Site icon InMarathi

नाझी कॅम्प मध्ये समलैंगिक स्त्री-पुरुषांवर झालेले अघोरी अत्याचार – वाचून थरकाप उडेल!

same sex couple inmarathi Feature

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

काही दिवसांपूर्वीच भारतामध्ये सेक्शन ३७७ बाद करण्यात आले थोडक्यात काय तर समलैंगिकता आपल्या देशात गुन्हा राहिलेला नाहीये संविधानानुसार एवढच, मात्र समाजात मान्यता मिळेल का? याच उत्तर देणं तस कठीण. सेक्शन बाद कारण्याअगोदरही समलैंगिकता होतीच हे मुळात लोकांना कळत नाहीये.

एखाद्याला त्याच्या/तिच्या मनाप्रमाणे वागू देण्याचा आणि लग्न करण्याचा हक्क हा महत्वाचा आहे. त्यातल्या त्यात भारत देश विकसनशील देश असला तरी इथे पुरोगामी विचार मांडणारा आणि आचरणास आणणारा मोठा वर्ग आहे.

भारतात अनेक गोष्टी वाईट मानल्या जातात आणि त्यापैकीच एक म्हणजे समलैंगिकता.

पहिल्यांदा यांचा नेमका अर्थ समजून घेऊ एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील लैंगिक आकर्षण व समागम असण्याला समलैंगिकता असे म्हणतात. गोष्ट पटायला थोडी कठीण मात्र असे लोक आपल्या समाजात नाहीच आहेत असं म्हणून कसं चालेल?

 

 

याच समाजाचा एक दुसरा भाग म्हणजे तृतीयपंथी आता हा भाग आपल्या मूळ समाजात बसत नाहीच हे म्हणायला काही हरकत नाही. तृतीयपंथींचं जीवन नेहमीच संघर्षपूर्ण राहिलं आहे अगोदर त्यांना स्वतःला समजायला वेळ लागतो कि ते अशे का आहेत आणि नंतर समाजाशी झगडत जीवन व्यतीत करावं लागतं.

नेमके आपण असे का आहोत याचं उत्तर मिळवणं आणि स्वतःला जसे आहोत तसे स्विकारणं याला मोठं धाडस लागत.

जसं मी अगोदरही लिहलं आहे समलैंगिकता ही काय आजच्या काळातीलच आहे असं नाही याचे मूळ अनेक शतकापासून आहेत, एवढच नाहीतर काही पैराणिक कथांमध्ये असा संदर्भ आढळतो, यलम्मा देवीचे पूजन करणारे ही बरेच आहेत.

यलम्मा देवीला तृतीयपंथींची देवी म्हणून ओळखले जाते.

भारतात या गोष्टी बऱ्याच दिवस उघडकीस आल्या नाही मात्र पाश्चत्य देशात कहाणी काही वेगळी होती, अशा गोष्टी समोर आल्या. त्यांना काहींनी स्वीकारलं मात्र काहींनी अश्या लोकांचं जगणं मुश्किल करून टाकलं, त्यापैकीच एक असा नाझीकाळ.

नाझीकाळ १९३३ ते १९४५ दरम्यान जर्मनीत अस्तित्वात होता. वाढती बेरोजगारी, महायुद्धानंतर जर्मनीला मिळालेली हीन वागणूक, ज्यूविरोध व देशप्रेम भावना ह्यांचे भांडवल करून नाझी पक्ष १९३० सालापर्यंत जर्मनीमधील एक बलाढ्य राजकीय पक्ष बनला होता.

 

 

१९३३ साली हिटलरला जर्मनीचा चॅन्सलर घोषित करण्यात आले. त्यानंतर हिटलर व त्याच्या नाझी सहकाऱ्यांनी जर्मनीमधील इतर सर्व पक्ष बरखास्त केले व राजकीय विरोधकांना तुरूंगात डांबले अथवा ठार मारले. ह्याच वर्षी नाझी जर्मनीची स्थापना झाली व ह्या राष्ट्राचा संपूर्ण अंमल नाझी पक्षाच्या हातात आला.

नाझी जर्मनीने तिच्या प्रभावाखालील भागांमध्ये अनेक छळछावण्या उभ्या केल्या, इ.स. १९३३ मधील राइशस्टागच्या आगीनंतर त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर घालण्यात आली.

राजनैतिक कैदी व शासनाचे शत्रू यांच्यासाठी या छावण्या बनविण्यात आल्या होत्या. इ.स. १९३९ ते १९४२ दरम्यान छळछावण्यांची संख्या चार पटीने वाढली.

इ.स. १९४२मध्ये तीनशेहून अधिक छावण्या उभारल्या गेल्या होत्या. त्यामध्ये युद्धकैदी, ज्यूधर्मीय, अपराधी, समलैंगिक संबंध ठेवणारे, जिप्सी, मानसिकदृष्ट्या आजारी व इतर अनेकांना न्यायालयीन चौकशीविना ठेवण्यात आले होते.

या छावण्यांपैकी समलैंगिक छावण्यांबद्दल आपण बोलणार आहोत, पाश्चत्त्य देश म्हटले की सगळा मोकळेपणाचा कारभार असा काहीसा समज आपल्याकडे आहे.

पण जर्मनीसारख्या देशात देखील अनेक पिढय़ांना समलैंगिकता समजावून घेताना आणि सामावून घेताना वेळ लागला. आज जर्मनीमध्ये समलैंगिक लोकांविषयी बरीच जागरूकता असली तरी हा प्रवास सोपा नव्हता. नाझी राजवटीत समलैंगिक लोकांना छळछावण्यामध्ये डांबण्यात येत असे.

 

 

culturacolectiva.com

 

समलैंगिकता पूर्णपणे गुन्हा समजण्यात येत असे, कोणत्याही प्रकारचा खटला न चालवता मरणशिक्षा होत असे. १९३३ ते १९४५ दरम्यान १ लाख लोकांना समलैंगिकता गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती, यातील ५० हजार लोकांना शिक्षा देण्यात आली होती.

लोकांना छळछावण्यात ठेवण्यात आले होते. छळछावण्यात राहण्यापेक्षा लोकं मरण पसंद करत.

छळछावणीत सुमारे १०००० ते १५००० समलैंगिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, मात्र छळछावण्यांमध्ये सुमारे ६०% लोकं मरण पावल्याचे समजते त्यामुळे हा आकडा याहून ही मोठा असु शकतो.

 

haaretz

 

रेल्वे स्थानकापासून लांब असलेल्या या छळछावणीत येताना कैद्यांना चालवत आणले जात असे. अनेक ठिकाणच्या छळछावण्यांच्या दारावर ‘अरबाईटमाख्त फ्राय’ (Arbeit macht frei) ही अक्षरं कोरलेली आहेत.

‘काम(तुम्हाला)मुक्त करेल’अशा अर्थाचे हे वाक्य. पण या कामाने नक्की कशा प्रकारची ‘मुक्ती’ मिळेल हे आत जाणा-या कैद्यांना कल्पनादेखील आली नसेल. प्रवेशद्वारातून आत गेलेल्या कैद्यांना बाहेर पडण्याचा मार्गच नव्हता.

छळछावणीच्या सभोवताली जवळपास ३०० व्होल्ट विजेचा प्रवाह असलेले कुंपण घातलेले असे. त्यामुळे कोणी पळून जायचा प्रयत्न करू शकत नसे.

चहूकडे लक्ष जाईल अशा ठिकाणी उभारलेल्या गार्ड टॉवर्सवर बंदुका घेऊन असलेले गार्डसना पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या कैद्यांना गोळी घालण्याची मुभा असे.

त्यामुळे छळछावणीतला अन्याय सहन करण्यापलीकडे दुसरा पर्याय नसे. दिवसभर अंगमेहनतीचे काम केल्यानंतर मळलेले कपडे घेऊन तसेच झोपी जायचे आणि तेच कपडे घालून सकाळी पुन्हा कामाला लागायचे. त्यामुळे छळछावणीत सगळीकडे अनारोग्य पसरत असे.

 

 

त्यातच पायात घालायला लाकडी तळ असलेले जोडे मिळत असत. या जोडय़ांमुळे पायाला जखमा होत. त्याचा संसर्ग होऊन तो दुसरीकडे पसरे आणि अनेक लोकं त्याला बळी पडत. छळछावणीमध्ये आलेले लोक माणूस म्हणून जगण्यास अयोग्य आहेत असे समजून एस. एस. फोर्सचे लोकं त्यांच्यावर अनंत अत्याचार करत असत.

छळछावणीत आल्यावर सगळ्यांच्या डोक्यावरचे केस कापून टाकण्यात येत असत. पट्टय़ांचे पोषाख, त्यावरचे नंबर, मुंडन केलेले डोके यामुळे कुणाचेही वेगळे अस्तित्व झाकून टाकत असे.

जवळपास सगळ्या छळछावण्यांमध्ये एकाच पद्धतीने काम चालत असे. छळछावणीत प्रवेश करताना कैद्यांना आपले कपडे, सामान तिथेच सोडून द्यावे लागे.

 

 

आत गेल्यावर त्यांना पट्टयापट्टय़ांचा पोषाख देण्यात येत असे. आणि मिळत असे नंबर. हा नंबरच कैद्याची ओळख बनून राहत असे. या छळछावण्यांमध्ये एकेकाळचे सधन लोक, लेखक, प्रोफेसर फक्त नंबर बनून राहिले होते.

अनेक ठिकाणी हा नंबर छळछावणीत येणा-या लोकांच्या शरीरावर गोंदवला जात असे तर कधी त्यांना मिळणा-या पोषाखाला लावलेला असे.

या छळछावणीत येणा-या कैद्यांचे वर्गीकरण करण्यासाठी नंबरसोबत विविध रंगातील त्रिकोणदेखील त्या पोषाखाला लावण्यात येत असे. त्यावरून तो कैदी कुठल्या कारणासाठी छळछावणीत आणला आहे हे समजायला एस. एस. फोर्सला मदत होत असे.

गुन्हेगारांसाठी हिरव्या रंगाचा त्रिकोण, राजकीय कैद्यांसाठी लाल रंगाचा त्रिकोण, समलैंगिक संबंध ठेवणारे कैद्यांना गुलाबी रंगाचा त्रिकोण असे वेगवेगळे रंग वापरले जात. सगळ्या छळछावणीमध्ये ज्यू लोकांच्या पोषाखावर ता-याच्या आकाराचा पिवळ्या रंगाचे कापड वापरण्यात येत असे.

 

 

news18.com

नाझी राजवट संपुष्टात आल्यानंतर बराच काळ समलैंगिकता गुन्हा मानला जात होता. आजच्या कायद्यानुसार जर्मनीने समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता दिली असली, तरीही अजूनही समलैंगिक लग्नाला मान्यता मिळालेली नाही.

समलैंगिक संबंधांबाबत ब-याच मोकळेपणे जर्मन लोकं बोलतात हे देखील महत्त्वाचे. सामान्य माणसापासून, मंत्रिमंडळातील नेतादेखील आपले समलैंगिक संबंध जगासमोर मांडतो, हे या देशाचे व नागरिकांचे यश मानायला हवे.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version