Site icon InMarathi

जिहादयांची “सेक्स स्लेव्ह” ते नोबेल पुरस्कार विजेत्या “महिलेने” जे केलं ते अभिमानास्पद आहे!

nadia murad inmarathi

q.berlin

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नोबेल पुरस्कार हा जगातील सर्वात नावाजलेल्या काही पुरस्कारांपैकी एक. किंबहुना सर्वोच्च! दरवर्षी जगभरातून काही मोजक्याच लोकांना हा पुरस्कार जाहीर होतो. त्यांचे त्या या क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण असते.

नोबेल पुरस्काराने केलेला सन्मान त्यांचे कार्य आणि कतृत्व जगभर पोहोचवतो.

यातले अनेक पुरस्कारार्थी त्यांच्या समाजाप्रती असलेली आस्था पुरस्कार म्हणून मिळालेली रक्कम दान करून दाखवतात. सेक्स स्लेव्ह म्हणून काम केलेल्या अशाच एका स्त्रीला हा सन्मान जाहीर झाला आणि त्यांनी ती रक्कम दान करण्याचे ठरवले. कोण आहेत त्या? पाहूयात..

“द हिल” च्या एका रिपोर्ट नुसार नादिया मुराद ह्या २०१८ सालच्या नोबेल पुरस्कार विजेत्या स्त्रीने बक्षिसाची संपूर्ण रक्कम दान करून टाकण्याचा संकल्प केला होता!

 

ScoopWhoop.com

 

नादिया मुराद या नोबेल पुरस्कार विजेत्या स्त्रीने ५,००,००० डॉलर्स इतकी रक्कम सेक्स क्राईमच्या पीडितांसाठी दान केली होती.

२०१८ सालचा नोबेल पुरस्कार डेनिस मुकवेज हे डॉक्टर व नादिया मुराद ह्यांना विभागून देण्यात आला. डेनिस मूकवेज ह्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो येथे लैंगिक हिंसा झालेल्या पीडितांना मदत केली.

नादिया मुराद ही इराकी याझिदी स्त्री आहे. तिच्यावर इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी अनन्वित अत्याचार केले आहेत तसेच अनेक वेळा तिला बलात्कार सहन करावा लागला आहे.

तिने स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर याझिदी लोकांना ह्या इस्लामिक स्टेटच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी कॅम्पेनिंग केले. ह्या कॅम्पेनचा नादिया चेहेरा बनली.

उत्तर इराकमध्ये २०१४ साली आयसिसने याझिदी शहरांवर ताबा मिळवला. नादिया व तिच्याबरोबर आणखी सात हजार याझिदी स्त्रिया व मुलींना त्यांच्या गावातून पळवून नेण्यात आले.

तिचे अपहरण झाले तेव्हा ती फक्त २० वर्षांची होती. आपल्या कुटुंबातील व्यक्तींना जबरदस्तीने ट्रक्स मधून नेताना तिने पाहिले.

त्यानंतर तिच्या आईची व सहा भावांची हत्या झाल्यानंतर तिला जबरदस्तीने मोसुलला जावे लागले. तिने तिच्या अनुभवांवर The Last Girl: My Story of Captivity, and My Fight Against the Islamic State हे पुस्तक लिहिले.

त्या पुस्तकात तिला आलेला अनुभव तिने कथन केला आहे.

ती म्हणते, ज्या क्षणी ती बस मध्ये बसली त्या क्षणापासूनच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरु झाले.

“मला आगीत ढकलल्याप्रमाणे वाटलं! मला ह्याआधी असा स्पर्श कुणीही केला नव्हता. माझे अश्रू त्याच्या हातांवर पडत होते पण त्याला माझी दया आली नाही. त्याने माझ्यावर अत्याचार करणे थांबवले नाही.”

 

dnaindia.com

 

नादियाला नंतर स्लेव्ह मार्केट मध्ये नेण्यात आले. त्यानंतर जजने तिला त्याची सेक्स गुलाम म्हणून घोषित केले. तिला जजच्या घरी बंदी म्हणून डांबून ठेवण्यात आले. त्या ठिकाणी तिच्यावर असंख्यवेळा बलात्कार करण्यात आले तसेच रोज मारझोड होत असे.

घरात आलेल्या पाहुण्यांसमोर पार्टी ड्रेस घालून त्यांना सर्व्ह करण्याचे काम तिला करावे लागत असे.

ते अत्याचारी कैदी तिच्यावर बलात्कार करताना तिने डोळे बंद केले तर तिला मारहाण करीत असत.

एकदा तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती पकडली गेली आणि शिक्षा म्हणून एकावेळी सहा लोकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. टाईमशी बोलताना तिने सांगितले की,

“मला स्वतःला मारून घ्यायचे नव्हते. त्यांनी मला एकदाचे मारून टाकावे असे मला वाटत होते.”

अखेर एकदा तिला बंदी ठेवणाऱ्यांनी चुकून घराला बाहेरून कुलूप न लावल्याने ती पळून जाण्यात यशस्वी ठरली. शेजारच्या कुटुंबाने तिला आयसिसच्या कचाट्यातून पळून जाण्यास मदत केली.

उत्तर इराकच्या दुहोक येथील एका रेफ्युजी कॅम्प मध्ये तिने आश्रय घेतला. यझिदींना मदत करणाऱ्या एका संस्थेने तिला जर्मनीस जाण्यास मदत केली.

आता ती तिच्या जर्मनीमधील बहिणीबरोबर जर्मनीतच राहते. जर्मनीतच तिची पाश्चिमात्य पत्रकारांशी भेट झाली आणि नैऋत्य जर्मनीतल्या रिजनल गव्हर्नमेंट ऑफ Baden-Wuttemberg च्या एका रिफ्युजी प्रोग्रॅममध्ये तिची व इतर हजार स्त्रियांची निवड करण्यात आली.

 

theweek.com

 

तेव्हापासून तिने याझिदी लोकांची मदत करण्यासाठी जनजागृती करणे सुरु केले. तसेच सेक्स स्लेव्हरी आणि मानवी तस्करी बंद व्हावी ह्यासाठी तिने जनजागृती करणे सुरु केले.

तिच्या ह्या कार्यासाठी तिला काउन्सिल ऑफ युरोपने २०१६ साली Vaclav Havel ह्युमन राईट्स पुरस्कार दिला.

त्याच वर्षी तिची यूएनची सर्व्हायव्हर्स ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंगची पहिली गुडविल अँबॅसिडर म्हणून निवड झाली.

तिच्या पुस्तकात तिने असेही लिहिले आहे की,

“माझ्यासारखी परिस्थिती ओढवलेली मी जगातील शेवटची मुलगी असावी हीच माझी इच्छा आहे.”

तिला जे भोगावे लागले ते आणखी कुठल्याही मुलीच्या वाट्याला येऊ नये हीच तिची इच्छा आहे.

जिहादींच्या गुलामापासून ते स्त्रियांची जागतिक प्रतिनिधि असा नादियाचा प्रवास झाला आहे. ती याझिदी लोकांवर ओढवलेल्या परिस्थितीबद्दल सतत जनजागृती करीत आहे.

डेनिस मूकवेज व नादिया मुराद हे दोघेही युद्धामध्ये होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराविरुद्ध कार्य करायचे. त्यासाठीच तिला नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

 

thenation.com

 

हा पुरस्कार स्वीकारताना तिने जे भाषण केले त्यात तिने तिच्या बक्षीसाची शंभर टक्के रक्कम एका संस्थेला दान करण्याचा निर्णय घेतला होता.

ही संस्था नादियानेच उभी केली आहे. ही संस्था इराक मधील अल्पसंख्यांक लोकांना व स्त्रियांना मदत करते. ती म्हणते ,

“माझ्या आईची आयसिसने हत्या केली. मी माझ्या आईचा व ज्या मुलांबरोबर मी मोठी झाले त्यांचा विचार करते. त्यांच्या स्मृतीप्रती काय करता येईल हा विचार करते. अल्पसंख्यांक लोकांचा होणारा छळ थांबला पाहिजे.”

ती असेही म्हणते की,

“यझिदी लोकांचा आवाज म्हणून मी उभी राहावी, बहुतेक ह्यासाठीच मी जिवंत राहिले. हा पुरस्कार मी याझिदी, इराकी ,कुर्द आणि छळ सोसलेले अल्पसंख्यांक व लैंगिक छळ भोगलेले जगातील असंख्य लोक ह्यांच्याबरोबर शेअर करते.”

नादियाच्या हिंमतीला व धैर्याला सलाम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version