आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारतात काँग्रेस पक्ष दीर्घ कालीन सत्तेत होता. भारताच्या आजवरच्या प्रगतीत काँग्रेस पक्षाचे योगदान आहे. पण जसं काँग्रेस पक्षाचं योगदान हे चांगलं जरी असलं तरी अनेक अशा गोष्टी आहेत, ज्या या पक्षाच्या प्रतिमेला न शोभणाऱ्या आहेत.
इतिहासात जेवढा स्वर्ण अक्षरात लिहला आहे, तितकी काळी छटा त्या इतिहासाला आहे.
काँग्रेस पक्षावर गांधी घराण्याचे प्रभुत्व अगदी पहिल्यापासून आहे. त्यात इंदिरा गांधी ह्या सर्वात प्रभावशाली नेत्या होत्या. परंतु त्यांनी बऱ्याचदा आपल्या प्रभावाचा दुरुपयोग पण केला. “आणीबाणी” हे त्याचेच एक रूप होते. ज्यामुळे देशभरात काँग्रेसविरोधात जनक्षोभ उसळला होता.
यातूनच पुढे १९७७ साली आणीबाणी उठली व झालेल्या निवडणुकित इंदिरा गांधींना पराभवाचा सामना करावा लागला होता. “जनता पक्ष” सत्तेत आला होता. इंदिरा गांधींना तुरुंगवास झाला होता.
परंतु तो आपली सत्ता टिकवू शकला नाही, त्यामुळे इंदिरा गांधी पुन्हा भारतात सत्तेवर आल्या पण या जनता पक्षाच्या काळात आणि काँग्रेस सत्तेत येण्याचा काळात एक अशी घटना घडली होती, जी खरे तर प्रचंड गंभीर होती परंतु ती आजवर दुर्लक्षित राहिली.
त्या घटनेचा घटनाक्रम आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. जो थक्क करणारा आहे.
२० डिसेंबर १९७८ ला, दोन मित्रांनी, एकाचं नाव भोलानाथ पांडे आणि दुसरा देवेंद्रनाथ पांडे यांनी इंडियन एयरलाईन्सचं प्लेन IC ४१० हायजॅक केलं. ज्यात १३२ प्रवासी लखनऊ ते दिल्ली असा प्रवास करत होते.
ह्या दोन्ही भावंडांकडे खेळण्यातली हत्यारं होती, त्याचा बळावर त्यांनी कित्येक तास विमानावर ताबा मिळवला होता. त्यांनी प्रवाशांना वेठीस धरले होते.
ह्या प्रकरणाची माहिती मिळताच भारत सरकारने त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित केला व त्यांना त्यांचा मागण्याबद्दल विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी फार आश्चर्यकारक मागण्या सरकारसमोर ठेवल्या!
मागणी १) – इंदिरा गांधी ज्यांना आणीबाणी नंतर कारावासाची शिक्षा करण्यात आली होती, त्यांची तत्काळ मुक्तता केली जावी.
मागणी २) – संजय गांधी ज्यांनी आणीबाणीच्या काळात केलेल्या निरनिराळ्या कारवाईमुळे त्यांच्यावर जे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते, ते सर्वच्या सर्व गुन्हे मागे घेतले जावेत.
आता ह्या मागण्या केल्यानंतर ह्या मागण्यांना तत्कालीन सरकारने किती भीक घातली आणि किती मागण्या मान्य केल्या, याबद्दल जास्त माहिती नाही. पण प्रवाशांची सुटका करण्यात सरकारला यश आलं होतं. ह्याबद्दल माहिती आहे. परंतु हे सर्व प्रकरण झाल्याच्या अगदी काही वर्षांनंतर १९८० साली काँग्रेसने त्यावेळी झालेल्या निवडणुकीत भुपेंद्र पांडे नावाच्या माणसाला लोकसभेचं तिकीट दिलं.
हा भुपेंद्र पांडे तोच होता, ज्याने विमानाचे अपहरण केले होते आणि इंदिरा गांधींच्या सुटकेची मागणी केली होती.
बहुतेक त्यामुळेच त्याच्यावर मेहरबानी दाखवत काँग्रेस पक्षाने त्याला लोकसभेच तिकीट दिलं होतं. सोबतच देवेंद्र पांडे देखील स्थानिक राजकारणात ताकदवान नेता बनला आहे.
काँग्रेस पक्षाने एका गुन्हेगाराला ज्याप्रमाणे तिकीट दिलं, ते योग्य आहे का नाही?
खरंतर हे जाणून घेण्यापेक्षा हया प्रकरणाला बाहेर कोणी काढलं हे जास्त महत्वाचं आहे, याची पण वेगळी कथा आहे.
–
- इंदिरा गांधींचा निर्णय, आत्महत्या करणाऱ्या बेगम अन दागिने विकून कुत्र्यांना पोसणारे नवाब
- …..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली!
–
१९८१ साली गजेंदरसिंह नावाच्या खालसा दलाच्या माणसाने असंच एक प्लेन हायजॅक केलं, त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्याची मागणी एकच होती खलिस्तानवादी संत जर्नईल सिंह भिंद्रेवाला, या खालसा दल प्रमुखाच्या सुटकेची मागणी केली, पुढे त्याला पकडण्यात आलं आणि कोठडीत बंद करण्यात आलं.
काही दिवसांनी लगेच खालसा दल त्याचा मदतीसाठी पुढे सरसावले, त्यांनी काँग्रेस सरकारवर आरोप केला की, जेव्हा भुपेंद्र सिंह व देवेंद्र सिंहने विमान हायजॅक केलं आणि लोकांचा जीव मुठीत धरला तेव्हा त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली गेली नाही, उलट त्यांना खासदार आमदाराची तिकिटे दिली. पण गजेंद्र सिंहला मात्र आरोपी ठरवण्यात आलं होतं.
अर्थातच ते करण्यामागे वेगळा उद्देश होता. तेव्हा ब्लु स्टार वगैरे मिशन इंदिरांनी राबवले. त्यामुळे खालसा व इतर तत्सम संघटना चिडल्या होत्या. पुढे यातूनच इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली.
आज भारताततील बहुसंख्य लोक या प्रकरणाबद्दल अनभिज्ञ आहेत.
अशी अनेक प्रकरणे काँगेसच्या दीर्घ कार्यकाळात घडली आहेत पण वेळीच ते दाबण्यात आले होते.
–
- ९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांना इंदिरा गांधी बिनशर्त सोडुन देतात तेव्हा…
- इंदिरा गांधी, नेहरू आणि केजीबीने गुप्तरीत्या भारतीय राजकारणात गुंफलेलं कपटी जाळं!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.