' लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात, याचं कारण काय? – InMarathi

लग्नानंतर काही वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात, याचं कारण काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्नाला काही वर्ष झाली की नवरा बायकोमध्ये एक कंफर्ट लेव्हल येते. एकमेकांच्या बऱ्याचश्या गोष्टी स्विकारल्यामुळे म्हणा किंवा त्या गोष्टींची सवय झाल्याने म्हणा पण नात्यात एक सहजता आलेली असते.

आपला नवरा किंवा आपली बायको कुठल्या परिस्थितीत काय प्रतिक्रिया देईल याचा अंदाज आधीच येतो. ह्याच गोष्टीला नाते चांगले मुरले किंवा घट्ट रुजले असे म्हणतात. एकमेकांबरोबर कम्फरटेबल असलेले नवरा बायको कधी कधी काही वर्षांनी एकमेकांसारखे दिसू लागतात.

 

marriedcoupleslookalike 6 INMarathi

 

काही नवरा बायको तर इतके एकमेकांसारखे दिसू लागतात की ते बहीण भाऊ आहेत की काय असा संशय यावा! अर्थात ह्याला कारणीभूत एकमेकांची बॉडी लँग्वेज, हावभाव सवयीने एकसारखे झाल्याने सुद्धा घडू शकते.

हे केवळ बघणाऱ्याच्या नजरेतच नाही आता तर विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे की लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : जोडीदाराच्या कुठल्या गोष्टी आवडतात? – ह्या मुलीचं उत्तर नात्यांचं सुंदर दर्शन घडवतं!

==

 

marriedcoupleslookalike INMarathi

 

युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया व बोस्टन युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ पब्लिक हेल्थच्या नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार ह्याचे कारण आपल्या गुणसूत्रांमध्ये दडलेले असू शकते. हा रिसर्च करणाऱ्या एका संशोधकांच्या मते,

“जवळजवळ आत्तापर्यंत लोक आपापल्याच समाजातील किंवा ओळखीतील किंवा आसपासच्या समुदायातील लोकांशी लग्न करायचे. एकाच समाजातील लोकांचे किंवा एकाच स्थानिक समुदायाचे पूर्वज एकच असू शकतात.

अनेक पिढ्यांनी आपल्याशी मिळताजुळताच पती/पत्नी शोधण्यामुळे किंवा आपल्याच समाजातील मुलाशी/मुलीशी लग्न केल्याने एक जेनेटिक स्ट्रक्चर तयार झाले आहे. ज्यामुळे जेनेटिक्सवर परिणाम होऊ शकतो.”

 

marriedcoupleslookalike 7 INMarathi

 

हा रिपोर्ट PLOS genetics मध्ये प्रकाशित झाला होता. ह्या रिपोर्टमध्ये फ्रॅमिंगहम हार्ट स्टडीमधील (FHS ) गोऱ्या लोकांच्या तीन पिढ्यांवर संशोधन करण्यात आले होते. हे FHS संशोधन १९४८ सालापासून सुरु झाले होते.

ह्यात सुरुवातीला फ्रॅमिंगहॅम मास येथील ३० ते ६२ ह्या वयोगटातील पुरुष व स्त्रियांवर संशोधन करण्यात आले. ह्यात ह्या ८०० जोडप्यांच्या गुणसूत्रांचा अभ्यास करून त्यांचे पूर्वज कोण हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रयोगादरम्यान संशोधकांनी जर्नलमध्ये असे नमूद केले आहे की, “जोडप्यांची गुणसूत्रे अभ्यासताना आम्हाला हे लक्षात आले की उत्तर/पश्चिम युरोप, दक्षिण युरोप येथील मूळ लोक व अश्कनाझी पूर्वज असलेले लोक हे सारखेच पूर्वज असलेला पार्टनर निवडत असत.

 

rushi-kapur-nitu-inmarathi

 

परंतु उत्तर/पश्चिम व दक्षिण युरोपियन लोकांच्या नंतरच्या पिढ्यांमध्ये एंडोगॅमी म्हणजेच स्वतःच्याच टोळीतील व्यक्तीशी विवाह करणे हे उत्क्रांती दरम्यान उत्तरोत्तर कमी होत गेले.

२०१० साली युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन येथे झालेल्या एका अभ्यासानुसार असेही सिद्ध करण्यात आले की लग्नानंतर नवरा बायको काही वर्षांनी एकमेकांसारखे दिसू लागतात त्याचा जेनेटिक्सशी काही संबंध नाही.

रॉबर्ट झाजोंक ह्या मानशास्त्रज्ञांनी काही जोडप्यांचे लग्नानंतरचे फोटो व त्यांच जोडप्यांचे २५ वर्षानंतरचे काही फोटो अभ्यासले. तेव्हा त्यांना असे आढळून आले की जस जसा काळ पुढे जातो तसे नवरा बायको एकमेकांसारखे दिसू लागतात.

ह्याचे कारण नवरा बायको इतकी वर्षे एकमेकांबरोबर राहिल्याने एकमेकांचे चेहेऱ्यावरील हावभाव नकळतपणे कॉपी करतात.

 

Priya-Bapat-And-Umesh-Kamat inmarathi

 

उदाहरणार्थ एखाद्या जोडप्यातील एकाकडे चांगली विनोदबुद्धी असल्यास वर्षानुवर्षे एकत्र राहिल्याने नवरा बायको दोघांच्याही चेहेऱ्यावर तोंडाजवळील भागात लाईन्स तयार होतात.

तसेच काही संशोधकांच्या मते लोक आपल्यासारखीच चेहरेपट्टी असणारा पार्टनर निवडतात. २०१० मध्ये आलेल्या पर्सनॅलिटी अँड शोधलं सायकोलॉजी बुलेटिनच्या रिपोर्टप्रमाणे लोक आपल्यासारखीच चेहरेपट्टी असणाऱ्या लोकांकडे किंवा आपल्या आईवडिलांसारखे दिसणाऱ्या व्यक्तींकडे आकर्षित होतात.

 

marriedcoupleslookalike 3 INMarathi

 

सायकोलॉजी टुडे मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार हाच मुद्दा तपासण्यासाठी एक प्रयोग करण्यात आला. ह्या प्रयोगादरम्यान लोकांना काही मॉर्फ केलेले फोटो दाखवण्यात आले.

ह्यात त्यांना एक फोटो त्यांच्या विरुद्धलिंगी पालक व अनोळखी व्यक्ती ह्यांचा मॉर्फ करून एकत्र केलेला फोटो दाखवण्यात आला. तसेच नंतर अनोळखी व्यक्ती व त्यांचा स्वत:चा एकत्रित मॉर्फ केलेला फोटो दाखवण्यात आला.

==

हे ही वाचा : लोक आपल्या जोडीदाराला better half का म्हणतात याचे उत्तर देते ही ग्रीक दंतकथा!

==

 

marriedcoupleslookalike 4 INMarathi

 

ह्यात त्यांना कुठली व्यक्ती अधिक आकर्षित वाटते हे विचारले असल्यास त्यांनी स्वतःचा व अनोळखी व्यक्तीचा एकत्रित मॉर्फ केलेला फोटो अधिक आकर्षक वाटत असल्याचे सांगितले.

वॉटरलू येथील डेटिंग सल्लागार शॅनटल हेड म्हणतात की, “परिचित व्यक्ती किंवा गोष्ट शोधणे हा मानवी स्वभाव आहे कारण परिचित गोष्टी किंवा व्यक्ती ह्या प्रेडिक्टेबल असतात.”

शॅनटल हेड ह्यांनी सुद्धा ह्या विषयावर संशोधन केले आहे व त्यांचे संशोधन हे झाजोंक ह्यांच्या संशोधनाशी मिळतेजुळते आहे.

हेड ह्यांच्या मते लोक जेव्हा आपल्यासारखीच दिसणारी व्यक्ती बघतात तेव्हा त्यांच्या मेंदूत आपोआपच त्या व्यक्तीविषयी एक विश्वास निर्माण होतो. जे लोक आपल्या पार्टनरमध्ये विश्वासूपणा हा गुण महत्वाचा मानतात ते नकळतपणे आपल्याप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतात.

हेड ह्यांच्या मते प्रॅक्टिकली बोलायचे झाल्यास आपल्याच समाजातील किंवा समुदायातील व्यक्तीची जीवनशैली ही साधारणपणे आपल्याशी मिळतीजुळती असते. त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर आपण फिट होऊ शकतो.

 

marriedcoupleslookalike 5 INMarathi

 

आपल्याप्रमाणेच असलेली व्यक्ती शोधली की एकमेकांच्या सवयी, छंद, आवडीनिवडी जाणून घेणे, त्यांच्याशी जुळवून घेणे सोपे जाते कारण साधारणपणे जीवनशैली ही सारखीच असते.

हेड ह्यांचे असेही म्हणणे आहे की सारखेपणा असला की लोक एकमेकांकडे आकर्षिल्या जातात हे खरे असले तरी काही केसेसमध्ये “अपोजिट्स अट्रॅक्ट” हा नियम सुद्धा लागू होतो.

आपल्याकडे जे गुण नाहीत ते दुसऱ्यात बघितले की आयुष्यात बॅलन्स साधला जाईल ह्या विचारांनी दोन भिन्न आवडीनिवडी, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात. दोघे एकमेकांच्या साथीने आयुष्यातील ध्येय गाठायचा विचार करतात .

कारण काहीही असले तरी लग्नानंतर अनेक वर्षं एकत्र आयुष्य जगल्यामुळे, सुख दुःखाचे क्षण एकत्र अनुभवल्याने, एकाच प्रकारची जीवनशैली जगल्याने नवरा बायकोत एक सहजता आलेली असते. त्या दोघांची एक टीम तयार झालेली असते म्हणूनच बघणाऱ्यांना ते दोघे एकमेकांसारखेच दिसू लागतात.

ही खरं तर वैवाहिक जीवनातील यशस्वी बाब आहे, ही खूण आहे की त्या जोडप्याचे नाते आता छान मुरले आहे, घट्ट रुजले आहे.

==

हे ही वाचा : या ११ गोष्टींमध्ये समजूतदारपणा दाखवलात, तर संसार नक्कीच सुखाचा होईल…

==

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?