जगात ‘IMDb’ या साईटला चित्रपट नामांकनाची सर्वोत्कृष्ट वेबसाईट का मानतात?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : मिहीर कुलकर्णी
===
असा कोणता Unix किंवा C प्रोग्रॅम आहे का ज्यामध्ये ऍक्टर आणि ऍक्टरसेसचा डेटा मिळू शकेल? म्हणजे एखाद्या अभिनेत्याचं नाव टाईप केलं की त्याने केलेल्या सगळ्या फिल्म्स ची एक लिस्ट दिसेल,
असा कोणता प्रोग्रॅम आहे का? या USENET गृप वर एकाने विचारलेल्या प्रश्नामुळे जगाला एक कंपनी मिळाली.
ज्या कंपनीला येत्या १७ ऑक्टोबरला २९ वर्ष पूर्ण होतील, ती कंपनी म्हणजे “इंटरनेट मूवी डेटाबेस” म्हणजेच IMDb .
Uk based असणाऱ्या चित्रपटवेड्या Needham Rose ने हे चॅलेंज स्वीकारलं आणि त्याच्याकडे असलेल्या “शेल फाइल्स” त्याने या usenet गृप वर शेअर केल्या जेणेकरून सर्च करता येईल असा डेटाबेस यातून तयार करता येईल.
पण हे सगळं घडत होतं जेव्हा वर्ल्डवाईड वेब ही संकल्पनाही यायची होती. जेव्हा टीम ली ने १९९१ मध्ये वर्ल्ड वाईड वेब ही संकल्पना जगासमोर मांडली, तेव्हा या साईटला अजून महत्व प्राप्त झालं.
त्यामुळे ही साईट खऱ्या अर्थाने पहिल्या काही साईट्सपैकी एक मानतात ज्यांनी २५ वर्ष पूर्ण केली, कारण त्या साईट्सचा जन्म वर्ल्ड वाईड वेबबरोबर झाला आहे.
Needham ने लाँच केलेली ही कंपनी जेव्हा ऍमेझॉनने विकत घ्यायचा प्रस्ताव ठेवला तेव्हा ऍमेझॉनचे सीईओ जेफ बेझोसनी ऍमेझॉन ही एक प्रामुख्याने पुस्तकं विक्रेती वेबसाईट आहे
अन ते IMDb चा वापर एक चांगली व्हिडीओ लायब्ररी करण्यासाठी करतील असं आश्वासन लंडनमध्ये झालेल्या भेटीत दिलं आणि त्यानंतर ऍमेझॉन ने imdb विकत घेतलं.
नक्की आकडा सांगता येत नसला तरी त्या वेळी ऍमेझॉन ने काही वेबपेजेस आणि imdb विकत घेतलं होतं त्याचं एकत्रित मूल्य केलं ते जवळपास ५५ मिलियन डॉलर होतं.
परंतू needham च्या अटीनुसार ऍमेझॉन ने imdb हा ब्रँड स्वतंत्र ठेवला. पण तरी आज १५ वर्षापेक्षा जास्त काळ जेव्हा imdb कडे आपण बघतो तेव्हा नकळतपणे आपल्याला त्यात ऍमेझॉनच्या काही खुणा स्पष्ट जाणवतात.
जवळपास १०० ते २०० च्या आसपास लोक IMDb मध्ये आज काम करतात.
यातले काही लोकं uk मधील ब्रिस्टॉल मध्ये आणि ऍमेझॉनच्या सिएटल मधल्या हेडक्वार्टर मधून काम करतात आणि काही हॉलिवूडच माहेरघर म्हणल्या जाणाऱ्या लॉस एंजलीस मधून काम करतात.
Imdb इतर साईट्स सारखी फारशा जाहिराती ठेवत नाही तरी मग ते पैसे कसे कमवतात?
हा प्रश्न पडणं साहजिक आहे . IMDb ने Imdbpro नावाची अजून एक सेवा सुरू केली आहे ज्यात कास्टिंग कॉल, स्वतःचे IMDb प्रोफाइल वगरे लोक मॅनेज करू शकतात यासाठी IMDb काही दर आकारणी करते.
शिवाय Imdb ने २००८ मध्ये “Box-office mojo” आणि “Withoutabox” या दोन कंपन्या खरेदी केल्या.
त्यातली “Box-office mojo” ही कंपनी चित्रपटांची कमाई ट्रॅक करते तर दुसरी withoutabox ही कंपनी वितरणात मदत करते. या दोन्ही कंपनी लॉस एंजलीसच्या बाहेर राहून काम करतात.
IMDb स्वतः हजारो व्हिडीओज होस्ट करतेच, शिवाय जर कोणाला फिल्म डिस्ट्रिब्युट करायची असेल तर त्याच्याकडे withoutabox वर ती सबमिट करून वितरीत करू शकतो किंवा ते व्हिडीओज imdb वर पण दाखवण्याची त्याला मुभा असते.
जरी ऍमेझॉन आणि IMDb हे वेगळे ब्रॅन्ड म्हणून काम करत असले तरी ते एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे काम करतात.
–
- चित्रपटाला “सेन्सॉर बोर्ड”चं सर्टिफिकेट मिळण्याचे निकष काय असतात? जाणून घ्या..
- नक्की फेसबुक आहे तरी किती मोठं: फेसबुकबद्दल काही गमतीशीर गोष्टी
–
Imdb चे रेटिंग्ज हे ऍमेझॉनला वेगवेगळ्या सिनेमांच्या विक्रीसाठी मदत करतात हे सर्वश्रुत आहेच.
पण आता याच रेटिंग्जचा वापर हे लोकांचा कल जाणून घेण्यासाठी ऍमेझॉन करत आणि लोकांचा कल जाणून घेऊन त्याप्रमाणे ऍमेझॉन प्राईम अंतर्गत नवीन काय काय करता येईल याचा अभ्यास करून त्याप्रमाणे नवीन कन्टेन्ट करायला याचा वापर केला जातो.
X-Ray सेवेचा उगम
Needham म्हणतात “जेव्हा आम्ही IMDb ला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म वर कसं आणता येईल याचा विचार करायला सुरुवात केली तेव्हा ऍमेझॉन “किंडल फायर” विकसित करत होते आणि नेमकी हीच गोष्ट आम्हाला उपयोगी पडली.
आम्ही असा विचार केला की जर कोणता चित्रपट पहात असताना आपल्याला एखाद्या सिनमध्ये असणाऱ्या अभिनेत्यांची किरकोळ माहिती स्क्रीन वर मिळाली तर तो सिनेमा बघताना आपल्याला मिळणारा आनंद द्विगुणित होऊ शकतो.
आणि या ठिणगीतूनच जन्माला आली ती ऍमेझॉन X-Ray ही सेवा.
जसजसे टीव्ही सिरीज, नेटफ्लिक्स ओरिजिनल सिरीज, ओरिजिनल मूवीज हे यासारखे नवनवीन प्रकार उदयाला येऊ लागले तसे तसे IMDb ने पण वेळोवेळी बदल केले.
आज imdb वर Top rated Tv shows, Top rated Movies, Most Popular असे अनेक चार्ट्स आहेत.
Swashank redemption हा १९९४ साली प्रदर्शित झालेला सिनेमा आजही IMDb वर सर्वाधिक रेटिंग असलेला सिनेमा म्हणून ओळखला जातो.
IMDb च रेटिंग पद्धती कशी काम करते ?
IMDb चे रजिस्टर्ड युजर्स त्यांचं कोणत्याही मूवी संबंधी असलेलं रेटिंग देऊ शकतात आणि या युजर्सनी दिलेल्या रेटिंगचा वापर imdb करते आणि त्यातून ते त्या चित्रपटाचं रेटिंग ठरवतं.
आता या रेटिंग मध्ये IMDb नॉर्मल अवरेज मेथडचा वापर करत नाही, त्यांनी त्यांची रेटिंगची पद्धत ही गुप्त ठेवलेली आहे. तथापि काही साईट्सच्या म्हणण्यानुसार ते अरीथमेटिक मिन वापरतात,
तर काही साईट्सच्या म्हणण्यानुसार मिडियन मेथड पण IMDb नक्की कोणती मेथड वापरते हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.
मेथड कोणतीही वापरत असले तरी ते प्लब्लिक रेटिंग वर अवलंबून असल्याने त्यातून public psychology समजायला मदत होते, त्यामुळेच कन्टेन्ट क्रीएटर्सना ही साईट एवढी महत्वाची वाटते.
या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टींमुळेच Imdb चे Needham म्हणतात की imdb ही अशी प्युअर इंटरनेट साईट आहे जी म्हणू शकते की त्यांनी २५ वर्ष पूर्ण केली आहेत कारण त्यांचा आणि वर्ल्ड वाईड वेबचा उगम एकाचवेळी झाला आहे.
आणि आज ही साईट जगातल्या सर्वात जास्त सर्च केल्या जाणाऱ्या ५० साईट्स पैकी एक साईट आहे.
–
- पोस्टाने आला होता “नेटफ्लिक्स”चा पहिला सिनेमा! विश्वास बसत नाही? मग हे वाचाच
- “गुगल” नावाच्या चमत्काराच्या जन्माची अफलातून कथा
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.