' कुबेरालाही लाजवतील, भारतातील “रॉयल फॅमिलीज”चे हे खास “९ दागिने”! – InMarathi

कुबेरालाही लाजवतील, भारतातील “रॉयल फॅमिलीज”चे हे खास “९ दागिने”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राजा महाराजांच्या वैभवाच्या कित्येक कहाण्या आपण ऐकल्या, वाचल्या आहेत. त्यांचे मोठमोठे किल्ले, वैभवशाली राजवाडे वगैरे गोष्टींची वर्णने वाचून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही.

राजघराणे आणि संपन्नता या दोन बाबी नेहमी एकत्रच गुंफल्या जातात. मग या अशा राजे राजवाडयांकडे दागिने पण तसेच अमूल्य किंमतीचे असणार ना?

चला तर मग पाहूया भारतातील रॉयल फॅमिलीज मध्ये असे कोणते विशेष दागिने होते…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

१. महाराजा दुलीपसिंग यांचा हिऱ्याचा सरपेच

शिखांचे शेवटचे महाराज होते दुलीपसिंग. यांची राजधानी लाहोर येथे होती. दुलीपसिंगांच्या पगडीवर एक शिरपेच लावला होता ज्याची चर्चा सर्वदूर पसरली होती. या शिरपेचाच्या तीन पाकळ्या पूर्णतः हिऱ्यांनी बनवलेल्या असून त्यांच्या मध्यभागी हिरवा पाचू विराजमान होता.

dulipsing royal families InMarathi1


२. महाराजा भुपींदर सिंग यांचा पटियाला हार

हा श्वास रोखून ठेवणारा गळ्यातील हार तब्बल २,९३० हिऱ्यांनी बनला होता! एवढेच नाही तर यामध्ये जगातील सर्वात मोठा सातव्या क्रमांकाचा हिरा, डी बिअर्स, जो २३४ कॅरेटचा होता, तो मध्यभागी लावलेला होता.

 

bhupindar-singh-necklace1-inmarathi
pintrest.com

हा अप्रतिम दागिना कार्टीअर पॅरिसने १९२८ मध्ये खास पटियालाचे महाराज भुपींदर सिंग यांच्यासाठी बनवला होता. या नेकलेस मध्ये प्लॅटिनम, हिरे, पुष्कराज, माणिक, काचमणी इत्यादी जवाहिर वापरले होते.

३. पटियालाच्या महाराणींचा रुबी चोकर

हा गळ्यात घालायचा दागिना कार्टीअर यानेच १९३१ साली घडवला. डोळे दिपवणारा हा चोकर अस्सल प्लॅटिनम पासून बनवला होता आणि यात लाल माणिक, हिरे व मोती वापरले होते.

 

rubi-choaker1-inmarathi
allthingsjewelery.blogspot.com

या दागिन्याच्या वरच्या भागात सहा पदरांमध्ये माणिक, मोती, हिरे, मधल्या भागामध्ये माणिक मोती आणि खालच्या भागामध्ये अमूल्य किमतीचे माणिक आणि हिरे बसवले होते. हा हार महाराजा भुपींदर सिंग यांनी आपल्या प्रिय पत्नीला, महाराणी श्री बखतावर कौर साहिबा यांना भेट म्हणून दिला.

४. काश्मिरी राजकन्येचा मुकुट

जुन्या भारतीय बनावटीच्या दागिन्याचा हा अप्रतिम आविष्कार काश्मीरची राजकन्या वापरत असे. हा अर्ध-मुकुट तीन भागात तयार करून ते एकमेकांना जोडले होते. नवव्या दशकातल्या या दागिन्यावर किन्नर, पक्षी आणि महिलांच्या आकृतीची कलाकुसर होती.

 

kashmir-prices-crown1-inmarathi
metmuseum.org

५. बडोद्याच्या महाराणींचा स्टार डायमंड नेकलेस

१२८ कॅरेटचा हा स्टार डायमंड नेकलेस बडोद्याचे महाराज श्री मल्हार राव यांनी तब्बल ऐंशी हजार पाउंडस खर्च करून विकत घेतला होता. महाराणी सीता देवी यांच्या गळ्यात हा तीन पदरी हार शोभिवंत दिसे.

 

baroda-necklace1-inmarathi
historyofvadodara.in

यात ७८.५ कॅरेटचे इंग्लिश ड्रेसडन हिरे सुद्धा बसवलेले होते. काही काळानंतर मुंबईच्या रुस्तम जमशेटजी यांनी हा हार विकत घेतला आणि नंतर त्यांनी कार्टीअरला २००२ मध्ये परत विकला.

६. बडोदा राजघराण्याचा मोत्यांचा हार

 

baroda-pearl-necklace1-inmarathi
internetstones.com

अतिशय सुंदर आणि लक्षवेधी नैसर्गिक मोत्यांपासून तयार केलेला हा हार बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांनी १८६० मध्ये तयार करून घेतला होता. सात पदरांचा हा हार आज १५० वर्षानंतरही आपली चमक फिकी करून घ्यायला तयार नाही.

७. नवानगर महाराजांचा रिगल एमराल्ड नेकलेस

नवानगरच्या (सध्याचे गुजरात मधील जामनगर) महाराजांच्या ताब्यात हा नेकलेस होता. हा मूल्यवान सुंदर हार पाचू आणि हिऱ्यांपासून बनवला होता. यात आयताकृती १७ मौलिक पाचू वापरले असून ते २७७ कॅरेटचे होते. हे पाचू ७० कॅरेटच्या पेंडंट मध्ये गुंफले होते. असे म्हणतात की एकेकाळी या नेकलेसवर टर्कीच्या सुलतानाची मालकी होती.

 

emerald-necklace1-inmarathi
pintrest.com

८. महाराज भुपींदर सिंग यांचा हिऱ्यांचा सरपेच

पटियालाचे महाराज भुपींदर सिंग यांच्या पगडीमधील हा शोभिवंत सरपेच हिऱ्यांनी आणि मूल्यवान खड्यांनी मढवलेला होता. याला लिलावात १,७०,००० डॉलर्स इतकी रक्कम मिळाली. याचे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा आहे.

 

king-bhupindarsingh1-inmarathi
blouinartinfo.com

ब्रिटिशांनी राजे महाराजांना ब्रिटिशांसारखा मुकुट घालण्यास मनाई केल्यानंतर भारतीय पगडीवर ब्रिटिशांच्या तोडीस तोड किमतीचा हा दागिना महाराज मुद्दाम मिरवत असत.

९. पहिल्या शतकातील सोन्याचे कानातले डुल 

 

1stcentury-earring1-inmarathi
metmuseum.org

हे पुरातन काळातील सोन्याचे डुल शुद्ध सोन्यापासून पहिल्या शतकात बनवले गेले होते. सातवाहन काळातील हे कानातले डुल आंध्रप्रदेश मध्ये सापडले. यावरची कलाकुसर मोहक आणि बघण्यासारखी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?