Site icon InMarathi

विमानात ही सुरक्षा नसेल तर प्रवाशांच्या नाक आणि कानातूनही रक्त येऊ शकतं!

flight im

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही दिवसांपूर्वी जेट एयरवेजच्या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासादरम्यान नाक आणि कानातून रक्त येण्याबद्दल तक्रार केली. त्यांचे म्हणणे असे होते की विमानातील केबिन प्रेशर कमी असल्यामुळे असे झाले.

हे विमान मुंबईवरून जयपुरसाठी रवाना झाले होते. मात्र या प्रवाशांच्या तक्रारीनंतर ते पुन्हा मुंबईलाच उतरविण्यात आले. त्यानंतर विमानातील प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या विमानातून १६६ यात्री प्रवास करत होते. त्यांना केबिन प्रेशर कमी झाल्यामुळे ऑक्सिजन मास्कचा वापर करावा लागला होता.

या घटनेनंतर जेट एअरवेजने कॉकपिट क्रू ला तपासणी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे.

डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन (डीजीसीए) चे अधिकारी ललित गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार जेट एअरवेजचा एक क्रू मेंबर केबिन प्रेशर मेंटेन राखणारे बटण दाबायचे विसरले, ज्यामुळे हा गंभीर प्रसंग घडला. यामुळे विमानाचे परत लँडिंग करण्यात आले.

या बोइंग ७३७ एयरक्राफ्ट मध्ये एकूण १६६ यात्री आणि ५ क्रू मेंबर होते.

ज्या लोकांच्या नाकातून आणि कानातून रक्त आल्याचे लक्षात आले त्यांना त्वरित प्रथमोपचारासाठी पाठविण्यात आले.

 

aljazeera.com

ज्यामुळे लोकांना इतक्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागले ते केबिन प्रेशर म्हणजे नेमकं काय असतं? आणि हे कमी झालं तर नाक आणि कानातून रक्त का येतं हे आपण जाणून घेऊयात.

केबिन प्रेशर म्हणजे काय ?

आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. आपण जसजसे समुद्रसपाटीपासून उंचावर जातो तसतसा हवेतील ऑक्सिजन विरळ होत जातो. वातावरणातील हवेचा दाब कमी होत जातो. यामुळे हवेतील ऑक्सिजनचे कण वातावरणात विखुरले जातात.

समुद्रसपाटीपासून ५.५ किलोमीटर नंतर हवेतील ऑक्सिजनची मात्रा जवळपास निम्मी होते. सात किलोमीटर पर्यंत ती केवळ एक तृतीयांश इतकीच उरते. यामुळे साहजिकच श्वसनाला अडथळा निर्माण होतो.

समुद्रसपाटीपासून केवळ २.५ किलोमीटर वर उडालो असता माणसाला डोकेदुखी, मळमळ, जीव घाबरा होणे, श्वास कोंडणे अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठीच सर्व विमाने ही आतून हवेचा दाब नियंत्रित करतात, जेणेकरून लोकांना श्वास घेण्यात काही अडथळा येऊ नये.

यामुळे बाहेर हवेचा दाब कमी झाला तरी लोक विमानात व्यवस्थित आरामात श्वासोच्छ्वास करू शकतात. विमानामध्ये इतक्या लोकांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर नेणे शक्य नसते. त्यामुळे आकाशात उपलब्ध असलेला ऑक्सिजन विमानामध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न केले जातात.

 

chinaaviationdaily.com

विमानाच्या इंजिनाशी जोडलेले टर्बाइन बाहेरील ऑक्सिजन कॉम्प्रेस करून आत घेतात. ही हवा इंजिनमधून आत येत असल्याने हवेचे तापमान वाढते. यामुळे श्वास घेणे कठीण होते. यासाठी शितीकरण तंत्रज्ञान (कूलिंग टेकनिक) वापरून ही हवा थंड केली जाते, ज्यामुळे हवेतील आर्द्रता कमी होते.

जर केबिनमध्ये काही कारणाने हवेचा दाब कमी झाला तर प्रत्येक सीटच्या वरच्या बाजूस एका अतिरिक्त ऑक्सीजन मास्कची व्यवस्था केलेली असते. गरज पडली तर प्रवासी तो वापरू शकतात.

विमानाच्या कोणकोणत्या भागांमध्ये प्रेशर एरिया असतात?

१. कॉकपिट

२. कॉकपिटच्या खालच्या बाजूला

३. केबिनमध्ये

४. कार्गो कंपार्टमेंटमध्ये

किती केबिन प्रेशर मशीन असतात?

विमानातील ऑक्सिजनची पातळी योग्य राखण्यासाठी दोन केबिन प्रेशर मशीन असतात.

एकावेळी एका मशीनची मोटरच काम करते. दुसरे मशीन हे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तरच वापरतात. ह्या दोन्हीही मोटार ऑटोमेटिक असतात. या दोघांशिवाय तिसरीही एक मोटर असते जी मॅन्युअली काम करते.

 

vox.com

स्वयंचलित दोन्हीही मोटर बंद पडल्या अथवा खराब झाल्या तर तिसऱ्या मोटरचा वापर केला जातो.

केबिन प्रेशर कमी झाल्यास पुढील गोष्टी संभवतात :

अधिक उंचीवरून विमान प्रवास करत असताना आपल्याला केवळ श्वास घ्यायलाच त्रास होत नाही, तर आपलं शरीर आणि मेंदू काम करण्याचे बंद करतो.

आपली चवीची आणि एखाद्या गोष्टीचा वास घेण्याची क्षमता ३०% इतकी कमी होऊ शकते. याच कारणामुळे विमानातील खाणे आपल्याला स्वादिष्ट लागत नाही.

हवेतील दमटपणा, आर्द्रता कमी झाल्याने आपल्याला तहान जास्त लागते. केबिन प्रेशर कमी झाल्यामुळे होणाऱ्या रक्तस्त्रावामध्ये नाइट्रोजनचे प्रमाण अधिक असू शकते. यामुळे सांधे दुखतात, चक्कर येऊ शकते, पक्षाघाताचा (पॅरिलिसिसचा) झटका येऊ शकतो. इतकेच नाही तर यामुळे एखाद्याचा मृत्यूदेखील ओढवू शकतो.

त्यामुळे आधीच योग्य ती काळजी घेणे उत्तम !

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version