आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
==
माणसाच्या अंगात कोणती कला लपलेली असेल याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. जगभरात लोक किती चमत्कारिक आणि विलक्षण गोष्टी करून दाखवतात की त्यांच्यावर जणू देवाचाचं वरदहस्त आहे की काय असे वाटते. तुम्ही व्यक्तींच्या नावांमधून गणपती रेखाटणाऱ्यांची कला पाहिलीचं असेल. ज्या प्रतिभावंतांना ही कला अवगत आहे, त्यांच्या सिद्धहस्त कलाकारीतून निर्माण होणारे गणपती बाप्पा पाहून मन अगदी प्रसन्न होते. अशीच काहीशी पण थोड्या वेगळ्या ढंगाची कलाकारी सादर करतेय बंगळूरूची ही स्त्री !
बंगळूरूमध्ये राहणाऱ्या पारुल कनोडिया या व्यवसायाने तश्या ग्राफिक डिजाईनर आहेत, पण त्यांच्या अंगातील कला त्यांना स्वस्थ बसू देत नाही आणि त्यातूनचं त्यांना छंद जडला अंकांच्या माध्यमातून गणपती बाप्पा साकारण्याचा ! ऐकताना काहीतरी वेगळ वाटतंय ना ! अंकातून गणपतीची प्रतिमा साकारण्याच्या कलेबद्दल तुमच्यापैकी बऱ्याच कमी जणांना ठाऊक असेल, पण विश्वास ठेवा ही कला जितकी निराळी आहे तितकेच या कलेतून निर्माण होणारे गणपती देखील निराळे आहेत.
असा प्रयत्न भारतात पहिल्यांदाचं कोणीतरी केला आहे आणि आपल्या पहिल्याच प्रयत्नात थोडे का होईना पण त्यांना यश मिळाले आणि १ ते ९ या अंकांच्या माध्यमातून त्यांनी अखेर बाप्पा रेखाटूनचं दाखवला. या आगळ्यावेगळ्या कलेवर अधिक भर देऊन त्यात नैपुण्य मिळवण्याचं त्यांच स्वप्न आहे. जेणेकरून या कलेचा संपूर्ण जगभर प्रसार करता येईल.
अंकांच्या सहाय्याने गणेशाच्या प्रतिमा रेखाटण्याचा हा तर झाला त्यांचा छंद, पण त्या व्यावसायिकदृष्ट्या जे काम करतात ते पाहून देखील अगदी थक्क व्हायला होतं.
—
===
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.