‘व्यभिचारासाठी’ म्हणजेच विवाहबाह्य संबंधांसाठी देशोदेशी दिल्या जातात ‘या’ कठोर शिक्षा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
व्यभिचार हा फौजदारी गुन्हा नाही असा निर्णय भारतीय सुप्रीम कोर्टाने दिला होता. त्यावेळी हा निर्णय योग्य की अयोग्य अशा चर्चा नाक्यापासून ते सोशल मीडिया पर्यंत सगळीकडे घडताना दिसत होत्या. खरं तर चर्चांना उधाण आलं होतं.
अर्थात, व्यभिचार हा गुन्हा नसला तरी तो करण्याचा परवाना मिळालाय असे नाही हे लक्षात घेतले पाहिजे. नवरा किंवा बायको हे एकमेकांचे गुलाम नाहीत एवढाच त्याचा अर्थ!
सुप्रीम कोर्टाने या निर्णयासंबंधी नेमके काय भाष्य केले आहे बघुयात.
“व्यभिचारामुळे पती पत्नीच्या वैवाहिक संबंधात तणाव निर्माण होतो. त्यामुळे या व्यभिचाराच्या आधारावर घटस्फोट घेता येतो. मात्र, कुणावर व्यभिचार केला म्हणून फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकत नाही”
===
हे ही वाचा – हिंदू पुरुषांचे विवाहबाह्य संबंध: कायदा काय सांगतो आवर्जून वाचायला हवं
===
अनेक देशांमध्ये हा कायदा आधीच रद्दबातल केला गेला होता. दोन वर्षांपूर्वी भारतातही हा १५८ वर्षे जुना कायदा बदलला गेला. भारतात जरी हा कायदा बदलला असला तरी जगात मात्र काही ठिकाणी हा कायदा अजूनही लागू आहे.
वेगवेगळ्या देशात यासाठी काय नियम आहेत यावर आपण एक नजर टाकूया…
पाकिस्तानात महिलेला तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध करावे लागते. १९७९ मध्ये हुदुद नावाच्या अध्यादेशाद्वारे व्यभिचाराला अपराधाच्या स्वरूपात कायम ठेवले गेले. इथे महिलांसाठी अतिशय कठोर कायदे आहेत.
व्यभिचाराचा गुन्हा समोर आल्यास तो सिद्ध करण्यासाठी महिलेला साक्षीदार म्हणून चार पुरुषांची गरज पडते. जर ती आरोप सिद्ध करू शकली नाही तर तिच्यावरच उलट खटला दाखल केला जातो.
आहे ना ही उलटी गंगा? पाकिस्तानच्या मानाने भारतात स्त्रियांना बऱ्यापैकी कायद्याची मदत मिळते असे म्हणायला हरकत नाही.
तैवान देशात तर यापेक्षा अजब प्रकार बघायला मिळतो. इथे सरळ सरळ पुरुषांना माफी मिळते मात्र स्त्रियांना कोर्टात ओढले जाते. तैवान मध्ये व्यभिचाराला अत्यंत गंभीर अपराध मानतात. यासाठी एक किंवा जास्त वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.
तैवान मध्ये लैंगिक समानतेसाठी लढणारा कार्यकर्ता चेन यी चियानच्या म्हणण्यानुसार समजा पुरुष अशा गुन्ह्यात पकडला गेला तर तो तो माफी मागून सुटू शकतो परंतु स्त्री पकडली गेली तर तिला माफीची सवलत नाही. स्त्रियांना न्यायालयात ओढले जाऊन त्यांच्यावर खटला चालवला जातो.
चीनमध्ये विवाहबाह्य संबंधाला घटस्फोटाचा मुख्य आधार मानले जाते. व्यभिचार हा एक नागरी गुन्हा समजला जाऊन त्यासाठी कडक शिक्षा तसेच दंडही ठोठावला जातो.
स्त्री पुरुष असमानतेचे उदाहरण म्हणून फिलिपाईन्सकडे बोट दाखवता येईल. इथे व्यभिचाराच्या गुन्ह्यासाठी महिलेला सहा वर्षांची शिक्षा मिळते तर त्याच गुन्ह्यासाठी पुरुषाला चार महिन्याची शिक्षा मिळते.
समजा महिलेने विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे आढळून आले तर तो एक दंडनीय अपराध समजला जातो आणि तिची रवानगी सहा वर्षांसाठी तुरुंगात केली जाते.
याउलट समजा अशा प्रकरणात पुरुष आढळून आला तर त्याचा गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी त्याच्या पत्नीवर असते. तिला पुरावे आणि साक्षीदार जमा करावे लागतात. यात जर ती सफल झाली आणि गुन्हा सिद्ध झाला तर पुरुषाला जास्तीत जास्त चार वर्षांची शिक्षा होते.
शरियत कायद्यानुसार चालणाऱ्या मुस्लिम देशात मात्र व्यभिचार आणि विवाहबाह्य संबंध हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. सौदी अरब, सोमालिया, ब्रुनेई, सुदान, इराण, अफगाणिस्तान आणि अशा इतर काही देशात या कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जाते.
अर्थातच, इथल्या महिलांची स्थिती फार वाईट असून पुरुष या कायद्याच्या कचाट्यातून सुटतात आणि दोष मात्र बहुतेक वेळा स्त्रियांवर थोपवला जातो. इथे तुरुंगवास, आर्थिक दंड अशा सजा असल्या तरी अनेकदा या कायद्यानुसार देहदंड सुद्धा दिला जातो.
अमेरिकेतही व्यभिचार हा गुन्हा मानला जातो. अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळे कायदे यासाठी ठरवले गेले आहेत. एकूण वीस राज्यांमध्ये विवाहबाह्य संबंध हे अपराध श्रेणीमध्ये येतात.
विस्कोसिन, मिशीगन, इडाहो, ओक्लाहोमा आणि इतर काही राज्यात व्यभिचाराला गंभीर अपराध समजले जाते. विस्कोसिन राज्यात या गुन्ह्यासाठी साडे तीन वर्षे सजा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतूद आहे.
कागदावर जरी हे कठोर कायदे असले तरी अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात यांचा वापर क्वचितच आणि अपवादात्मक परिस्थितीतच केला जातो.
जाणून घेऊया अमेरिकेत या गुन्ह्यासाठी कुठल्या राज्यात काय शिक्षेची तरतूद केली आहे –
१. ऍरिझोना राज्यात जोडीदाराशिवाय इतर व्यक्तीसोबत संबंध ठेवले तर एक महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा आहे. इतकेच नव्हे तर ज्याच्या/जीच्यासोबत संबंध ठेवले त्या व्यक्तीलाही सारखीच सजा मिळते.
२. फ्लोरिडाबद्दल असे म्हटले जाते की, या राज्याचा बिकिनी हा ड्रेस कोड आहे. अशा परिस्थितीत जोडीदाराशी एकनिष्ठ राहणे तसे कठीणच काम! पण तरीही व्यभिचाराचा गुन्हा केल्यास दोन महिने तुरुंगवास आणि पाचशे डॉलरचा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे.
३. कंसास नावाच्या राज्यात जोडीदाराला धोका दिल्यास दोन महिने गजाआड जावे लागते आणि सोबतच पाचशे डॉलरचा दंडही भरावा लागतो.
४. इलिनोईड राज्यात गुन्हेगारांना कडक शासन मिळते. ज्या व्यक्तीने व्यभिचार केला आणि ज्या व्यक्तीसोबत व्यभिचार केला अशा दोघांनाही एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागतो.
===
हे ही वाचा – दरवाज्याआडचं स्त्री पुरुषाचं नातं दाखवता दाखवता भलतंच काहीतरी दाखवणारा प्रयोग
===
५. मॅसाच्युअट्स मध्ये तीन वर्षे तुरुंगवास आणि पाचशे डॉलर दंड.
६. ओक्लाहोमा मध्ये पाच वर्षे तुरुंगवास आणि पाचशे डॉलर दंड.
७. इडाहो मध्ये हजार डॉलर दंड आणि तीन वर्षे तुरुंगवास.
अशाच काही इतर राज्यांमध्येही सजा आहेत ज्या तब्बल दहा हजार दंड रकमेपर्यंत जाऊ शकतात.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.