Site icon InMarathi

सडलेले अन्न खाणे ते रोज एक तास रडणे – विविध देशांतील लग्नाच्या “१२ अचाट प्रथा.”

Wife carrying InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लग्न म्हणजे दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या आयुष्यातील एक महत्वाचे वळण असते. लग्नाचा समारंभ हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि अनेक व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडला जातो.

वेगवेगळ्या संस्कृतीनुसार अनेक प्रकारचे विधी या लग्न समारंभात असतात. भारतीय विवाह पद्धतीमध्ये अनेकदा काही मजेशीर रूढी परंपरा असतात. त्यामुळे बऱ्याच गमतीजमती घडताना आपण पाहतो.

 

 

परंतु इतर देशातही यापेक्षा जास्त हास्यास्पद प्रथा रूढ असतात. आज जाणून घेऊया अशाच काही विचित्र लग्न पद्धतींबद्दल…

१. पहिले उदाहरण भारताचेच घेऊ! आपल्यामध्ये असा समज आहे की,

मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर तिच्या नवऱ्याचा अकाली मृत्यू होतो. त्यावर उपाय म्हणून काही ठिकाणी आधी तिचे लग्न एखाद्या झाडासोबत लावून नंतर ते झाड तोडले जाते. तो अकाली मृत्यूचा शाप झाडासोबत गेला असे मानून मुलीचे दुसरे लग्न पुरुषाशी लावले जाते.

 

 

आता वळूया इतर देशांकडे.

२. स्कॉटलंड देशात एक अतिशय मजेशीर प्रथा रूढ आहे. लग्नाच्या एक दिवस आधी मुलीला तिच्या मित्र मैत्रिणींकडून घरातून पळवून नेले जाते. मुलीला एका झाडाला बांधून टाकतात आणि तिला तशा अवस्थेत अपशब्द बोलले जातात.

एवढंच नाही तर तिच्या चेहऱ्याला व शरीराला नासके दूध, सडलेले अन्नपदार्थ, शिळे मासे, डांबर असे घाणेरडे पदार्थ फासले जातात. शक्य होईल तितका त्रास तिला दिला जातो. या प्रथेमागे असे कारण सांगितले जाते की,

या त्रासाचा अनुभव मुलीला लग्नापूर्वीच आला तर संसारात येणाऱ्या कुठल्याही संकटाचा ती सामना करू शकेल. आहे ना विचित्र प्रकार?

 

 

३. चीनमध्ये तुलिजा नावाची एक जमात आहे. या जमातीत ज्या मुलीचा विवाह ठरलाय आणि विवाहाची तारीख एक महिन्यावर येऊन ठेपलीय त्या मुलीला महिनाभर रोज एक तास वेगवेगळ्या सुरात रडायला सांगितले जाते.

पहिले वीस दिवस मुलगी एकटीच रडते. नंतर लग्नाला दहा दिवस बाकी असताना मुलीची आई तिच्या रडण्यात सामील होते आणि पाच दिवस बाकी असताना मुलीची आजी सुद्धा सुरात सूर मिसळून रडू लागते.

 

 

ही रोज एक तास रडण्याची प्रथा हास्यास्पद वाटत असली तरी त्यांच्यासाठी तो एक आनंद व्यक्त करण्याचा प्रकार आहे.

 

४. फ्रांसमध्ये लग्न झाल्यानंतर नवविवाहित दाम्पत्याला घरातील टॉयलेटमध्ये समारंभपूर्वक घेऊन जातात. लग्नामधील पंगतीत जे काही उष्टे, खरकटे अन्न उरले आहे ते नवीन टॉयलेटच्या भांड्यात टाकतात. त्यात पाणी घालून त्यांना तो ज्युस प्यायला देतात.

बदलत्या काळात सध्या या अन्नाची जागा शॅम्पेन आणि चॉकलेटने घेतली असली तरी खाण्याचे ठिकाण अजूनही टॉयलेटच आहे. यामागे नवविवाहितांना पहिल्या रात्रीसाठी शक्ती मिळावी अशी कल्पना आहे.

 

 

५. पारंपरिक जर्मन विवाह पद्धतीमध्ये विवाहासाठी आमंत्रित पाहुणे सोबत येताना भांडी घेऊन येतात. ही भांडी दाम्पत्यासाठी भेट नसून फोडण्यासाठी आणलेली असतात. पातेली, ताट, वाट्या वगैरे प्रकार फरशीवर फोडून त्यांचे छोटे छोटे तुकडे केले जातात.

हा सगळा पसारा नवरा बायको दोघांनी मिळून साफ करायचा असतो. भांडी फोडण्यामागे वाईट भुतांना पळवून लावण्याचे शास्त्र आहे असे मानले जाते.

आणि जोडीने ते साफ करण्यामागे संसाराचे धडे गिरवण्याची सुरुवात असे मानले जाते.

 

 

६. आयर्लंड देशात लग्नाच्या दिवशी नववधू आणि वर मिळून डान्स करतात. या नाचात वधूचे पाय नेहमी जमिनीवर राहिले पाहिजेत असा दंडक आहे. तिने पाय न उचलता जमिनीवर स्थिर राहून नाच करायला हवा नाहीतर वाईट शक्ती तिला उचलून घेऊन जातील असे इथे मानले जाते.

विकसित देशातही अश्या मान्यता प्रचलित आहेत हे विशेषच म्हणावे लागेल.

 

 

७. कोरियामध्ये तर आणखीनच मजेशीर प्रथा पाळली जाते. इथे लग्न झाल्याबरोबर नवऱ्या मुलाला आडवे झोपवून त्याचे तळपाय मासे किंवा उसाच्या काठीने झोडपुन काढले जातात. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याच्यामध्ये ताकद यावी असा काहीसा हेतू या विचित्र प्रथेमागे आहे.

 

 

८. नायजेरियन देशात मात्र महिलांना पती निवडण्याची मुभा दिलेली असते. एका मोठ्या समारंभात अनेक विवाहेच्छूक पुरुष एकत्र येऊन पारंपरिक कपडे घालून समूह नृत्य करतात. अनेक कलाबाजी आणि कसरती करून दाखवतात.

मुलीला त्यांच्यामधून जो पुरुष अधिक आवडला त्याची निवड पती म्हणून ती करते आणि दोघांचे ताबडतोब लग्न लावून दिले जाते.

हे वाचून अनेक भारतीय मुलींना नायजर होण्याची इच्छा झाल्यास नवल नाही.

 

 

९. अमेरिकेसारखा देश सुद्धा अशा काही प्रथा पाळण्यापासून मागे नाही. दक्षिण अमेरिकेतील कित्येक जमातीमध्ये लग्न झाल्यानंतर वधूने झाडूवरून इकडून तिकडे उड्या मारण्याची पद्धत आहे.

पूर्वी गुलामगिरीच्या काळात ‘ब्लॅक’ मुलींसोबत ‘व्हाईट’ पुरुषांनी लग्न केल्यास नवीन आयुष्याच्या सुरुवातीचे प्रतीक म्हणून ही प्रथा रूढ झाली. परंतु अजूनही त्या गुलामगिरीची आठवण अथवा प्रथेमधील मजा म्हणून ही पद्धत टिकून आहे.

 

 

१०. बायकोला उचलून घेणे आपल्याला कितीही रोमँटिक वाटत असले तरी तिला उचलून घेऊन स्पर्धेमध्ये पळणे वाटते तितके सोपे नाही. पण ही प्रथा फिनलँड देशात मात्र आहे.

दरवर्षी भरणाऱ्या एका स्पर्धेमध्ये तिथले पुरुष आपापल्या बायकांना खांद्यावर उचलून जिंकण्याच्या इर्षेने पळत असतात.

संसाराचा भार वाहून नेणे यालाच म्हणत असावेत का अशी शंका मनात येतेच.

 

 

११. पापुआ न्यू गिनीच्या जंगलात अशी एक आदिवासी जमात आहे जी निसर्गापासून प्रेरित होऊन प्रथा पाळते. नर पक्षी मादी पक्ष्यांना प्रियाराधन करून त्यांना ‘पटवतात’.

तसेच इथले पुरुष सुद्धा अंगावर पक्ष्यांची पिसे चिकटवून आणि पक्ष्यांसारखा नाच करून स्त्रियांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतात.

त्यासाठी शरीराला विविध रंगात रंगवून सुद्धा घेतले जाते. मग एखादी स्त्री पटली तर ठीक, नाहीतर दुसरी समोर नाच सुरू.

 

 

१२. स्वप्नात येणाऱ्या पुरुषाशी लग्न करण्याची संकल्पना कशी वाटते? खरं वाटत नाही ना? पण आर्मेनिया देशात मात्र हे स्वप्न खरे ठरते!

एका विशिष्ट दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात विवाहेच्छूक मुलीने तिथला पारंपरिक खारट ब्रेड खायचा असतो.

त्यानंतर पाणी न पिता सरळ बेड वर एक झोप काढायची. त्या मुलीच्या स्वप्नात जो पुरुष पाणी घेऊन येईल त्या पुरुषासोबत तिचे लग्न लावले जाते.

 

 

आता स्वप्नात खरोखर कोण येतो की स्वप्नच येत नाही हे ती एकटी मुलगीच जाणो! पण अशी प्रथा मात्र आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version