Site icon InMarathi

एक असा ‘रामरहीम’ भक्त, ज्याचे जननेंद्रिय एक रात्रीतून गायब केले गेले…

Hansraj IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला त्याच्या गुन्ह्याबद्दल २०१७ मध्ये शिक्षा झाली. त्याच्या आश्रमात चालणारी अनैतिक कृत्य आणि त्याने केलेले बलात्कार अशा अनेक गुन्ह्यांच्या कृत्यांची ही परिणीती होती.

हा खटला मिडियामध्ये पण खूप गाजला पण नेहमीप्रमाणे काहीतरी सनसनिखेज देण्याच्या नादात फक्त राम रहीम आणि त्याची मानलेली मुलगी यांच्याबाबतच जास्त लिहिलं-दाखवलं गेलं.

नेहमीसारखेच अनेक महत्वाचे आणि धक्कादायक असे विषय बाजूला पडले.

‘तेहलका’ सारख्या बरेच मोठे आणि धक्कादायक विषय जगासमोर आणणाऱ्या समूहातले एक पत्रकार श्री. अनुराग त्रिपाठी यांनी ‘डेरा सच्चा सौदा and गुरमीत राम रहीम – ए लॉंग दिकेड इंवेस्टीगेषण’ या नव्या पुस्तकाद्वारे अनेक धक्कादायक असे खुलासे पुराव्यानिशी केले आहेत.

बाबा गुरमीतवर बाल्त्कारासारखे गंभीर आरोप सिद्ध झालेत आणि त्याला त्याबाबत न्यायालयाने शिक्षा देखील सुनावली आहे. पण हे सगळं प्रकरण फक्त साध्वींच्या बाबतच होतं का?

नाही. या तथाकथित बाबाच्या अत्याचाराला अनेक पुरुष सुद्धा बळी पडले आहेत.

 

 

 

 

 


गुरमीत त्याच्या जवळच्या महिला साध्वींचा वापर गुलाम अर्थात सेक्स स्लेव म्हणून करायचा. त्याचे जे पुरुष साधू होते त्यांच्याकडे २ जबाबदाऱ्या होत्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : वाचा – बाबा राम रहीमला ज्या निनावी पत्रामुळे शिक्षा झाली – ते संपूर्ण पत्र

==

एक म्हणजे त्यांना दिलेल्या नशिल्या गोळ्या खाऊन दिवसभर अंगमेहनत करणे. त्यातूनही जे धष्टपुष्ट असतील त्यांना मात्र रहीम आपल्या खास अंगरक्षक म्हणून सेवेत ठेवायचा.

या खास साधुंसोबत एक विशिष्ट काम केलं जात असे. आज त्यावर पुन्हा एकदा CBI नं नव्याने चार्जशीट दाखल केली आहे.

या साधूंचे जननेंद्रिय कापली जात असत आणि त्यांना तथकथित पणे पवित्र केलं जात असे.

अनुरागच्या या पुस्तकात अशाच एका पिडीताची कहाणी समोर आली आहे. हरियाणातील फतेहगड जिल्ह्यातील हंसराज हे १९९९ साली डेरा मध्ये सहभागी झाले. मुळात अत्यंत गरीब दलित कुटुंबातून असणारे हंसराज यांचा आवाज गोड होता.

त्यामुळेच त्यांच्या घरच्यांच्या सतत मागे लागून शेवटी डेराचे संन्यासी या १६-१७ वर्षांच्या हंसराज ला आपल्यासोबत घेऊन गेले आणि त्यांना साधू बनवलं.

पुढे आपल्या आवाजामुळे हंसराज डेरामध्ये भजन – अभंग गाऊ लागले.

 

हंसराज आपला अनुभव सांगतात-

१९९९ मध्ये पहिल्यांदा माझ्यासमोर घोड्याची जननेंद्रिय कापण्याचा प्रयोग झाला. तो अयशस्वी ठरला कारण त्यात घोडा मेला. मला नंतर समजलं की, हा प्रयोग पुढे आश्रमातली साधुंवरही करण्याचा गुरमीत यांचा मानस आहे.

त्यानंतर काही दिवसांनी आम्हाला असं कळल की, वरिष्ठ समितीपैकी कोणावरतरी हा प्रयोग केला गेला.

१९९९ च्या शेवटी बाबानेच तयार केलेल्या संत ब्रम्हचारी सेवा संघ अशा नावाच्या समूहातले ५०० साधू बोलावण्यात आले. त्यांना सांगण्यात आलं की तुमच्या अध्यात्मिक शक्ती वाढवण्यासाठी एक छोटसं ऑपरेशन केलं जाणार आहे.

त्यानंतर तुम्ही थेट ईश्वराशी संपर्क करू शकाल.

‘पिता जी’ (बाबाचं भक्तांमधल नाव) वर असलेला विश्वास म्हणून कोणीही काही बोललं नाही पण ज्या काही मोजक्या साधूंनी हे ऑपरेशन करण्यास नकार दिला त्यांचा अतोनात छळ करण्यात आला…

 

==

हे ही वाचा : राम रहीमचं पडद्यामागील सत्य : “डेरा” चे एवढे कट्टर समर्थक का तयार झाले?

==

या ५०० जणांच्याही आधी बाबाच्या आचाऱ्यांची जे मुळात २ ब्रम्हचारी साधू होते, त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी लागणारी सगळी तयारी आश्रमाच्या मागे असणाऱ्या गुहेतच करण्यात आली. तिथे ऑपरेशन टेबल टाकून ही सगळी प्रक्रीया पूर्ण केली गेली.

त्यानंतर बाबाच्या दुसऱ्या कुठल्यातरी भक्तसमुहातल्या साधूंवर ही शस्त्रक्रिया केली गेली.

या संपूर्ण प्रकाराबद्दल इतर काहीही न बोलण्याचे बाबाचे सक्त आदेश होते आणि नेमकं सांगायचं असेल तर काय तेही ठरवून दिलं होतं.

हे ऑपरेशन झालेले साधू बाहेर या ऑपरेशन मुळे त्यांची अध्यात्मिक शक्ती वाढली असे सांगत होते.

२००० च्या ऑक्टोबर महिन्यात गुरमीतच्या सगळ्या काफिल्या बरोबर हंसराज सुद्धा कुठेतरी सत्संगाला जात होते. तोपर्यंत हंसराज बाबाच्या नजरेत आले होतेच.

त्यांनी मध्येच त्यांना थांबवून, ‘तुझ्यावर ईश्वराची कृपा झाली असून तो तुला काही दिवसात दर्शन देईल’ असं सांगितलं.

 

याचबरोबर हा निरोप त्याच्या आश्रमातल्या हॉस्पिटल मध्ये डॉ. पंकज गर्ग आणि त्याच्या सहकाऱ्याला जाऊन सांगायला सांगितला. १७ वर्षांच्या हंसराजच्या तोंडून बाबाचा निरोप ऐकल्यानंतर डॉक्टर फक्त हसले आणि त्यांना एक ग्लासभर ज्यूस पिण्यासाठी दिलं.

त्यांनतर काय झाले ते हंसराज यांना आठवत नाही, मात्र जाग आल्यानंतर आपली जननेंद्रिय कापली गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हंसराजना नपुंसक बनवण्यात आलं होतं.

यानंतरही हंसराज भीतीनं आणि इतर साधू काहीच बोलत नाही हे पाहून बराच काळ गप्प बसले. काही काळानं मात्र त्यांनी आपल्या घरच्यांना ही गोष्ट सांगितली आणि त्यांच्यासह पुन्हा घरी निघून आले.

त्यानंतरही डेरा मधल्या अनेकांचा त्यांना देणं चालूच राहिलं.

या कारणामुळे यांच्या अनेक नोकऱ्याही गेल्या. आज हंसराज संगीत शिकवून आपल्या घराचा उदरनिर्वाह चालवतात. पण हंसराज यांच्यासारखे बाकीचे साधू नशीबवान ठरू शकले नाहीत याची त्यांना खंत आहे.

 

असे अनेक गंभीर खुलासे करणाऱ्या या पुस्तकाचे लेखक अनुराग हे पूर्वी ‘तेहलका’ या मग्झीन चे पत्रकार होते. त्यांनी हरिंदर बवेजा या प्रसिद्ध पत्रकाराच्या नेतृत्वाखाली २००७ सालापासून गुरमीत बाबावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

ते आपल्या समूहासह अशा बऱ्याच साधकांना भेटले ज्यांच्या कुठल्या न कुठल्या पद्धतीने अत्याचार केला गेला होता.

बलात्कार झालेल्या अनेक साध्वींची खरी कहाणी त्यांच्या या पुस्तकात आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

==

हे ही वाचा : बाबा राम रहीम सारखे इतर ९ वादग्रस्त धर्मगुरू!

==

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version