' बर्म्युडा ट्रँगलचं गुपित उलगडलं असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा! वाचा ‘खरं’ रहस्य! – InMarathi

बर्म्युडा ट्रँगलचं गुपित उलगडलं असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा! वाचा ‘खरं’ रहस्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

‘रहस्य’ हा सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. कुठलीही गोष्ट रहस्यमय आहे, असं कळलं की आपोआपच त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपले कान टवकारतात. रहस्य म्हणजे उत्सुकता, हे समीकरण अगदी सहजपणे आपल्या आयुष्यात अंगवळणी पडलेलं असतं.

विज्ञान किंवा भटकंती यांची आवड असणाऱ्या प्रत्येकाला, असं एक रहस्य नक्कीच माहिती असतं. त्यातीलच एक म्हणजे बर्म्युडा ट्रँगल…

प्रत्येकानेच लहानपणी ऐकलेल्या आश्चर्यकारक आणि रहस्यमय गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे बर्म्युडा ट्रँगल! जिथे विमानं, जहाज, सर्वकाही अदृश्य होतं! हे नेमकं कशामुळे घडतं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम गेली अनेक वर्षं सुरूच आहे.

ही एखादी भुताटकी आहे की विज्ञानाचा चमत्कार, की आणखी काही, याविषयी अनेक तर्कवितर्क करण्यात येत असत. मात्र त्याविषयी ठोस काही बोलण्यासाठी कुणाकडेही काहीच मुद्दे नसत. या रहस्याचा उलगडा होणं अशक्य असल्याचं सुद्धा अनेकांचं म्हणणं होतं.

मात्र, या रहस्यामागील गूढ दूर झालं आहे. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की ह्या जागेचं गूढ उलगडलं आहे!

bermuda-triangle-inmarathi

 

जेव्हापासून बर्म्युडा ट्रँगलचं प्रकरण जगासमोर आलंय तेव्हापासून ते एक रहस्यच बनून गेलंय. अजूनही शास्त्रज्ञ बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य उलगडण्यात दिवस आणि रात्र एक करत आहेत. बर्म्युडा ट्रँगलबद्दल आजवर अनेकांनी अनेक सिद्धांत मांडले.

कोणाच्या दाव्यामध्ये काही अंशतः तथ्यता होती तर बहुसंख्य जणांचे दावे केवळ बोलाचे भात अन् बोलाचीच कढी ठरले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

शास्त्रज्ञांच्या आणखी एका गटाने बर्म्युडा ट्रँगलबद्दल सिद्धांत मांडीत बर्म्युडा ट्रँगलचं रहस्य उलगडल्याचा दावा केलाय.

५०००० किमी वर्ग क्षेत्रफळात पसरलेल्या महासागरातील बर्म्युडा ट्रँगलच्या या परिसराने आजवर शेकडो जहाज आणि विमानांना स्वत:च्या पोटात गिळंकृत केलं आहे.

मागील १०० वर्षांत १००० पेक्षा जास्त लोक बर्म्युडा ट्रँगलच्या भक्ष्यस्थानी पडल्याची नोंद आहे. अगदी कित्येक मैल दुरून प्रवास करणारी जहाजे देखील बर्म्युडा ट्रँगलच्या नरकामध्ये खेचली जातात.

 

bermuda-triangle-mystery-marathipizza02

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार,

Air Bombs च्या मिसळण्याने बर्म्युडा ट्रँगलच्या वर षटकोनी आकाराचे ढग तयार होतात. या  Air Bombs च्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या हवेचा वेग इतका प्रचंड असतो की ज्यामुळे समुद्रात ४५ मीटर उंच लाटा तयार होतात.

 

bermuda triangle InMarathi

 

Micro Bursts एकत्र आल्यामुळे हे Air Bombs तयार होतात. Micro Bursts ढगांच्या खालून निघून जातात आणि फुटतात.

फुटल्यामुळे ते महासागराला जाऊन धडकतात आणि त्यातून प्रचंड आकराच्या लाटा तयार होतात. त्यामुळेच या प्रदेशात येणारी कोणतीही गोष्ट लाटा खेचून घेतात.

 

bermuda-triangle-mystery-marathipizza01

 

बर्म्युडा बेटांच्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर विशालकाय ढग पाहायला मिळतात. जे जवळपास २० ते २५ मैल दूरपर्यंत पसरलेले असतात. त्यामुळे या शास्त्रज्ञांच्या दाव्यात बऱ्याच अंशी तथ्य असल्याचं अनेक जाणकारांचं मत आहे.

त्यांचा सिद्धांत स्पष्ट करणार हा व्हिडियो पहा :

 

 

हे उत्तर रहस्यातील बराचसा भाग उलगडू शकलं. त्यामुळेच याभागात विमानं आणि जहाजं अदृश्य होणं, म्हणजे कुठलीही भुताटकी नाही हे सिद्ध झालं आहे.

आजवर या भागात अनेक अपघात घडले आहेत. या सर्व अपघातांचं रहस्य सुद्धा लवकरच उलगडेल, अशी अपेक्षा आता नक्कीच करता येईल.

काय मग मंडळी, बर्म्युडा ट्रँगलचं हे रहस्य, तुमच्या मित्रमंडळींसह सुद्धा शेअर करणार ना…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?