier pro सारखे softwares वापरतात किंवा CPU वर ताण देणारे heavy graphics असणारे games खेळतात.
दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे Core i7 मध्ये आठ Core असतात ( Core i7 च्या सामान्य वर्जन्समध्ये मात्र चारचं Core असतात.) ज्यापैकी चार physical cores असतात तर चार logical cores असतात. Core i5 प्रोसेसरमध्ये चार Core असतात तर Core i3 मध्ये केवळ दोनच Core असतात. इंटेल प्रोसेसरमधील फरकांमधील हा एक असा फरक आहे ज्यामुळे प्रोसेसरच्या performance वर परिणाम होतो.
i9 हा प्रोसेसर आधीच्यांपेक्षा जास्त पॉवरफुल आहे, आज मार्केटमध्ये सर्वात शक्तिशाली म्हणून याच्याकडे बघितले जात आहे. यामध्ये मल्टी थ्रेडींग कपॅसिटीआणि बॅटरीची क्षमता आधीच्यांपेक्षा उत्तम आहे. प्रामुख्याने फोटो एडिटिंग, डिजिटल एडिटिंग, संगीताशी निगडित कामं यासाठी हा एक उत्तम प्रोसेसर आहे .
प्रत्येक Core हा स्वत:च एक प्रोसेसर असतो. केवळ एका Core वर तुमचा कॉम्प्यूटर आणि लॅपटॉप बेसिक काम करू शकतो, पण ते देखील एकदम slowly ! त्यामुळे एका प्रोसेसरमध्ये जास्त Core असणे म्हणजे कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपच्या power मध्ये वाढ होणे होय. म्हणजे कॉम्प्यूटर आणि लॅपटॉप hang न होता एकाचवेळी अनेक कामे सहज करू शकतात. जास्त Core असल्याने performance सोबतच कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपची speed देखील वाढते.
Core i3s मध्ये पहिल्यापासूनच Hyper-Threading ची क्षमता असते. तर Core i5sच्या काही वर्जन्समध्ये Hyper-Threading and Turbo boost दोन्ही वैशिष्ट्ये दिलेली आहेत. Core i7 चा विचार करता, यात दोन ते आठ Core Hyper-Threading, Turbo boosting and Overclocking क्षमतेसह येतात.
याच कारणामुळे Core i7 घेण्याकडे सध्या ग्राहकांचा कल वाढत आहे आणि इंटेल देखील त्याचा जोरदार प्रसार करत आहे. i9 घेणारी मंडळी देखील आहेत मात्र या दोन्हींच्या भरमसाठ किंमत पाहता सामान्य ग्राहक मात्र Core i3 वरच समाधान मानतो आहे. (Pentium देखील आता पडद्याआड चालला आहे.)
आता तुम्हाला Intel Core i3, i5, i7 आणि i9 मधील बेसिक फरक लक्षात आलाच असेल, तर मग यापुढे कॉम्प्यूटर आणि लॅपटॉपची निवड करताना अजिबात गोंधळू नका !
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.