Site icon InMarathi

बंगालमधील दुर्गा पूजेची सुरूवात इंग्रजांनी केली होती! स्थानिक जमीनदारांना खिश्यात घालण्यासाठी!

durgapuja-bengal-inmarathi

reacho.in

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत देशामध्ये सण आणि उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. असे सण आणि उत्सव हे दुसऱ्या कोणत्याही देशात साजरे होताना दिसत नाहीत .

त्यातला नवरात्र उत्सव हा एक मोठा उत्सव असतो आणि संपूर्ण देशभर हा साजरा होतो. पण बंगाल ची ओळख बनलेला हा दुर्गा पुजोत्सव ह्याची सुरुवात कधी पासून आणि कशी झाली हे जाणून घेणं मजेशीर आहे.

१७ व्या शतकाच्या आधी बंगाल मध्ये सार्वजनिक दुर्गा पूजेचे संदर्भ आढळत नाहीत.

बाकी आपल्या देशात दुर्गा पूजा पूर्वापार होत होत्या पण त्या आदिवासी पाड्यात किंवा काही प्राण्यांचा बळी देण्यासाठी होत असाव्या. दुर्गा देवी ही राक्षसांचा संहार करणारी देवता, त्यामुळे रक्त सांडून प्राण्यांचा बळी देऊन तिला नैवेद्य दाखवला जायचा.

आदिवासी लोकांची ही प्रथा होती, अनेक कर्ण कर्कश्श वाद्य वाजवून हा बळी दिला जायचा.

दुर्गा ही शक्ती आहे, ती असुरांचा म्हणजेच दुष्ट शक्तींचा नाश करते, मानवावर आलेल्या संकटांचे हरण करते अशी तिची ख्याती असल्यामुळे कोणतेही आलेले संकट हे दुर्गा पूजेने हरण होते म्हणून ही पूजा केली जाते.

 

Moneycontrol.com

 

संकटातून मुक्तता झाल्यावर आदिवासी मोठ्या भक्तीभावाने तिची ही पूजा करायचे. आदिवासी लोकांचे अन्न हे प्राणी मारून भाजून खाणे हेच असल्यामुळे दुर्गामतेला सुद्धा प्राण्याचाच बळी दिला जात असे आणि तीच प्रथा पुढे चालू राहिली.

१७५७ साल हे ब्रिटिशांच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ चे भारतावर वर्चस्व असलेला काळ होता. सगळीकडे ब्रटिशांनी आपली सत्ता स्थापनेचा सपाटाच लावला होता. अनेक मोगल सम्राटही हिंदुस्थानात काही भाग काबीज करून बसले होते. बंगाल हाही सिराज उद्दौला च्या ताब्यात होता.

ईस्ट इंडिया कंपनी ही समुद्रातुन वाहतूक सोपी होण्यासाठी प्रथम बंदरांवर आपला कब्जा मिळवत होती आणि नंतर ते आपली सत्ता वाढवत होते.

बंगाल ह्यादृष्टीने त्यांना सोयीचा वाटत होता म्हणून बंगालवर ब्रिटिशांनी हल्ला चढवला.नवाब सिराज उद्दौला हा तसा ताकदवान होता. त्याला हरवणे सोपे नव्हते. पण ब्रिटिशांनी सुद्धा आपली मोठी शक्ती लावली होती.

ईस्ट इंडिया कंपनी आणि नवाब सिराज उद्दौला ह्यांच्या सैन्यात घनघोर युद्ध पेटले. दोन्हीही सेना अतिशय मोठ्या आणि ताकतवान होत्या. त्यामुळे घनघोर युद्ध झाले. पण ब्रटिशांच्या आधुनिक शास्त्रास्त्रांमुळे त्यांची युद्धात सरशी होत गेली, उद्दौला मागे हटला आणि ईस्ट इंडिया कंपनीने ह्या युद्धात विजय मिळवला.

 

indiatoday.com

 

मोठी लढाई होती ही, मोठी सेना, मोठी ताकत ह्या युद्धासाठी ब्रिटिशांना लावावी लागली होती. अखेर मोठ्या कष्टाने हा विजय “रॉबर्ट क्लाइव्ह” च्या सेनेने मिळवला होता. ही लढाई इतिहासात ‘प्लासीच्या लढाई’ म्हणून प्रसिद्ध आहे.

विजय मिळाल्यानंतर रॉबर्ट क्लाइव्ह आनंदी झाला. मिळालेला विजय देवाला समर्पित करण्याची इच्छा त्याने आपला दुभाषी नवाकृष्ण देव ह्याला (नबाकृष्ण देब) ह्याला बोलून दाखवली.

दुभाषी आणि रॉबर्ट क्लाइव्ह दोघे चर्चची चौकशी करत असताना कळले की सिराज उद्दौलाच्या सैन्याने तिथले एकमेव चर्च पूर्ण उध्वस्त करून टाकले होते, म्हणून आता चर्च मध्ये जाऊन आपली इच्छा प्रदर्शित करणे शक्य नव्हते.

तेंव्हा दुभाषी नबाकृष्ण देब याने रॉबर्ट क्लाइव्हला दुर्गामतेच्या मंदिरात जाऊन आपण आपली इच्छा प्रकट करावी असा सल्ला दिला.

दुर्गा माता ही त्या देवाचेच एक रूप आहे. मंदिरात केलेली प्रार्थना ही निश्चित आपल्या चर्च मधल्या देवाला पोहोचेल असे तो म्हणाला.

रॉबर्ट क्लाइव्ह तयार झाला. नवाकृष्ण देब, रॉबर्ट आणि त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन स्वतः च्या घरी आला, आणि घरातल्या दुर्गामतेच्या मूर्तीसमोर सगळ्यांच्या उपस्थितीत हा लढाईचा विजय देवीला मनापासून अर्पण करून देवीचे आभार मानले.

रॉबर्ट क्लाइव्ह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘प्लासीच्या लढाईतला’ विजय दुर्गामतेसमोर तिचे आभार मानून केला. एका प्रोटेस्टंट ख्रिश्चन ब्रिटिश सेना प्रामुखाने हिंदू देवतेला वंदून विजय साजरा केला.

 

india.com

 

ह्या विजयानंतर संपूर्ण बंगाल हा ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला. त्यामुळे आता ईस्ट इंडिया कंपनीचे नियम संपूर्ण बंगालमध्ये लागू झाले. बंगाल मधल्या सगळ्या मोठ्या मोठ्या जमिनदारांना ईस्ट इंडिया कंपनीने सन्मान देऊन त्यांच्या मानधनात चांगली वाढ केली.

त्यामुळे सगळे जमीनदार खुश झाले आणि ईस्ट इंडिया कंपनीला सहकार्य करू लागले.

त्यावेळी दुर्गापूजा ही सगळे जमीनदार आपापल्या घरात मोठ्या थाटात करायचे. त्यांनी केलेली दुर्गा पूजा म्हणजे खूप मोठी असायची आणि हे जमीनदार आपापल्या घरात थाटात ही पूजा करत असत ह्यामध्ये त्याच्या श्रीमंतीचे दर्शन संपूर्ण गावाला घडवलं जायचं.

पण सर्वसामान्य लोकांना ही पूजा थाटात करणे कठीण जायचे. म्हणून काही कुटुंब एकत्र येऊन अशी मोठी पूजा करायला लागले.

बारा बारा लोकांनी एकत्र येऊन अशी पूजा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. त्या प्रथेला बारावरी पूजा असे संबोधले जायचे.

नंतर नंतर अनेक कुटुंबे एकत्र यायला लागली, त्या पूजेसाठी मोठे मोठे मंडप उभे केले जाऊ लागले. नंतर त्या मंडपात छान सजावट केली जाऊ लागली आणि घरा घरात होणाऱ्या पूजांची प्रथा बंद होऊन मोठी सार्वजनिक पूजा प्रथा सुरू झाली. मंडपामध्ये कार्यक्रम केले जाऊ लागले.

धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होऊ लागले. देवीपुढे जागरण होऊ लागले. आशा पद्धतीने आज आपण जशी पूजा पाहतो तशी आधुनिक पूजा करणे सुरू झाले.

 

reacho.in

 

ब्रिटिशांच्या दुभाषी नवाकृष्ण देव ह्याने सुचवले म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून नवाकृष्ण देव च्या हवेलीत मोठी दुर्गा पूजा केली आणि लढाईत विजय मिळाला म्हणून दुर्गा देवीचे आभार मानले.

म्हणून त्यानंतर दरवर्षी आपण आज जी पाहतो ती आधुनिक दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणावर करणे सुरू झाले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

नबाकृष्ण देब याने त्याच्या घरात झालेल्या पूजेचे भव्य चित्र काढून त्यात छान रंग भरून त्यावेळी तयार करून ठेवले होते. तेच एकमेव चित्र त्याच्या घरात झालेल्या ख्रिश्चन लोकांनी केलेल्या दुर्गा पूजेचे साक्ष देणारे चित्र, म्हणून ही पूजा झाल्याचा पुरावा अस्तित्वात होता.

ही घटना त्या चित्रांमुळे आज आपल्यापर्यंत पोहोचू शकली आणि लोकांनाही माहिती मिळाली.

१९१० साली ‘ सनातन धर्मोत्साहिनी सभा’ ह्या संस्थेने बाग बाजार इथे सार्वजनिक दुर्गा पूजेचं आयोजन केलं होतं. ते अतिशय छान सजावट करून मोठ्या मंडपात केलं होतं. ते सगळ्यात सुरुवातीचे सगळ्यांच्या पसंतीस उतरलेले दुर्गा पूजन होते. आणि त्याच वर्षीपासून पुढे अशा उत्सवाचे आधुनिकीकरण झाले.

२० व्या शतका पासून खूप मोठाले मंडप, मंडपांमध्ये आकर्षक आरास, दिव्यांचा लखलखाट, फुलांची सजावट, देवीची भव्य मूर्ती, आशा सगळ्या गोष्टींमुळे दुर्गा पूजा ही खूप मोठी पूजा म्हणून ओळखली जाऊ लागली.

 

 

आता फक्त आपल्या घरात कोणी पूजा न करता अशा मोठ्या उत्सवात प्रत्येक घर सक्रिय भाग घेऊ लागलं आहे, आणि देवीच्या ह्या नऊ दिवसाच्या उत्सवात प्रत्येकजण आपली सेवा देऊ लागला आहे.

असा हा रॉबर्ट क्लाइव्हच्या भावनेतून ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी साजरा केलेला उत्सव हा बंगाली हिंदूंचा मोठा सण झाला आहे. जो आदिवासी ही साजरा करत होते आणि वैदिक पद्धतीने लोकांच्या घरात साजरा व्हायचा.

त्याची जागा आता आधुनिक सार्वजनिक उत्सवाने घेतली आणि सगळ्यांचाच उत्सव म्हणून मान्यता पावला आहे. गरीब आणि श्रीमंत सगळेच साजरा करू शकतात हे उत्सव.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version