' भारतातील या मंदिरांत पुरुषांना प्रवेश करायला बंदी आहे…जाणून घ्या!! – InMarathi

भारतातील या मंदिरांत पुरुषांना प्रवेश करायला बंदी आहे…जाणून घ्या!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार मिळाला. ८०० वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली.

या मंदिरात १०-५० वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं हा ऐतिहासिक निर्णय दिला.

महिलांना मंदिर प्रवेश नाकारणं हे घटनाबाह्य असून प्रत्येक वयोगटातील महिलेला मंदिर प्रवेशाचा हक्क आहे.

त्यांना लिंगभेदावरून प्रवेश नाकारता येणार नाही.

असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे देशातील सर्वच मंदिरांमध्ये प्रवेश करण्याचा महिलांचा मार्ग मोकळा झाला आहे.

शबरीमाला मंदिरात मासिक पाळी सुरू झालेल्या तरुणींना आणि महिलांना प्रवेश नाकारण्याबाबत यंग लॉयर्स असोसिएशननं दाखल केलेल्या जनहित याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश एम. खानविलकर, आर. एफ. नरीमन, डी. वाय. चंद्रचूड यांनी महिलांच्या बाजूने एकमताने निर्णय दिला तर, न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांनी शबरीमाला मंदिराच्या बाजूने निर्णय दिला होता.

 

sabarimala-inmarathi

 

हे झालं स्त्रियांच्या बाबतीत, पण तुम्हांला माहिती आहे का भारतात काही देऊळं अशीही आहेत जिथे पुरुषांना प्रवेश दिला जात नाही….

होय! ज्याप्रमाणे स्त्रियांना काही ठराविक ठिकाणी प्रवेश दिला जात, काही विशिष्ठ परंपरांमध्ये त्यांना स्थान नाही तसेच पुरुषांबाबतही आहे. यातील वटपौर्णिमेची पूजा हे आपणा सर्वांनाच माहिती असणारे उदाहरण आहे.

अशीच अजूनही अनेक उदाहरणे आहेत. तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशी काही मंदिरे आणि रूढी सांगणार आहोत ज्यात पुरुषांना स्थान नाही.

१. अतुकल मंदिर 

केरळमध्ये स्थित अतुकल भगवती मंदिर हे असे एक मंदिर आहे जिथे महिला प्रभावी शक्ती आहेत. मंदिरांचा पोंगल उत्सव असतो ज्यात लाखो महिला सहभागी होतात.

स्त्रियांच्या या उत्सवाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील स्थान मिळवले आहे.

कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी ही महिलांची सर्वात मोठी सभा मानली जाते.

पोंगल हा १० दिवस चालणारा सण आहे जो फेब्रुवारी आणि मार्चदरम्यान येतो. या दहा दिवसांत सर्व महिला देवीला बांगड्या अर्पण करतात.

 

attukal-pongala-inmarathi

 

२. चक्कुलुथुकव मंदिर

केरळमधीलच हे चक्कुलुथुकव मंदिर देवी भगवती यांना समर्पित आहे. ‘नारी पूजा’ नामक एक विलक्षण वार्षिक अनुष्ठानांचे अनुसरण इथे केले जाते. डिसेंबरच्या पहिल्या शुक्रवारी एक पुरुष पुजारी ज्याला धनु म्हणतात तो १० दिवस उपवास करणाऱ्या स्त्री भक्तांचे पाय धूतो.

 

nari-pooja-inmarathi

 

३. संतोषी माँ ‘व्रत’

हे व्रत केवळ महिला किंवा अविवाहित मुलींनीच करायचे असते. ह्या व्रता दरम्यान खारट, फळे किंवा लोणचे खाण्यास मनाई आहे.

पुरूष संतोषी माँ मंदिरात पूजा करण्यासाठी प्रवेश करू शकतात.

परंतु संतोषी मातेसाठी ‘व्रत’ पाळण्याची परवानगी त्यांना दिली जात नाही.

 

teej-inmarathi

 

४. भगवान ब्रह्म मंदिर

राजस्थानात पुष्कर येथे भगवान ब्रह्म मंदिर हे भगवान ब्रह्मदेवाचे सर्वात प्रमुख मंदिर आहे. विवाहित पुरुषांना या मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी नाही. हे मंदिर चौदाव्या शतकातील आहे.

 

Pushkar_Brahma_Temple-inmarathi

 

६. भगत मा मंदिर

केरळमधील कन्या कुमारी येथे हे मंदिर आहे. असे मानले जाते की, देवी पार्वती भगवान शंकराची पती म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून तपस्या करण्यासाठी समुद्राच्या मध्यभागी एकट्याच गेल्या होत्या.

हे ही वाचा – या मंदिरांमध्ये देवांची नाही तर राक्षसांची पूजा केली जाते

देवी पार्वतीने ज्या ठिकाणी तपस्या केली तिथेच हे मंदिर आहे. म्हणूनच या मंदिरात केवळ महिलांना परवानगी आहे व पुरुष तेथे निषिद्ध आहेत.

हे कन्या कुमारीमधील अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे जेथे केवळ स्त्रियाच पूजा करतात.

 

Kanyakumari-Shakti-Peeth-inmarathi

 

७. मुजफ्फरपूर, बिहार

इथे एक माता मंदिर आहे जिथे विशेष कालावधीसाठी  केवळ महिला भक्तांना मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी दिली जाते. त्या काळात अगदी मंदिराच्या पुजाऱ्यालाही ह्या परिसरात प्रवेश करण्यास परवानगी नाही.

 

DEVI-MANDIR-bihar-inmarathi

 

८. कामाख्या मंदिर, आसाम 

या मंदिरातील परंपरा अत्यंत आश्चर्यकारक आहेत.

इथे फक्त महिलांनाच प्रवेश मिळतो. देवीची सेवाही फक्त महिला संन्यासींकडूनच केली जाते.

पण सगळीकडे मासिक पाळी दरम्यान स्त्रियांनी देवधर्म करणे निषिद्ध मानले जात असताना, इथे मात्र या दिवसांत स्त्रियांनी पूजा करणे शुभ मानले जाते.

शिवाय इथे दरवर्षी तीन दिवस मंदिर बंद ठेवले जाते. या दिवसांत खुद्द देवीला रजस्त्राव होतो असे मानतात. या दिवसांत मंदिरात पांढरा कपडा अंथरला जातो जो या स्रावानेच लाल होतो असा समज आहे.

विशेष म्हणजे या तीन दिवसांनंतर वाजत गाजत मंदिर उघडून हा कपडा आशीर्वाद म्हणून भक्तांना दिला जातो. आहे की नाही अचंबित करणारी प्रथा?

 

kamakhya-devi_inmarathi

 

तर ही होती काही ठिकाणं जिथे पुरुष प्रवेश निषिद्ध मानला जातो.

आता आपला मूलभूत अधिकार म्हणून पुरुष सुद्धा येथे प्रवेश करता यावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल करू शकतात व न्यायालयाला हस्तक्षेप करण्यास भाग पाडू शकतात. असे झाले तर नवल वाटायला नको.

 

हे ही वाचा – आसाममधल्या या मंदिरात आजही योनीची पूजा केली जाते!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?