Site icon InMarathi

१९८६ पासून”अडगळीत” पडला प्रकल्प ४ वर्षात पूर्ण करून गडकरींनी रचलाय इतिहास..!

nitin gadkari varanasi-haldia-waterway-inauguration inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम 

===

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी ते प. बंगालमधील हल्दिया अशी गंगेतून जलवाहतूक सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हा प्रथेप्रमाणे अनेकांनी, असा देशांतर्गत जलमार्ग प्रत्यक्षात येणे कसे शक्य नाही, मोदी कसे चुकीचा विचार करीत आहेत, असा सूर लावला होता.

मात्र, केंद्र सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक – दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या अथक प्रयत्नांमुळे या जलमार्गाद्वारे वाहतूक करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.

देशांतर्गत जलवाहतुकीच्या क्षेत्रात नव्या अध्यायास सुरुवात यानिमित्ताने होणार आहे. त्याची माहिती गडकरी यांनी ट्वीट करीत दिली. यामुळे “मोदी सरकार काहीच करीत नाही” अशा धोशा लावणाऱ्या मंडळींनी विचार करण्याची गरज आहे.

 

news24.com

कारण देशातील पहिला जलमहामार्ग- वाराणसी-हल्दिया या  देशांतर्गत जलमहामार्गाची घोषणा १९८६ सालीच करण्यात आली होती. पण त्यावर पुढे कोणतीही कार्यवाही न होता हा प्रकल्प धूळ खात पडला होता.

एकाही सरकारला त्याची अंमलबजावणी करावीशी वाटली नाही.

मात्र, सत्तेत आल्यानंतर आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात मोदी सरकारने या मार्गावर जलवाहतूक सुरू करण्याची घोषणा केली. केवळ घोषणा करूनच मोदी थांबले नाही, तर नितिन गडकरी यांच्यावर विश्वासाने त्यांनी त्याची जबाबदारी टाकली.

नितीन गडकरी या व्यक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आव्हानं स्विकारायला आणि ती पूर्ण करायला आवडतात.

 

त्यामुळे या प्रकल्पाकडे त्यांनी ही जातीने लक्ष दिले. ऑगस्ट २०१६ मध्ये ट्रायल रनच्या अंतर्गत दोन मालवाहतूक जहाजांद्वारे मारूती कंपनीच्या मोटारी आणि बांधकाम साहित्याची वाहतूक करण्यात आली.

 

twitter.com

जागतिक बँकेच्या मदतीने सुमारे ५२०० कोटी रूपयांच्या खर्च यासाठी करण्यात आला आहे. टर्मिनलच्या निर्मितीमुळे आता वर्षभर मालवाहतूक जहाज या मार्गावर चालणार आहेत. यामुळे सुमारे २० हजार लोकांना रोजगारदेखील निर्माण होणार आहे.

विशेष म्हणजे घोषणेनंतर तब्बल ३२ वर्षांनी हा जलमहामार्ग मोदी सरकारने प्रत्यक्षात आणला आहे!

तर कोलकाता येथून पेप्सिको कंपनीच्या १२ कंटेनर्सना घेऊन एमव्ही आरएन टागोर ही बोट निघाली आहे. गंगेतून मजल दरमजल करीत ७ ते ८ नोव्हेंबरपर्यंत ती वाराणसी येथे पोहोचेल आणि १२ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी या बोटीचे स्वागत वाराणसी येथे करणार आहेत.

वाराणसी येथे विशेष मल्टिमॉडेल टर्मिनलदेखील विकसित करण्यात आले असून त्याच दिवशी पंतप्रधान टर्मिनल देशास अर्पण करणार आहेत.

विक्रमी वेळात या टर्मिनलची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा जलवाहतूकीस पुन्हा प्रारंभ होत असून केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पाचे हे मोठे यश आहे.

 

mapsofindia.com

या जलमहामार्गामुऴे उत्तर प्रदेशाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. हा जलमहामार्ग आणि त्यावरील टर्मिनलमुळे उत्तर प्रदेशासह अन्य राज्यांच्या औद्योगिक क्षेत्रालाही मोठा फायदा होणार आहे.

यामुळे आयात – निर्यातीसाठी नवे मार्ग मोकळे होणार आहेत. याद्वारे मालवाहतुक केल्यास रेल्वे आण रस्तेमार्गाच्या तुलनेत खर्चात तीन पटीने कपात होणार आहे.

यासोबतच देशात अन्य जलमार्गांचा विकास होण्यासही आता सुरूवात होणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version