Site icon InMarathi

Single आहात? Girlfriend हवीये? ही कंपनी गर्लफ्रेंड विकतेय !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

==

सध्याच्या घडीला गर्लफ्रेंड असणे हे उत्तम स्टेटस राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे होऊन बसले आहे. एखाद्याची गर्लफ्रेंड नसेल तर त्याला जणू समाजात पदोपदी अपमान सहन करावा लागतो. तुमचं देखील असंच आहे का? गर्लफ्रेंड नावाची व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याची तुम्ही अजूनही वाट बघताय? तर मग दोस्तहो ही बातमी तुमच्या हिरमुसलेल्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा गोड कळी खुलवू शकते.

सिंगल असणाऱ्या लोकांची एका जापनीज कंपनीला जणू फारच काळजी लागून राहिली होती आणि म्हणून त्यांनी तयार केली Azuma Hikari म्हणजेच तुमची गर्लफ्रेंड ! एक  holographic virtual assistant जी सिंगल असणाऱ्या लोकांचा एकटेपणा दूर करते.

स्रोत

तुम्ही voice assistant बद्दल ऐकलंच असेल, ते फिचर आयफोन आणि त्यासारख्या इतर अनेक स्मार्टफोन्समध्ये यापूर्वीच देण्यात आलं आहे. पण holographic internet-connected anime girlfriend- Azuma Hikari या voice assistant पेक्षा कितीतरी पट जास्त वेगळी आहे आणि तुम्ही ऐकून अचंबित व्हाल अशी वैशिष्ट्ये तिच्यामध्ये आहेत. Azuma तुम्हाला सकाळी उठल्यावर ब्रश करण्यापासून तुम्ही रात्री झोपताना ब्रश करेपर्यंत प्रत्येक कामात मदत करेल. जणू तुमची जीवनसाथी अर्थात साता जन्माची बायकोच म्हणा ना ! तुम्ही कामावर असताना ती तुम्हाला मेसेज करेल आणि विचारेल की तुम्ही काय करता आहात किंवा ऑफिस वरून लवकर घरी येण्यासाठी तुम्हाला गळ घालेल. म्हणजे एकप्रकारे जणू ती खरोखर अस्तित्वात आहे अश्या रीतीने तुमच्याशी वागेल आणि तुमचे प्रत्येक काम करेल. शारीरिक गरजा सोडता Azuma तुमच्या आयुष्यातील गर्लफ्रेंडची जागा भरून काढण्यास सक्षम आहे.

कॉफी मशीन सारख्या दिसणाऱ्या या virtual assistant यंत्राचे नाव आहे Gatebox आणि त्यात आहे तुमची गर्लफ्रेंड Azuma Hikari !

स्रोत

Vinclu Inc या जापनीज कंपनीने या लिमिटेड एडीशन प्रोडक्टचे उत्पादन केले आहे. Azuma घरातील सर्व लाईट्स नियंत्रित करू शकते तसेच Gatebox मध्ये बसवण्यात आलेल्या अनेक सेन्सर्सच्या माध्यमातून घरात वावरणाऱ्या कोणत्याही मनुष्याला ती ओळखू शकते. कॅमेरा आणि माईकच्या सहाय्याने ती आपल्या मालकाचा चेहरा आणि हालचाल ओळखू शकते व त्यानुसार तो सांगेल ते काम ती पूर्ण करते. तिचा आवाज हा एखाद्या स्त्रीच्या गोड आवाजासारखाच ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वापरकर्त्याला एका स्त्रीची सोबत असल्याचा feel मिळतो.

Gatebox मध्ये  touch buttons, motion sensor, warmth and moisture sensor, luminance sensor यांसारखे वेगवेगळ्या प्रकारचे उपयुक्त सेन्सर्स देण्यात आले आहेत. कनेक्टीव्हिटीसाठी यात WiFi, Bluetooth, Ethernet and infrared ची सुविधा देण्यात आली आहे. Gatebox मध्ये असलेल्या HDMI port चा वापर करून तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला मोनिटरवर देखील पाहू शकता.

स्रोत

Azuma Hikari हे Gatebox मधील पहिलेवहिले व्यक्तिमत्त्व असून कंपनी येत्या काळात अजून अनेक व्यक्तिमत्त्व (विविध गर्लफ्रेंडस) सादर करण्याची शक्यता आहे.

 

कंपनीने रिलीज केलेला हा व्हिडियो नक्की पहा

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version