कोण म्हणत राजकारणात सुंदर चेहरे नाहीत? हे सुंदर चेहरे अनेकांचे लक्ष वेधून घेतात!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
हल्ली अनेक मोठ्या उद्योगातील महत्वाच्या पदांवर स्त्रिया महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. सुंदर स्त्रियांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दैदीप्यमान कार्यावरून आपल्याला त्यांच्या बुद्धीचीही चुणूक दिसते.
स्त्रियांच्या सुंदर व्यक्तिमत्त्वात तडफदार, भारदस्तपणा, रुबाबदार, आकर्षकता, मोहकता या पैलूंची भर पडली तर, त्या स्रियांना यशाची वाट मोकळी होत जाते आणि उंच शिखर गाठता येऊ शकते.
देशविदेशात राजकारणातही आपल्याला अशा सुंदर स्त्रिया असल्याचे दिसून येते. पाकिस्तान सारख्या देशातही राजकारणात पंतप्रधान आणि परराष्ट्र हितसंबंध जपणाऱ्या व्यक्ती म्हणून स्त्रिया आहेत.
भारतातील राजकारणात सुद्धा अशा अनेक सुंदर स्त्रियांनी यश मिळवले आहे. आजही काही सुंदर स्त्रिया चांगल्या पदावर काम करताना दिसतात. मोठ्या जबाबदारीच्या कामाचे नेतृत्व करताना दिसतात.
राजकारणात सक्रिय असणाऱ्या सुंदर स्त्रियांची यादीच आम्ही तुमच्यासाठी आणली आहे
१. अलका लांबा
एक शक्तिशाली राजकारणी स्त्री. आम आदमी पार्टीत नावाजलेल्या स्त्री राजकारणी म्हणून आज त्यांचे नाव आहे. एक प्रभावी नेत्या म्हणून आज त्यांना नाव मिळाले आहे. नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया ह्यात त्यांनी प्रभावी नेतृत्व केले. एक कणखर व्यक्तिमत्व म्हणून Go India foundation मध्ये त्यांचे नाव आहे.
२. डिंपल यादव
भारतीय राजकारणातील एक सुंदर आणि आकर्षक चेहरा. समाजवादी पक्षातल्या एक नावाजलेल्या महिला राजकारणी म्हणून त्या ओळखल्या जातात. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारलेले हे व्यक्तिमत्व आहे.
–
- या प्रांतातील स्त्रिया या जगातील सर्वात सुंदर मानल्या जातात…
- देशासाठी हेरगिरी करणाऱ्या ४ ललना, सुंदर पण त्यापेक्षा जास्त खतरनाक!
–
३. हरसिमरात कौर बादल
सुंदरता, बुद्धिमत्ता, नेतृत्व गुण, राजकारणातली जाण अशा अनेक गुणांचा राजकारणासाठी उपयोग करून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. अन्न प्रक्रिया विभागाच्या कॅबिनेट मिनिस्टर म्हणून त्या आज काम पाहतायत.
४. ज्योती मिर्धा
एक सुंदर, शांत, आणि भारदस्त व्यक्तिमत्व. सतत आपल्या कामात दंग असणाऱ्या प्रभावी राजकारणी. १९७२ सालचा त्यांचा जन्म. काँग्रेसतर्फे निवडणूक लढवून त्या निवडून आल्या. त्यांनी अनेक कामे जबाबदारीने हाती घेऊन त्याच्या पूर्णेतेसाठी धडपड करून लोकांसाठी कामे केली. आणि चांगला नावलौकिक मिळवला.
५. निकी हेली
एक भारतीय – अमेरिकन स्त्री. दक्षिण करोलीनाच्या पहिल्या भारतीय स्त्री गव्हर्नर म्हणून त्यांनी भारताचे नाव मोठे केले.
६. प्रियांका गांधी
सुंदर चेहेरा, सोज्वळ व्यक्तिमत्व, शांत आणि लोकप्रिय गांधी घराण्याची व्यक्ती म्हणून मतदार संघात मान. त्यामुळे त्यांना निवडणूक जिंकणे सहज शक्य होत गेले आणि राजकारणी घराणे म्हणून सतत मोठेपणा मिळत गेला.
७.प्रिया दत्त
व्यावसायिक आणि विशेष लक्ष देण्यासारखे असे नाव म्हणजे प्रिया दत्त. १४वी लोकसभेची निवडणूक पहिल्यांदाच मुंबईतून लढून निवडून आलेले हे स्त्री व्यक्तिमत्व. मुंबईच्या उत्तर मध्य मतदार संघातून निवडून आलेल्या ह्या स्त्री राजकारणी महिलेने आपल्या भागात नाव मिळवले.
–
- जगातील सुंदर आणि श्रीमंत मुस्लिम राजघराण्यातील या स्त्रिया माहित आहेत का?
- चिनी स्त्रियांच्या सुंदर नितळ त्वचेचं काय आहे रहस्य? जाणून घ्या.
८. रम्या आका दिव्या
तामिळ अभिनेत्री, सौदर्यवती आणि राजकारणी. वयाच्या ३०व्या वर्षी पार्लमेंटची निवडणूक लढून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
९. शझिया इलमी
अजून एक सुंदर व्यक्तिमत्व. त्यांनी सतत लोकांच्या कामात दंग राहून, लोकांची मने जिंकून राजकारणात सहज प्रवेश केला. त्या आम आदमी पार्टीचे प्रतिनिधित्त्व करत होत्या त्यांनतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
१०. श्रुती चौधरी
काँग्रेसमधील उत्तम राजकारणी स्त्री म्हणून नावलौकिक. महिलांच्या हक्कासाठी लढा देणारी स्त्री. त्यांनी शेती व्यवसायातील महिलांसाठी बरेच काम केले आहे.
११. नवनीत राणा –
कधीकाळची मॉडेल नंतर अभिनेत्री बनलेल्या नवनीत कौर आज खासदार आहेत. खासदार होण्याआधी त्यांनी अनेक साऊथच्या सिनेमांमध्ये काम केले आहे. जातीच्या खोट्या दाखल्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत.
१२. प्रणिती शिंदे
सामाजिक कार्य ते आमदारकी असा प्रणिती शिंदे यांचा प्रवास आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत. तीनवेळा त्या काँग्रेस कडून आमदार झाल्या आहेत.
अशा ह्या सौंदर्यावतींनी राजकारण पण गाजवले, त्यात मोठी प्रगती केली. अजूनही अनेक स्त्रिया सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या आहेत. त्यांनाही त्यांच्या पुढील राजकारणातल्या प्रगतीला शुभेच्छा!
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.