आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“भूकंप” हा शब्दच एक भीतीदायक शब्द बनला आहे. नुसता उच्चरला तरी थरकाप उडतो. निसर्गाकडून येणारी मोठी आपत्ती, तिला काळ-वेळ, सण-वार, मुहूर्त, ठिकाण, याचं काही गणित कळत नाही. कसलेही भेदभाव ह्या आपत्तीकडे नसतात, कधीही, कुठेही, कशीही, ही आपत्ती येते म्हणून भीतीने थरकाप उडतो.
जाणून घेऊ, आपल्या देशात आलेल्या मोठ्या दहा भूकंपांबद्दल!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
१. भारतातल्या हिंदी महासागरात झालेला मोठा भूकंप-
वेळ होती सकाळी ८ वाजून ५५ मिनिटे, तारीख- २६ डिसेंबर २००४, हा भूकंप होता ९-१ रिष्टर स्केल चा.
भारतासह श्रीलंका, थायलंड, मालदीव बेटे, सोमालिया, आशा मोठ्या परिसरात ह्या भूकंपाचे हादरे बसले आणि सुनामी संकट कोसळले, सगळ्या परिसरात प्रचंड पाण्याच्या लाटा घुसल्या, धरणीचा सगळ्यात मोठा थरकाप झाला.
अनेक घरे, इमारती कोसळल्या, रस्ते उध्वस्त झाले. झाडे उन्मळून पडली, मोठे पूल कोसळले आणि अनेक लोक मृत्यूमुखी पडले.
ह्या चारही देशात हाहाक्कार झाला, एकूण २,८३,१०६ माणसे मरण पावली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हानी झाली. लोक बेघर झाले. अनेक लोक जखमी झाले, अनेक लोकांची ताटातूट झाली. त्यांची परत कधी भेट झालीच नाही.
साऱ्या जगाला ही आपत्ती आपलं रूप एकदा तरी दाखवून गेली आहे आणि लोकांनी ह्या आपत्तीचा दणका अनुभवला आहे.
म्हणून कायमचीच भीती निर्माण झाली आहे. आपल्याला शिकवल्या जाणाऱ्या इतिहासात हिचे रौद्र स्वरूप पाहायला मिळाले आहे. अनेक शहरे ह्या आपत्तीने जमीनदोस्त केली आहेत. काही शहरे पूर्णपणे गाडली गेली आहेत.
अशी ही महा भयंकर आपत्ती म्हणून आपल्या परिचयाची आहे. माणूस आयुष्यात एकदातरी ह्या अपत्तीबद्दल ऐकतो, स्वतः अनुभवतो. ज्या भागात ही येते तिथे प्रचंड नुकसान, मनुष्य हानी, संपत्तीची हानी करून जाते.
असे भूकंप आपल्या देशातल्या अनेक ठिकाणी अनेक वेळा झालेले आहेत. आणि खूप मोठी हानी, झालेली आहे. अशा विध्वंसक १० भूकंपांची ही माहिती… ज्या भयानक धक्क्यातून लोक अजूनही सावरलेले नाहीत. घरदार उध्वस्त झाले, नाती तुटली, होते नव्हते ते पार नष्ट झाले.
ह्या भूकंपाचा केंद्र बिंदू होता सुमात्रा आणि इंडोनेशिया बेटांवर. प्रचंड हानी करणारा हा प्रचंड मोठा भूकंप.
निसर्गाच्या ह्या कोपाची अजूनही लोकांमध्ये भीती आहे. त्या आठवणीनेही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो जे ह्या भूकंपाचे साक्षीदार होते.
–
- भूकंपात १०८ तास ढिगा-याखाली अडकलेल्या या `मिरॅकल बेबी’ची गोष्ट वाचून तुम्हीही थक्क व्हाल…!
- लातूर म्हणजे फक्त भूकंप आणि दुष्काळ?! तुम्हाला खरं लातूर माहितीच नाहीये!
–
२. दुसरा मोठा भूकंप होता काश्मीरमधला, ८ ऑक्टोबर २००५ ह्या दिवशी सकाळी सकाळीच म्हणजे ८ वाजून ५० मिनिटे ही वेळ पुन्हा एकदा प्रचंड विध्वंसाची.
ह्या भूकंपाचे केंद्रस्थान होते पाकिस्तानातले मुझफ्फराबाद. ह्या भूकंपाने काश्मीर, पाक व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातले मुझफ्फराबाद इथे प्रचंड मोठे धक्के बसले आणि त्या संपूर्ण भागाची खूप मोठी हानी झाली. दोन्ही देशांत मिळून १,३०,००० माणसे मृत्युमुखी पडली.
अनेक इमारती पडल्या, त्यात असंख्य माणसे जखमी झाली. रस्ते उखडले गेले. जमिनीला मोठ्या भेगा पडल्यागेल्या. अशी मोठी हानी झाली. तोही भूकंप प्रचंड मोठा म्हणून लक्षात राहतो.
त्या भूकंपाची तीव्रता ७.६ रिष्टर स्केल होती त्यामुळे एवढी मोठी मनुष्य हानी झाली.
३. तिसरा मोठा भूकंप बिहार आणि नेपाळ ह्या दोन्ही भू-भागांवर झाला. १५ जानेवारी १९३४ साली हा भूकंप झाला दुपारी २:१३ वाजता.
ह्या भूकंपात बिहार आणि नेपाळ भागातली ३०००० माणसे मृत्यू मुखी पडली. ह्या भूकंपाची तीव्रता ८:७ रिष्टर स्केल इतकी मोठी होती.
४. गुजरात राज्यानेही अनेक भूकंप पाहिले, त्यातला कच्छ भुज इथला हा भूकंप.
सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी हा भूकंप झाला आणि तो दिवस होता २६ जानेवारी २००१. सात पूर्णांक सात दशांश रिष्टर स्केलचा हा प्रचंड मोठा भूकंप होता. ह्याचे हादरे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जाणवले, घरे हादरली.
रस्त्यावरून पायी चालणाऱ्या लोकांना हे हादरे चांगलेच लक्षात राहतील असे होते, जमीन कशी कंप पावते हे सगळ्यांना जाणवले. जमिनीचा थरथराट हा चालणाऱ्या माणसाच्या डोक्यापर्यंत झिणझिण्या आणत होता, नक्की काय होतं आहे हे कोणालाच कळत नव्हते.
चक्कर आल्यासारखे वाटत होते, चालणारा माणूस पुढे जायचा क्षणभर विसरूनच गेला होता.
तो दिवस गणराज्य दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होत होता आणि भूकंपाची वेळही सकाळचीच होती. गुजरात आणि महाराष्ट्रात लोक ध्वजारोहणाच्या तयारीत होते.
कोणी ध्वजाला सलामी देत होते, कोणी छोटे झेंडे आपल्या शर्टवर लावत होते. काही सुट्टी म्हणून झेंडावंदन झाल्यावर कुठे जायचे ह्याचे प्लॅनिंग करत होते, तर काही आळशी लोक बिछान्यावर लोळत घोरत होते आणि अचानक भूकंप झाला.
गुजरात मधल्या केंद्रस्थानांची खूप मोठी हानी झाली. सगळी घरे जमीनदोस्त झाली. असंख्य लोक मारले गेले. २०,००० च्यावर लोकांचे बळी गेले. कच्छ- भुजमधले बहुतेक लोक बेघर झाले.
अन्न पाण्याचा मोठा तुटवडा निर्माण झाला, अनेक जवान, सामाजिक कार्यकर्ते, गरीब श्रीमंत सगळे मदतीला धावले. देशातून आणि परदेशातूनही मदतीचे ओघ सुरू झाले कारण खूप मोठ्या प्रमाणावर घरे, इमारती उध्वस्त झाल्या होत्या.
जिकडे तिकडे हाहाक्कार उडाला होता, लोकांची मने खचली होती, कोणाचा कोणाला पत्ता लागत नव्हता, कोण कायमचे सोडून गेले होते तर कोणी घायाळ झाले होते त्यामुळे मोठी भीती सगळीकडे पसरली होती.
अजूनही तीच भीती ह्या लोकांच्या मनात आहे, कारण जे वाचले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी हा विध्वंस पहिला होता. त्या धक्क्याने ते लोक पार खचून गेले. कारण हे पुन्हा घडू शकेल ह्याचेही मनावर दडपण आहे.
५. ‘कांगरा’ इथे झालेला इतकाच मोठा म्हणजे ७ : ८ रिष्टर स्केलचा हा भूकंप.
४ एप्रिल १९०५ साली सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी झालेला हा विध्वंसक भूकंप. २०,००० माणसे मृत्युमुखी पडली, घरे पडली, धावाधाव झाली, लोक अर्धवट झोपेत असतानाच घडले हे.
हा भूकंप पाहिलेले लोक आता आपल्यात नाहीत पण त्या काळी एवढ्या सुविधा वगैरे काहीच नव्हत्या, त्यामुळे झालेले नुकसान म्हणजे आयुष्यातून उठल्याचीच जाणीव त्या लोकांना झाली असेल. काय परिस्थिती असेल ह्याची नुसती कल्पना आपण करू शकतो. प्रत्यक्ष हानी किती प्रचंड असेल?
६. लातूरचा एक मोठा भूकंप आपल्यापैकी अनेकांनी पहिला आहे, त्याची झळ आपल्यापर्यंत पोचली आहे. काळरात्रीच्या अंधारात म्हणजे रात्री १० वाजून २५ मिनिटे झाली आणि ह्या भूकंपाने लातूरचे होत्याचे नव्हते झाले. ती काळरात्र होती ३० सप्टेंबर १९९३ ची.
काही लोक तर झोपेतच गेले आणि काही जागे असून सुद्धा स्वतः ला वाचवू शकले नाहीत. कारण काळ्या मिट्ट अंधारात हा निसर्गाचा घाला आला आणि सगळे विस्कटून गेला.
काही क्षणातच सुमारे दहा हजार लोकांना मारून सगळे गाव उध्वस्त करून गेला हा काळाचा घाला.
त्याची भीती लातूरकरांनाच नव्हे तर आपल्यालाही अजून वाटतेय. कारण अचानक आलेले हे संकट होते. कोणतीही पूर्व तयारी नव्हती, किंवा काही कल्पनाही नव्हती असे काही होणार ह्याची. आजही हे दडपण लोकांच्या मनावर आहे.
७. आसाममधला हा दुसरा भूकंप संध्याकाळी ७ वाजून ३९ मिनिटे आणि तारीख १५ ऑगस्ट १९५०. स्वातंत्र्य दिनाच्याच दिवशी, संध्याकाळी अचानक ८ : ६ रिष्टर स्केलचा हा भूकंप झाला.
एवढा मोठा भूकंप पण मनुष्य हानी त्या मानाने कमी झाली. कारण डोंगराळ भागात त्याची तीव्रता जास्त होती. तरी १५२६ माणसं मृत्यूमुखी पडली.
–
- देशालाच नव्हे तर संपुर्ण जगाला हादरवून टाकणारा हा दिवस आजही शहारे आणतो
- तब्बल १ लाख लोकांचा बळी घेणाऱ्या या भूकंपाच्या नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो!
–
८. आसाम मधला हा पहिला भूकंप ८:१ रिष्टर स्केलचा प्रचंड मोठा भूकंप. १२ जून, १८९७ सालचा हा भूकंप.
ह्या भूकंपात सुमारे १५०० लोकांचा मृत्यू झाला, तीव्रतेच्या मानाने कमी मनुष्यहानी झालेला हा भूकंप.
९. उत्तर काशीला झालेला हा भूकंपही ६.८ रिश्टर स्केलचा होता. २० ऑक्टोबर १९९१ या दिवशी हा भूकंप झाला
या भूकंपात सुमारे १००० पेक्षा जास्त मनुष्यहानी झाली.
१०. महाराष्ट्रात कोयनानगर येथे झालेला हा ६.५ रिश्टर स्केलचा आणखी एक मोठा भूकंप ह्या भूकंपाची भीती आजही कायम आहे. १९६७ साली पहाटे ४ : २१ वाजता हा भूकंप झाला. ह्या भागातच कोयना नदीवर बांधलेले प्रचंड मोठे धरण आहे आणि ह्या धरणाजवळच कोयना वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पातून महाराष्ट्रभर वीजपुरवठा केला जातो.
ह्याच भागात तो १९६७ चा भूकंप झाला. त्यानंतरही अनेकवेळा छोटे मोठे भूकंपाचे धक्के बसत होते. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली की जर कधी १९६७ च्या भूकंपा पेक्षा मोठा धक्का बसला तर धरणाचे काय होईल आणि त्यानंतर पुढची परिस्थिती काय असेल ?
पण कोयना येथे वारंवार बसणारे धक्के आता थांबले आहेत. त्यामुळे ही भीती आता कमी झाली आहे. आणि नवीन पिढीला त्याबद्दल काहीच भीती राहिली नाही. कारण त्यांनी १९६७ च्या भीतीचे पडसाद अनुभवले नाहीत.
असे हे आपल्या भारतातले मोठे दहा विध्वंसक भूकंप म्हणून ज्ञात आहेत.
भूकंप अभ्यासकांच्या अभ्यासातून बरीच माहिती त्यानंतर सतत गोळा केली गेली आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या आत्ताच्या अभ्यासानुसार भूकंपाचे जास्त संवेदनशील विभाग, कमी संवेदनशील विभाग असे विभाग तयार केले गेले आहेत.
अति संवेदनशील विभाग-१
भारतातली ११% भूभाग हा अति संवेदनशील म्हणून घोषित केले गेला आहे. त्यात अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा, मध्य काश्मीर, मध्य हिमालय क्षेत्र, उत्तर बिहार, कच्छचे रण आणि अंदमान निकोबार बेटे ही समाविष्ट केली गेली आहेत.
अति संवेदनशील विभाग-२
भारतातील १८% भू भाग ह्यात समाविष्ट केला आहे तो म्हणजे- जम्मू काश्मीरचा काही भाग, उत्तराखंड, दिल्ली, गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल , कोयना नगर आणि पूर्ण सिक्कीम. हे ह्या विभागात आहेत.
संवेदनशील विभाग-३
ह्यात ३०% भूभाग समाविष्ट केला आहे, तो म्हणजे- हरियाणाच्या काही भाग, पंजाब, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओरिसा, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक, आणि तामिळनाडू, संपूर्ण दादरा – नगर हवेली, गोवा आणि केरळ.
आणि उर्वरित म्हणजे ४१% भू भाग हा कमी संवेदनशील म्हणून घोषित केला गेला आहे.
तो प्रत्येक राज्यातला पण कमी धोक्याचा आहे. भूकंपाच्या भूगर्भातल्या हालचालींवर संशोधन चालूच आहे आणि निश्चितच आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण ह्या भूकंपाच्या विध्वंसक संकटांवर मात करू शकू अशी आशा ठेऊ.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.