' साखरझोपेतून उठणे शक्य होत नाहीये, मग या गोष्टी तुम्हाला नक्की मदत करतील! – InMarathi

साखरझोपेतून उठणे शक्य होत नाहीये, मग या गोष्टी तुम्हाला नक्की मदत करतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्यापैकी काही जणांसाठी सकाळी लवकर उठणे म्हणजे फक्त बिछान्यातून लवकर बाहेर पडणे. त्यानंतर चहाचा किंवा कॉफीचा तिसरा कप खाली उतरेपर्यंत झोंबीसारखे आजुबाजूला फिरत राहणे. त्यानंतर एक छोटी डुलकी काढली की मगच जरा तरी बरे वाटायला लागते.

पण हे बरोबर नाही. सकाळी लवकर उठून प्रभावीपणे त्या वेळेचा वापर करून घ्यायचा असेल तर, तुम्हाला तुमच्या झोपेचे घड्याळ रिसेट करावे लागेल. लवकर उठण्यासाठी काही इतर चांगल्या सवयी अंगी बाणवाव्या लागतील.

त्या सवयी कोणत्या हे आम्ही सांगणार आहोत…

१. वेळापत्रकात अचानक मोठे बदल करू नका

तुम्ही एकदम उद्यापासून दोन तास आधी उठतो असं म्हणाल तर हा बदल दोन किंवा चारच दिवस टिकणारा असेल. शिवाय तुमच्या शरीराला एकदम दोन तास अलीकडे आणलेली झोप झेपेलंच असं नाही. त्यापेक्षा हळूहळू १०-१५ मिनिटे अलीकडे उठायची सवय लावा.

जवळपास आठवडाभर त्या उठण्याची सवय झाली की, अजून दहा पंधरा मिनिटे आधी उठायला लागा. अशा प्रकारे एकदम मोठा बदल करण्यापेक्षा असा हळू हळू होणारा बदल हा दीर्घकाळ टिकणारा असेल.

काही दिवसांत तुमचं तुम्हालाच जाणवेल की, तुम्ही तुमच्या नियमित होणाऱ्या गजराच्या ठोक्याअगोदरच उठायला लागले आहात.

 

alarm-clock-inmarathi

 

२. नेहमीपेक्षा थोडे लवकर झोपायला लागा 

उशिरापर्यंत जागरण करणे, रात्री उशिरापर्यंत काम करणे किंवा नेटवर काहीतरी बघत जागे राहणे किंवा टीव्ही बघत राहणे हे तुमच्या शरीराचे घड्याळ बिघडवते.

त्यामुळे तुम्ही उशीरा झोपता आणि उशिरा उठायला सुरुवात करता. असे न करता योग्य वेळी झोपायला सुरुवात करा. म्हणजे आपसूकच झोप पूर्ण झाल्याचे वाटून सकाळी वेळेत जाग येईल.

 

sleeping inmarathi

 

३. गजराचे घड्याळ तुमच्या उशाशी न ठेवता दूर टेबलावर ठेवा 

गजराचे घड्याळ डोक्याशी ठेवून झोपलो की, कधी ते बंद करून आपल्याला पुन्हा झोप लागते ते आपल्याला कळतही नाही. कधी उठल्यानंतर गजर झाला की, नाही अशी शंका सुद्धा येते.

यासाठी गजराचे घड्याळ तुमच्या उशीपासून अंतरावर ठेवा जेणेकरून गजर झाल्यावर तो बंद करण्यासाठी तुम्हाला गादीवरून खाली उतरावे लागेल, चालावे लागेल. यासाठी उभे राहिल्याने तुम्हाला आपोआप जाग आलेली असेल. तुम्ही नव्या दिवसाचे डोळे उघडून स्वागत करायला सज्ज झाला असाल.

 

sunrise marathipizza

 

४. उठल्याउठल्या बाथरूमला जा

उठल्याउठल्या बाथरूमला जाऊन ताजेतवाने व्हा. ते झाल्यावर हात स्वच्छ धुवा, तोंडावर पाणी मारा. असे केल्याने तुम्हाला अजून जरा वेळ झोपुयात असे वाटणार नाही.

 

morning-routine-inmarathi02

५. तुमच्या मेंदूला सकाळी लवकर उठण्याचा आदेश द्या

सकाळी उठून करण्याच्या गोष्टींची यादी तुमच्या मनात घोळत राहू दे. यामुळे सकाळी लवकर उठून काय काय गोष्टी करायच्या आहेत हे तुम्हाला आठवत राहील. त्यामुळे मिळालेल्या अधिक वेळेचा सदुपयोग कसा करून घ्यायचा हे तुमच्या डोक्यात पक्के असेल.

जर तुम्ही ठराविक वेळी कामासाठी रोज घराबाहेर पडत असाल तर सकाळच्या वेळेत कोणती कामे करायला किती वेळ लागतो आणि कामांचा कोणता क्रम तुमचा वेळ वाचवू शकतो याचा विचार करा.

एखाद्या दिवशी काही वेगळा प्लॅन असणार असेल तर तो तुमच्या डोक्यात घोळत असू द्या.

उदाहरणार्थ, झोपायला तुम्ही आडवे झालात की, स्वतःच्या मेंदूला तुमचा दुसऱ्या दिवशीचा प्लॅन सांगा

 

brain-inmarathi

 

“मला उद्या लवकर उठायचे आहे. पहाटे ५ ला उठून कॉफी करून प्यायची आहे. अंघोळ करायची आहे, दाढी करायची आहे.

एवढे सगळे करून, आवरून, बॅग्स घेऊन ६ वाजता बाहेर पडायचे आहे. घरून निघाल्यापासून विमानतळावर जायला मला वीस मिनिटे लागतील. पोहोचल्यावर पार्किंगमध्ये गाडी लावायला पुढची दहा मिनिटे लागतील.

त्यानंतर पुढची साधारण पंधरा ते वीस मिनिटे सामानाचे चेकिंग आणि security check साठी ठेवावी लागतील. यानंतर पटकन विमानतळावर नाश्ता करून मला ७.१५ चे विमान गाठायचे आहे. या गोष्टी डोक्यात स्पष्ट असल्याने ऐनवेळी होणारा गोंधळ टाळता येईल.”

६. तुम्ही स्वतःला लवकर उठण्याबद्दल शाबासकी द्या

जर तुम्ही उशिरा उठणारे म्हणून प्रसिद्ध असाल. पण तुम्ही लवकर उठण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहात आणि यासाठी स्वतःच स्वतःवर खूष असाल तर, नक्की स्वतःला शाबासकी द्या. स्वतःचं कौतुक करा. याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

 

praise others inmarathi

 

७. लवकर उठल्याने तुम्हाला मिळालेल्या अधिकच्या वेळेचा वापर करा

अधिकच्या मिळालेल्या वेळेचा वापर तुम्ही योगासने करण्यासाठी करू शकता किंवा इतर काही व्यायाम करू शकता. अशा करण्याने तुमचा संपूर्ण दिवस प्रसन्न जाईल. तुम्हालाच तुमच्यातील चैतन्य जास्त वेळ टिकत असल्याचे जाणवेल.

 

jaqueline-yoga-inmarathi

 

अशी ही दिवसाची उत्साही सुरुवात तुमचा सबंध दिवसभर तुम्हाला प्रफुल्लित ठेवेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?