सिनेमातला हा ‘रॉकस्टार’ खासगी जीवनात कसा आहे? उत्तरं वाचून त्याच्या आणखी प्रेमात पडाल
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारतीय सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूड हे जगाला आकर्षित करणारं क्षेत्र आहे. आपल्याकडचे सिनेकलाकार परदेशातही प्रसिद्ध आहेत. इथल्या मसाला पटांना सगळीकडे भरपूर मागणी आहे.
इथले हिरो असतातच मुळी सगळ्यांनी प्रेमात पडण्यासारखे. दर शुक्रवारी नवीन चित्रपट येतो आणि चाहत्यांच्या मनावर गारुड करतो. सगळे जग भुलवून टाकेल अशीच ही चंदेरी दुनिया आहे.
हिंदी सिनेसृष्टीनी आपल्याला खूप चॉकलेट हिरो, मॅचो हिरो, रोमँटिक हिरो दिले आहेत.
आता ह्या जुन्या काळच्या कलाकारांची पुढची पिढीही बॉलिवूडमध्ये आपले नशीब अजमावू पहात आहे. काही हिरो अगदीच टुकार निघाले तर काही तुफान चालले..
गतपिढीतील चॉकलेट हिरो स्वर्गीय ऋषि कपूरचा मुलगा रणबीर कपूर सावरिया चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये आला. संजय लीला भन्साळीचा त्याच्याच स्टाईलचा भव्य सिनेमा असून देखील तो फ्लॉप झाला..

पहिलाच सिनेमा फ्लॉप असे नाव रणबीरला मिळाले खरे. पण नंतर एक पाठोपाठ सुपरहिट चित्रपट देत रणबीरने मात्र कधीच मागे वळून पाहिले नाही.
आ अब लौट चले आणि ब्लॅक सिनेमाचा असिस्टंट डायरेक्टर असलेला रणबीर नंतर स्वतःच्या नावावर यश कमवत गेला.
बचना ए हसिनो, ये जवानी है दिवानी, अजब प्रेम की गजब कहानी, अंजाना अंजानी, रॉकस्टार, वेक अप सिड, बर्फी, राजनीती, एय दिल है मुश्किल, जग्गा जासुस, संजू असे आणि अजून बरेच सिनेमे रणबीरच्या नावे आहेत.
काही ऑफ बिट तर काही मसाला चित्रपट रणबीरने केले. त्याच्या अभिनयाचं कायम कौतुक होत आलेय. त्याला बेस्ट डेब्यू ते बेस्ट ऍक्टर असे सगळेच पुरस्कार मिळालेले आहेत.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन हा कलाकार देखील यशस्वितेच्या पायऱ्या चढत आहे.
तसे तर कपूर घराणेच अतिशय प्रसिद्ध आहे. पृथ्वीराज कपूर, राज कपूर, शम्मी, शशी, ऋषी, रणधीर आणि आता रणबीर कपूर.. ह्या कपूर घरातल्या स्त्रियादेखील प्रसिद्ध आहेतच.
ह्याच सगळ्यांच्या अभिनयाचा वारसा घेऊन रणबीर आपली वाट बनवतो आहे.
इतके यश प्राप्त झालेले असताना, इतकी प्रसिद्धी मिळत असताना, भल्याभल्यांना ती सांभाळता आलेली नाही. कित्येक जणांच्या डोक्यात हवा जाऊन ते बिथरले होते.
आपण हिरो आहोत म्हणजे फार कोणी भारी माणूस आहोत असे वाटणारे कलाकार या सिनेसृष्टीत पूर्वीपासून आहेत आणि आजही सापडतात.
पण मोठया घराण्याचा वारसा आणि स्वतः मिळवलेली प्रसिद्धी, यश यापैकी कोणत्याच गोष्टी रणबीरने आपल्या डोक्यात जाऊ दिलेल्या नाहीत.

एक कलाकार म्हणून जसा तो सगळ्यांना आवडतो तसाच एक माणूस म्हणूनही. तो त्याच्या फॅन्सचा लाडका आहे. खरे तर कलाकाराला उंचावणे किंवा पाडणे हे त्यांच्या चाहत्यांवर अवलंबून असते.
पण रणबीरचे चाहते त्याच्या सिनेमावरच नाही तर, त्याच्या एरवीच्या वागण्यामुळे, अदबीमुळेदेखील त्याला डोक्यावर ठेवतात. Quora ह्या वेबसाईटवर रणबीरच्या चाहत्यांनी आपापले रणबीर सोबतचे किस्से शेअर केले आहेत.
१. रणबीर खूपच साधा माणूस आहे
जयपूरचा निवासी अजय निर्वाण स्वतःचा अनुभव सांगतो की, एका हॉटेलच्या जिममध्ये व्यायाम करताना अजय तिथे लागलेली फुटबॉल मॅच पाहत होता. त्याच्यामागे कोणीतरी बराच वेळ मॅच पाहत उभे होते.
काही काळाने अजयने मागे वळून पाहताच रणबीरने त्याच्याशी त्या मॅचबद्दल थोड्या गप्पा मारल्या, हस्तांदोलन केले आणि नंतर त्याच्या सोबत व्यायामही केला.
जणू काही जुना मित्रच असावा असे रणबीर वागत होता. त्याचे साधे सरळ वागणे अजय ला खूप भावले.
२. रणबीर खूप अदबीने वागतो
रिया सलीयन नावाची रणबीरची चाहती म्हणते की,
मी त्याला भेटायला त्याच्या कृष्णा राज बंगल्यावर गेले होते. त्याला जवळ जवळ २ तास लागले. पण आल्या आल्या त्याने मला ताटकळत ठेवल्याबद्दल माझी माफी मागितली आणि एक ‘टेडी हग’ दिला..
मी नक्कीच असे म्हणेन की रणबीर चाहत्यांशी खूप अदबीने वागतो.
३. रणबीर त्याच्या चाहत्यांवर तितकेच प्रेम करतो जितके त्याचे चाहते त्याच्यावर करतात.

मानसी दत्ता ही रणबीरची चाहती सांगते की, जेव्हा रणबीरला रॉय चित्रपटाच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी भेटले तेव्हा मुलाखत झाल्यावर तो जायला लागला.
तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांना त्याच्या बरोबर फोटो काढायचे होते. त्याच्या PR टीमने देखील मनाई केली. पण, रणबीरने जितके शक्य होतील तितके फोटो चाहत्यांसोबत काढून दिले.
इतकेच नाही तर रणबीरचा सगळ्यात लहान चाहता माझा लहानगा भाचा जो फक्त ५ वर्षांचा आहे तो माझ्यासोबत होता.
तेव्हा रणबीरने त्याला हॅलो करून त्याच्या सोबतही फोटो काढून दिला आणि मगच तो निघून गेला. लहान असो व मोठे प्रत्येक चाहत्यांची रणबीर कदर करतो.
–
- “के तेरा हिरो इधर है!” : वरूण धवन : जबरदस्त ताकदीचा ऑलराउंडर कलाकार
- ह्या बॉलीवूड कलाकारांनी एक रुपयाही न घेता चित्रपटात काम केले आहे!
–
४. रणबीरला भेटल्यावर तो परका वाटत नाही
शीतल मौर्य नावाची रणबीरची चाहती रणबीर बद्दलचा एक सुंदर किस्सा सांगते. मी रणबीरला माझ्या जर्नालिझमच्या इंटर्नशिपवेळी भेटले. तो इतका गप्पा मारतो की तो कोणी मोठा स्टार आहे हे कोणाला जाणवणार नाही.
आपल्या आवडीच्या विषयांवर त्याने गप्पा मारल्याने तो परका वाटलाच नाही. त्याचा आवाजही अत्यंत गोड आहे. तो बोलताना खूप हसवतो देखील. हे २० मिनिटांचे संभाषण माझ्या कायम लक्षात राहील.
५. रणबीरला भेटलो नाही तरी तो बाकी अभिनेत्याच्या पेक्षा तोच जास्ती हुशार वाटतो
रणबीरच्या चाहता असलेला अलोक वर्मा सांगतो की, मी रणबीरच्या अभिनयाचा फॅन तर आहेच पण मी त्याला सोशल मीडियावर सुद्धा फॉलो करतो.

त्याचे जेवढे पब्लिक अपिअरन्स आणि इंटरव्ह्यू मी पाहिलेत त्यातून तो अतिशय गोड स्वभावाचा माणूस आहे हे सतत जाणवते.
बाकी अभिनेत्यांपेक्षा तो हुशारही वाटतो. खूप मेहनत घेऊन इमानदारीने तो आपले काम करतो. मी त्याचा मोठा फॅन आहे.
६. रणबीर हजरजबाबी आहे.
झिल कोठारी सांगत की, मी त्याला एखाद दोन मिनिटांसाठी भेटले होते. पण त्याच्या बोलण्यावरून तो चतुर आणि हजरजबाबी वाटला. त्याचे खूप इंटरव्ह्यू मी बघते. पण मीडिया त्याची जी बदनामी करते तसा तो अजिबात वाटतच नाही.
७. मितभाषी असला तरी तो टॅलेंटेड आहे
जय भट नावाचा चाहता म्हणतो, रणबीर मितभाषी आहे, शांत स्वभावाचा आहे पण, तो प्रचंड टॅलेंटेड आहे. तो एक जेंटलमन आहे.
कोणतीही गोष्ट बोलण्यापूर्वी तो ती विचारपूर्वकच बोलतो. उथळपणा तर अजिबात नाही त्याच्यामध्ये.
हे किस्से ऐकून चाहत्यांमध्ये त्याची किती क्रेझ आहे ते जाणवते.

रणबीर कपूरच्या खाजगी आयुष्यातील आलेली वादळे पाहता त्याला ‘कॅसानोवा’ ही पदवी सुद्धा मिळाली आहे.
त्याचे लहानपण आई वडिलांच्या भांडणाने उध्वस्त झाले होते. त्यामुळे त्याला लग्नाच्या कमिटमेंटची भीती सुद्धा वाटते अशी माहिती त्याने स्वतःच एक मुलाखतीत दिली होती.
सिनेसृष्टीत आल्यावर त्याचे सोनम कपूर, दीपिका पदुकोण, कतरीना कैफ ह्या सगळ्यांशी एक पाठोपाठ एक प्रेमसंबंध होते. पण कालांतराने त्याचे ह्यांच्याशी जमले नाही. मिडियामध्ये त्याचे खूप नाव खराब झाले.
त्याचे काही सिनेमे फ्लॉप झाले. त्याने पब्लिकली काहीही बोलायचे टाळले. असा ‘बॅड पॅच’ म्हणजेच वाईट काळ सगळ्यांच्याच आयुष्यात येतो.
पण ह्या सगळ्याला न घाबरता रणबीर पुढे जात आहे. संजय दत्तवर बायोपिक करून त्याने पुन्हा आपले नाव मिळवले. संजय दत्तशी अगदी सार्धम्य साधणारा अभिनय केला आणि लोकांनी तो नावाजलाही.

अजूनही पुढे त्याचे नवीन सिनेमे येत आहेत. आलीया भट बरोबर तो ‘स्टेडी रिलेशनशिप’ मध्ये आहे असेही बोलले जाते.
रणबीर कसाही असला तरी चाहत्यांच्या मनात मात्र त्याची छबी कायमच चांगली राहिली आहे. त्याच्या गोड वागण्यामुळे, चाहत्यांना प्रेम आणि आदर देण्याच्या त्याच्या स्वभावामुळे तो नेहमीच नंबर वन च्या स्थानावर राहील..!
–
- डेव्हिड धवन…चोरी प्रांजळपणे कबूल करणारा “दिल का सच्चा” डायरेक्टर
- देवाच्या थियेटरमधे एक गुणी अभिनेता: ओम पुरींना श्रद्धांजली
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.