Site icon InMarathi

चीनमधील ‘स्त्री-सौंदर्याचा’ असुरी मापदंड जगात कुठेही बघायला मिळणार नाही!

chinese girl 3 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

स्त्रिया आणि त्यांचे सौंदर्य ह्या विषयावर अनेकांनी म्हणजे पुरातन काळापासून ते आज पर्यंत फार छान छान वर्णने करून स्त्रियांना खूप महत्व दिले आहे.

एक मराठी ठसकेबाज गाणं कदाचित तुम्ही कधी ऐकलं असेल… आली ठुमकत.. नार लचकत.. मान मुरडत.. हिरव्या रानी… गंsssss.. साजणीssssss.

ह्या संपूर्ण गाण्यात जे काही वर्णन आहे त्या प्रमाणेच एक ठसकेबाज सौंदर्यवती आपल्या डोळ्या समोर उभी राहते. ह्या गाण्यातल्या प्रत्येक शब्दातून तिचं सौंदर्य खुलत जातं. इतक्या सुंदर स्त्रिया असतात असा भास ह्या वर्णनातून आपल्याला होतो.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा –हे १० पदार्थ जे आपण इथे ‘चायनीज’ म्हणून खातो ते खुद्द चीनमध्ये सुद्धा मिळत नाहीत!

मस्तानी ही अशीच सौंदर्यवती जिच्या सौंदर्याने बाजीरावाचं चित्त विचलित झालं. मेरेलीन मनरोच्या सौंदर्याने तर असंख्य लोक घायाळ झाले होते. ह्या जातीच्याच सौंदर्यवती होत्या. त्यांना त्यांचे सौंदर्य खुलवायला काही फार मेहनत करावी लागली नाही. जन्मतःच त्या सुंदर होत्या.

 

 

त्यानंतर च्या काही सुंदरा त्यांच्या साज शृंगाराने त्यांचं सौंदर्य खुलवत होत्या, कपडे, हेअरस्टाईल, मेकअप, ह्या मुळे त्या अधिक सुंदर दिसायच्या.

 

 

काही आपल्या कलेतून आपलं सौंदर्य दाखवू शकत होत्या. आजसुद्धा काही सुंदर नृत्त्य करणाऱ्या सौंदर्यवती अप्सरा म्हणून प्रसिद्ध झाल्या आहेत.

काही सिनेमात कामे करणाऱ्या हिरॉईन ह्या चांगले दिसण्यासाठी आपल्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरीने काही बदल करून सौंदर्य खुलवून सिनेमात कामे करायला लागल्या. आपले नाक, डोळे, भुवया, चेहरा ह्यावर प्लास्टिक सर्जरी करून त्यांचे सौंदर्य अधिक खुलले. आणि त्यांचे सिनेमातले स्थान कायम राहिले.

 

 

काही देशात तर आता प्लास्टिक सर्जरी अनिवार्य असल्या प्रमाणेच सर्रास तिचा वापर करून चेहेऱ्यात वेगवेगळे बदल केले जात आहेत.

 

अनेक पाश्चिमात्त्य देशांत जर स्त्रियांचा जबडा रुंद असेल तर तो काढून दुसरा जबडा बसवला जातो आहे, त्यामुळे त्या स्त्रीचा चेहरा बारीक दिसतो आणि तिच्या सौंदर्यात भर पडते. अशी ही प्लास्टिक सर्जरी सौंदर्याचा एक माप दंड म्हणून केली जाऊ लागली आहे.

काही सौंदर्यवती प्लास्टिक सर्जरीचा उपयोग स्तनांसाठी अथवा नितंबांसाठी, शरीर सुडौल बनवण्यासाठी सुद्धा करत आहेत. शरीरातली अतिरिक्त चरबी हटवून शरीर व्यायाम न करता सुडौल करण्यासाठी अशा उपाय योजना केल्या जात आहेत.

 

 

परंतु सौंदर्याचा मापदंड म्हणून ओळखली जाणारी, एक अतिशय धक्का देणारी, चीन मधली प्रथा फारच वेगळी आणि भयानक वाटते.

काय आहे हा चीन मधल्या सौंदर्यावतींचा “सुंदर स्त्री” म्हणून वापरला जाणारा मापदंड? जाणून घेऊ..

चीनमधल्या स्त्रिया ह्या सुंदर असतात का असे भारतीय स्त्रियांना जर विचारले तर उत्तर येवू शकते “हो”. पण ह्या स्त्रिया आपल्याला एकसारख्या चेहेऱ्याच्याच वाटतात. कारण त्यांची नाके एकसारखीच असतात. सरळ अथवा टोकदार नाक म्हणजे आपण म्हणतो तसे चाफेकळी नाक हे चीनमध्ये सहसा पाहायला मिळत नसावं. म्हणून तिथल्या स्त्रिया ह्या सुंदर असतात हे कसं ठरतं ?

लग्नासाठी ही मुलगी सुंदर म्हणून तिचे लग्न ठरते ते तिच्या अतिशय छोट्या पावलांवरून. ज्या स्त्री ची पावलं खूप छोटी असतील त्या स्त्रीला लग्नासाठी त्वरित पसंती मिळते.

 

आता अतिशय छोटी पावलं म्हणजे नक्की केवढी? तर छोट्या मुलांचे बूट जर त्या स्त्रीने पायात घातले तर सहज त्यात पाय मावला पाहिजे.

लहान मुलांचा बूट हा आपल्या मोठ्यांच्या बुटाच्या अर्धा असतो असे म्हणायला काहीच हरकत नाही. इतक्या लहान बुटामध्ये मोठ्या व्यक्तीचा पाय बसणं शक्यच नाही. आपण ट्राय करू शकतो. पण ह्या चिनी सुंदरांचा पाय त्या बुटामध्ये सहज बसतो. तो कसा काय?

 

 

लहानपणापासूनच ह्या मुलींना छोट्या बुटांची सवय करून दिली जाते. वयाच्या चार पाच वर्षापासूनच ह्या मुलींना छोटेच बूट वापरायला देतात. त्यांचाही पाय वयाप्रमाणे वाढतच असतो पण त्यांना बूट मात्र छोटेच वापरायला दिले जातात. ह्या छोट्या बुटात पाय राहून राहून त्याची वाढ खुंटली जाते. पण ती किती?

नंतर नंतर तर पायाची बोटे सुद्धा पायाच्या खाली दुमडून नंतर त्याच छोट्या आकाराचा बूट वापरला जातो आणि पायाची वाढ होऊ दिली जात नाही.

शरीर मोठे झाले तरी पाय मात्र लहान मुलांप्रमाणेच छोटे राहतात. त्या पायांची वाढ आपल्यासारखी होत नाही.

 

 

ज्या मुलीचे पाय लहान मुली सारखे छोटेच असतात ती म्हणजे सर्वात सुंदर मुलगी ठरते आणि लग्नासाठी तिची ताबडतोब निवड केली जाते. उतार वयात मात्र अशा लहान पावलांच्या स्त्रियांना खूप त्रास सहन करावा लागतो.

कधी कधी चालत येत नसल्याने व्हील चेअर वापरावी लागते. अगदी अधू असल्यासारखे जगावे लागते.

 

 

ही चीन मधील सौंदर्याच्या मापनाची धक्कादायक पद्धत आजही अस्तित्वात आहे. गेल्या काही वर्षांपासून, या विचारामध्ये बदल होत आहे असे दिसते, परंतु हा प्रकार पूर्णपणे थांबला आहे असे म्हणता येणार नाही.  आपल्याला अघोरी वाटणारी, पण त्यांच्याकडे “एक सौंदर्यवती बनवणारी” ही पद्धत रूढ आहे.

 

 

ह्या सौंदर्यासाठी कुठे काय पद्धत अवलंबली जाते ते ऐकून नवलच वाटते.

पण खरे सौंदर्य हे जे जन्मतः च मिळालेले सौंदर्य. त्यात आपण कृत्रिम बदल करून वाढ केलेलं सौंदर्य हे खरं सौंदर्य म्हणता येणार नाही.

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version