काशिनाथ घाणेकरांच्या “कडsssक” वरूनच झाला अनिल कपूरच्या “झकाsssस” चा जन्म!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : महेश मोहन वैद्य
===
आज “डॉ. काशीनाथ घाणेकर” कोण ? म्हणून विचारणारे असे लोक आहेत भारतीय नाट्यसृष्टी आणि भारतीय चित्रपट सृष्टी यांचा इतिहास आणि नाते दोन्ही माहीत नाही.
“आणि काशीनाथ घाणेकर” च्या ट्रेलरमध्ये ‘लाल्या’ नावाचे जे पात्र घाणेकर उभे करत आहे, ते आहे ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील.
हे नाटक गाजले ते या लाल्याच्या पात्रामुळे, काशिनाथ घाणेकरांमुळे, आणि त्यांचा “कडक” म्हणण्याची स्टाईलने. काशीनाथ यांच्या निधनानंतर तो लाल्या उभा केला रमेश भाटकर यांनी.
पण इतकेच नाही, या ‘अश्रूंची झाली फुले’ च्या कथेवर एक हिंदी चित्रपट बनला, एका चाचपडत असलेल्या हिरो ला नवीन जीवदान या चित्रपटाने दिले.
एका गत हिरोला चरित्र अभिनेता म्हणूनच नाही, तर ‘अँग्री ओल्ड हिरो’ म्हणून समोर आणले आणि मराठी संगीतामधील ‘लेजंड’ यांनी पहिले आणि माझ्या माहितीनुसार एकमेव हिंदी चित्रपटाला संगीत दिले आणि गाजले पण.
तो चित्रपट होता ‘मशाल’.
हिरो होता अनिल कपूर आणि त्याने “कडक” च्या ऐवजी वापरला “झकास”….त्या नंतर त्याच्या प्रत्येक चित्रपटात हा “झकास” त्याच्या अंदाजात त्याने वापरला आहे.
चरित्र अभिनेता म्हणून नवीन जन्म झाला दिलीप कुमार यांचा आणि तो गाजलेला प्रसंग …….”ए भाय…… कोई तो मदत करो…… भाय”. नाटकात हे पात्र उभे करायचे पहिले प्रभाकरराव पणशीकर आणि नंतर मधुकर तोरडमल.
आणि संगीत दिगदर्शक होते, पंडित हृदयनाथ मंगेशकर!
“जिंदगी आ रहा हु मै”, “होली आई होली आई”, “मुझे तुम याद करना और मुझको याद आना तुम”, “फुटपाथो के हम राहने वाले” सारखी गाणी सुंदर चाली घेऊन आपल्या पुढे आली होती.
१९८४ साली हा चित्रपट रिलीज झाला होता आणि हिट पण.
एखाद्या कलाकृतीचे भाग्य कसे फळफळेल हे आपल्याला सांगता येत नाही.
शोले हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड ठरला, पण सुरवातीला हा शोले पडेल चित्रपट म्हणून समोर आला होता, समीक्षक मंडळींनी येथेच्छ धुलाई केली होती तेव्हा या चित्रपटाची हे किती जणांना माहीत आहे.
१९६६ मध्ये वसंत कानिटकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेले अश्रूंची झाली फुले या नाटकाचे पण असेच आहे.
खरे तर हे नाटक एका तत्ववादी प्रोफेसर च्या जीवनावर आधारित आहे. त्याला येणाऱ्या जीवनातील अनुभवातून तो कसा आपल्या तत्वाच्या रहस्यावरून हटतो आणि गुन्हेगारी जगतातील सम्राट होतो.
ही त्या प्रोफेसरची शोकांकिता म्हणजे हे नाटक. पण त्या प्रोफेसरचा असा उलटा प्रवास होत असतांना त्या प्रोफेसरच्या नेमका उलट प्रवास लाल्या नावाच्या एका गल्लीगुंडाचा प्रवास होतो.
तो प्रवास पण त्या प्रोफेसरच्या प्रेरणेतून आणि एकदिवस आपल्या तत्वाच्या विरोधात एकमेकांसमोर उभे राहतात हे नाट्य आहे, पण मुख्य नायक असलेला प्रोफेसरच्या या नाटकात भाव मात्र लाल्या खाऊन गेला.
प्रोफेसर बनलेले प्रभाकर पणशीकर, यांच्या समोर काशीनाथ घाणेकर यांचा लाल्या जास्त जोमाने उभा राहिला आणि या नाटकाचा अक्ष बदलला.
यानुसार दुसऱ्या संचात मधुकर तोरडमल प्रोफेसर म्हणून आणि रमेश भाटकर लाल्या म्हणून जगले.
ह्या नाटकामुळे काशीनाथ घाणेकर यांच्या कारकिर्दीला वेगळा आयाम मिळाला, काशीनाथ घाणेकरांनी ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली, त्याचा फायदा पुढे रमेश भाटकर यांना पण मिळाला, आणि ही लाल्याची भूमिका म्हणजे त्यांच्या नाट्य प्रवासातील एक मैलाचा दगड ठरला हे नक्की.
यानंतर या नाटकवर चित्रपट पण आले, अगोदर या नाटकावर एक चित्रपट आला ‘आसू बन गये फुल’. पण तो चालला नाही. नंतर म्हणजे १९८४ मध्ये काही किरकोळ बदल करत चित्रपट आला ‘मशाल’.
प्रोफेसर ऐवजी संपादक असलेला माणूस आणि शहरातील उनाड वस्तीतील एका पोराला सुधरवतो आणि शिकवून पत्रकार बनवतो. अनेक वर्षाने शहरात आल्यावर त्या पत्रकाराला आपला आदर्श असलेल्या संपादकाविरोधात उभा होतो.
वाढलेले वय आणि बैराग सारख्या चित्रपटातून खालावत जाणारी कारकीर्द सावरायला हा चित्रपट उपयोगी पडला तो दिलीप कुमार यांना.
चरित्र अभिनेता सोबतच अँग्री ओल्ड मॅन पध्द्तीच्या भूमिकेचे नवीन द्वार या ₹मुळे दिलीप कुमार यांच्या ₹करता उघडले गेले आणि ‘विधाता” सारखे चित्रपट त्याच्या नावावर जमा झाले.
अनिल कपूर याने आपल्या अभिनयाचा ठसा या चित्रपटा अगोदर ‘वह सात दिन’ आणि ‘साहेब’ या चित्रपटात उमटवला होता.
मात्र अजून चित्रपट सृष्टीत आपली पाय पक्के करू शकला नव्हता. मात्र मशाल च्या भूमिकेने त्याचे स्थान पक्के झाले. त्या नंतर त्याला मागे वळून बघावे लागले नाही.
या कथेवर आधारित बॉलिवूडमध्ये झालेले चित्रपट आणि त्यांची लोकप्रियता पाहता या नाटकाने मराठी रंगभूमीला आणि भारतीय चित्रपट सृष्टीला नवीन आयाम दिले हे नक्की.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.