Site icon InMarathi

Sci Fi Thriller : Prometheus: या चित्रपटाने निर्माण केलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आजही सुरु आहे

film inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक – नीरज कुलकर्णी

रोमन साम्राज्यातील ग्लॅडिएटर्स ची कथा असो, Exodus सारखा मायथॉलॉजिकल विषय असो किंवा अगदी अलीकडच्या Martian सारखी विज्ञानकथा असो – मनोरंजन मुल्या पेक्षा नक्कीच थोडा अधिक आशय प्रेक्षकापर्यंत पोहोचवणे हा रिडले स्कॉटच्या चित्रपटातील एक पॅटर्न लक्षात येतो.

त्याच्या चित्रपटातून आज पर्यंत कुठल्या न कुठल्या मूलभूत विषया ला हात घातलेला आहे.

 

 

अशाच पॅटर्न मध्ये २०१२ साली आलेल्या Prometheus  कडे पहिले तर यात बऱ्याच गोष्टी आढळतील.

तसं Prometheus हे नाव ग्रीक पौराणिक कथांतील देवतेचं. पण या कथेला अगदी चपखल बसणारं. मूळ ग्रीक कथेनुसार – प्रोमेथियस ने देवांचा शासक Zeus च्या इच्छे विरुद्ध Olympus वरील अग्नि चोरून मानव जातीच्या कल्याणा साठी मानवाला दिला. यामुळे चिडलेल्या Zeus ने त्याला बहिष्कृत करून अनंत काळासाठी शिक्षा दिली.

या कथा ग्रीक पुराणात असल्या पासूनच प्रोमेथियस हा totalitarian किंवा सर्वांकष देवते विरुद्ध मानव जाती च्या संघर्षा चे किंवा मानवाच्या अधिक प्रगत बनण्या च्या प्रयत्ना चे रूपक म्हणून आजवर बऱ्याच वेळा वापरले गेलेले आहे.

याचच सर्वात लोकप्रिय उदाहरण म्हणजे मेरी शेली ची Frankenstien, the Modern Prometheus ही कादंबरी.

एका वैज्ञानिका ने मृत व्यक्ती चे अवयव जोडून त्यापासून मानावा सारखा सजीव निर्माण करणे अन् जीवन निर्मिती वर असलेल्या ईश्वराच्या मक्तेदारी ला आव्हान देणे, हा त्याचा मुख्य कथा भाग.

हे रूपक मागच्या काही शतकातील मानवा ने विकसित केलेल्या कित्येक तंत्रज्ञानाला किंवा संशोधना च्या बाबतीत वापरलं जाऊ शकतं, उदाहरणार्थ dynamite चा शोध असो, की अणूतंत्रज्ञान असो किंवा अगदी अलीकडचे माहिती तंत्रज्ञान. हेच रूपक वापरून स्कॉट ने आणलेला चित्रपट म्हणजे प्रॉमीथियस.

 

 

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कथेत Panspermia या वैज्ञानिक संकल्पनेचा ancient aliens या लोकप्रिय संकल्पने शी घातलेला मेळ.

Panspermia सिद्धांतानुसार पृथ्वी वरील जीवना ची सुरुवात ही पृथ्वी वर न होता इतरत्र कुठे तरी आधी च झालेली आहे व तिथून अंतराळात विखुरलेल्या उल्का किंवा धूमकेतू मार्फत तेथील सूक्ष्म जीव पृथ्वी पर्यंत पोहोचले अशी शक्यता आहे असे मानतात.

या सूक्ष्म जीवांच्या उत्क्रांती मधून पृथ्वी वरील जीवसृष्टी विकसित झाली. यातील दुसरी संकल्पना म्हणजे ancient aliens ची. ती म्हणजे प्राचीन काळा पासून आपल्या पूर्वजांना परग्रह वासी हे भेट देत असत व त्यांचे पुरावे कुठे तरी इतिहासात सापडतील.

तशी ही संकल्पना pseudoscience  किंवा pseudo-history ह्या प्रकारात मोडणारी, म्हणून त्यात फार तथ्य असेलच असं नाही पण त्याचे मनोरंजन मूल्य मात्र आहे.

भविष्यात – सन २०८९ मध्ये – पुरातत्व शास्त्रज्ञ असलेल्या नायिकेला, प्रागैतिहासिक काळापासून मानवाला परग्रहवासी भेट देत असावेत असा पुरावा सापडतो.

गुहांमधील भित्ती चित्रे व त्यातून मिळालेला अवकाशातील स्थाना चा नकाशा हे तिकडे जाण्यासाठी पुरेसे प्रत्यक्ष पुरावे नसले तरी त्यासाठी च्या मिशन ला एक महत्वाकांक्षी कंपनी चा CEO फंड पुरवतो.

या मिशन मधील अंतराळ यानाचं नाव आहे प्रोमेथियस…! आपल्या निर्मात्या कडे मानवाला घेऊन जाणारा प्रोमेथियस. इथून पुढच्या कथेत, हे यान ठरलेल्या ग्रहावर लँड झाल्यानंतर मात्र हा चित्रपट थरार पट बनतो.

या थरारा व्यतिरिक्त अन त्याही पेक्षा जास्त उत्कंठा वर्धक आहेत ते म्हणजे, कृत्रिम असलेला व अगदी माणसासारखा असणारा रोबोट डेविड, त्याला पडलेले प्रश्न, त्याने प्राचीन भाषांचा अभ्यास करून शिकलेली alien भाषा आणि  प्रगत alien ला भेटल्या नंतर त्याने मनुष्याप्रती दाखवलेली तुच्छता.

 

 

 

ह्या चित्रपटाने असे बरेच प्रश्न उपस्थित केले ज्यांच्या बद्दल आपल्याला कायम कुतूहल वाटत राहील आहे. १९७९ साली आलेल्या alien चित्रपटा चा प्रिक्वेल म्हणून हि कथा मांडण्यात आली. ह्याचाच पुढचा भाग म्हणून Alien: Covenant येत आहे.

प्रोमेथियस ने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यात अपेक्षित आहेत.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version