' विद्वत्तेचे शिखर गाठलेल्या आईनस्टाईनची झालेली फरफट बघून आजही मन विषण्ण होते – InMarathi

विद्वत्तेचे शिखर गाठलेल्या आईनस्टाईनची झालेली फरफट बघून आजही मन विषण्ण होते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन हे सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते. सार्वकालिक शास्त्रज्ञांमध्ये ते सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक समजले जातात. भौतिकशास्त्रात त्यांनी अतिशय महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांचा सापेक्षतावादाचा सिद्धांत, फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, क्वांटम एनर्जी, प्रकाश, गुरुत्वाकर्षण व इतर अनेक सिद्धांत प्रसिद्ध आहेत.

सामान्य व्यक्तीला आईन्स्टाईन म्हटले की मॅटर एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करणारा जगप्रसिद्ध फॉर्मुला E = mc2 आठवतो. असीम बुद्धिमत्तेचे उदाहरण म्हणून अल्बर्ट आईन्स्टाईन ह्यांच्याकडे बघितले जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यांच्या करियरच्या सुरुवातीलाच त्यांना असे लक्षात आले की न्यूटन ह्यांच्या मेकॅनिक्स बदलत्या काळात विद्युत चुंबकीय नियमांबरोबर मेळ लागत नव्हता.

ह्यातूनच त्यांनी बर्न येथील स्विस पेटंट ऑफिसमध्ये काम करत असताना स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी शोधून काढली.

त्यांना त्यापुढे हे ही लक्षात आले की सापेक्षतेचा सिद्धांत हा गुरूत्वाकर्षणालाही लागू होऊ शकतो.

हे ही वाचा – आईन्स्टाईनची अशीही बाजू : पत्नीवरची अनिर्बंध दडपशाही…

 

Albert einstein.inmarathi

 

पुढे त्यांनी अनेक सिद्धांत मांडले. त्यांनी ३०० हुन अधिक सायंटिफिक पेपर्स तसेच दीडशे पेक्षाही जास्त नॉन सायंटिफिक रिसर्च पब्लिश केले.

त्यांच्या फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट व भौतिकशास्त्रातील कार्यासाठी त्यांना १९२१ साली नोबेल पुरस्कार देण्यात आला.

त्यांच्या फोटोइलेक्ट्रिक इफेक्टच्या नियमांच्या शोधामुळे क्वांटम थेअरीचा पाया रचला गेला.

अनेकांना माहिती आहे की अल्बर्ट आईन्स्टाईन हे जर्मन होते. पण फार थोड्या लोकांना हे माहिती आहे की अल्बर्ट आइन्स्टाइन हे ज्यू होते आणि म्हणूनच जर्मनीत एडॉल्फ हिटलर सत्तेवर आल्यानंतर अल्बर्ट आइन्स्टाइन ह्यांना जर्मनीतून बाहेर पडावे लागले.

आईन्स्टाईन ह्यांचा जन्म १४ मार्च १८७९ रोजी जर्मनीमध्ये झाला. त्यांचे वडील हे इंजिनियर व सेल्समन होते.

१८८० साली त्यांचे कुटुंब म्युनिच येथे स्थायिक झाले. तेथे आईन्स्टाईन ह्यांचे वडील व काकांनी मिळून डायरेक्ट करंट वर चालणारे विद्युत उपकरण बनवणारी एक कंपनी उघडली. आईन्स्टाईन हे ashkenazi ज्यू होते.

वयाच्या पाचव्या वर्षांपासून त्यांचे शिक्षण सुरु झाले. सुरुवातीला ते कॅथलिक एलिमेंटरी स्कुल मध्ये जात असत. नंतर त्यांना लुटपोल्ड जिम्नॅशियम ह्या शाळेत घालण्यात आले. तेथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले.

त्यांच्या वडिलांच्या कंपनीला नुकसान झाल्याने त्यांना ती कंपनी विकावी लागली व त्यांचे कुटुंब इटली येथील मिलान मध्ये व नंतर पाव्हिया येथे स्थायिक झाले.

 

Einstein_Fatherly-inmarathi

हे ही वाचा – आईन्स्टाईन जिथे अडखळला – तिथे यशस्वी होणारे “नोबेल” वैज्ञानिक !

 

परंतु आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी अल्बर्ट आईन्स्टाईन मात्र म्युनिचमध्येच थांबले. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की अल्बर्ट आईन्स्टाईन ह्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शिकावे. परंतु आईन्स्टाईन ह्यांना त्यांच्या शाळेची शिकवण्याची पद्धत पटली नाही.

१८९४ रोजी ते त्यांच्या आईवडिलांकडे पाव्हिया येथे गेले.त्यांचे पुढचे शिक्षण त्यांनी स्वित्झर्लंड येथील अर्गोव्हियन कॅन्टोनल स्कुल येथे घेतले व नंतर झुरिक पॉलिटेक्निक येथून शिक्षण पूर्ण केले.

१९१४ साली ते जर्मनीला परत आले आणि त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन येथे शिकवणे सुरु केले.

१९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. तोवर त्यांच्या हुशारीची कीर्ती जगभर सगळीकडे पसरली होती म्हणूनच जगभरातून त्यांना लेक्चर्स देण्यासाठी आमंत्रित करण्यात येत होते. ते ज्यू असल्याने हिटलर व जर्मन सैन्याची त्यांच्यावर करडी नजर होती.

१९३३ साली ते अमेरिकेला एका लेक्चरसाठी गेले होते. तेव्हाच जर्मनीवर एडॉल्फ हिटलरचे चॅन्सेलर म्हणून राज्य आले. आणि तेव्हाच ज्यू असल्याने त्यांनाही टार्गेट करण्यात येईल म्हणून आईन्स्टाईन ह्यांनी जर्मनीला परत न जाण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेत ते कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निलॉजी येथे व्हिझिटिंग प्रोफेसर म्हणून आले होते.

जर्मनीत परत जायचे नाही हा निर्णय घेतल्यानंतर आईन्स्टाईन बोटीने बेल्जीयम येथे मार्च १९३३ मध्ये आले. तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या घरावर रेड टाकण्यात आली आहे.

आईन्स्टाईन ह्यांनी त्यांचा पासपोर्ट जर्मन कॉन्स्युलेटला सुपूर्त केला आणि जर्मन नागरिकत्व सोडले.

 

einstine inmarathi

 

काहीच महिन्यात त्यांना आपला निर्णय कसा योग्य होता ह्याचा प्रत्यय आला. कारण त्यांना माहिती मिळाली की त्यांचे नाव असोसीनेशन टार्गेट्सच्या यादीत होते.

ते जर्मनीला गेले असते तर ते ज्यू आहेत म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असती.

त्यांनी काही महिने बेल्जीयम येथे वास्तव्य केले आणि नंतर काही काळासाठी ते इंग्लंडला गेले. १७ ऑक्टोबर १९३३ रोजी ते अमेरिकेला परत गेले आणि न्यू जर्सी मधील प्रिन्सटनच्या इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड स्टडी येथे रुजू झाले.

प्रिन्सटन येथे सहा महिन्यांचा करार करण्याचा नियम होता. आईन्स्टाईन ह्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पासून तर इतर अनेक नामांकित विद्यापीठांतून ऑफर्स होत्या. १९३५ साली त्यांनी अमेरिकेतच कायमचे राहण्याचा निर्णय घेतला आणि १९४० साली अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.

१९५५ साली त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते इन्स्टिस्ट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कार्यरत होते.

अमेरिकेतील २० वर्षाच्या वास्तव्यात आईन्स्टाईन ह्यांनी महत्वाचे योगदान दिले. त्यांचे सर्वात महत्वाचे योगदान म्हणजे ऍटोमिक बॉम्ब होय.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अल्बर्ट आईन्स्टाईन ह्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन रुझवेल्ट ह्यांना सावधान केले की कदाचित जर्मनी ऍटोमिक शस्त्र तयार करत आहे.

आईन्स्टाईन ह्यांच्या इशाऱ्यावरून अमेरिकेने शोध घेणे सुरु केले. ह्यातूनच मॅनहॅटन प्रोजेक्ट सुरु झाला. मॅनहॅटन प्रोजेक्ट म्हणजे अमेरिकेचा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पहिली आण्विक शस्त्रे तयार करण्याचा कार्यक्रम होय.

 

Manhattan-inmarathi

 

ह्या प्रोजेक्टमध्ये अमेरिकेला युनायटेड किंगडम व कॅनडाचाही पाठिंबा होता.

आईन्स्टाईन ह्यांचा बचावासाठी शस्त्रे वापरण्याला पाठिंबा होता, परंतु न्यूक्लिअर फिशन म्हणजेच नव्यानेच शोधून काढण्यात आलेले आण्विक शस्त्र हे युद्धात शस्त्र म्हणून वापरण्याला त्यांचा सक्त विरोध होता.हिटलरच्या वर्णभेदी वागणुकीमुळे आईन्स्टाईन ह्यांना आपला मायदेशी सोडून जावे लागले.

हिटलरच्या हुकूमशाहीमुळे जर्मनीला आपला अत्यंत हुशार असा शास्त्रज्ञ गमवावा लागला आणि जर्मनीचे नुकसान झाले.

हिटलरमुळे तसेच आईन्स्टाईन ह्यांच्या जर्मनी सोडून जाण्याने जे जर्मनीचे नुकसान झाले त्यात अमेरिकेचा फायदा झाला.

हे ही वाचा – आईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?