Site icon InMarathi

एक असा चमचा ज्याने खाताना अन्न सांडत नाही; वाचा या चमच्याचे फायदे!

stable-spoon-marathipizza00

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तंत्रज्ञानाने मानवाला अनेक उपयुक्त गोष्टी दिल्या आहेत, ज्यामुळे माणसाचं जीवन बऱ्यापैकी सहज आणि सुलभ झालं आहे. आजही असे अनेक नवनवीन शोध लागतच आहेत आणि मनुष्य जीवन अधिक समृद्ध होत आहे. असाच एक शोध लावला आहे लिफ्टवेयर नावाच्या कंपनीने! या कंपनीने शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी एक असा चमचा बनवला आहे ज्यातून अन्न खाताना अन्न बाहेर पडत नाही.

स्रोत

शारीरिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तीला किंवा म्हाताऱ्या माणसांना स्वत:च्या थरथरणाऱ्या हाताने अन्न खाताना भयंकर त्रास सहन करावा लागतो. चमच्याने अन्न खाताना वारंवार ते खाली सांडत, त्यामुळे अन्न तर वाया जातंच, सोबतच अन्न खायचा कंटाळा देखील येतो. हीच समस्या लक्षात घेऊन लिफ्टवेयर कंपनीने त्यासंबधी संशोधन सुरु केले आणि एका अनोख्या चमच्याचा शोध लावला.

स्रोत

कंपनीने हा चमचा अश्या प्रकारे बनवला आहे की ज्यामुळे हा चमचा व्यक्तीच्या हालचालीनुसार अॅडजस्ट करत चमच्यातील अन्न खाली पडू न देता थेट व्यक्तीच्या तोंडापर्यंत पोहोचवण्यास मदत करतो. या उपकरणामध्ये इलेक्ट्रॉनिक मोशन स्टेबलाईजिंग टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे आणि जरी एखाद्या व्यक्तीचे हात थरथरत असतील तरी चमच्यातील अन्नाला खाली पडू देत नाहीत. त्यामुळे चमच्याने  अन्न खाताना कोणताही त्रास सहन करावा लागणार नाही.

स्रोत

अश्याप्रकारे हा आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण चमचा शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी वरदान ठरणार आहे.

कंपनीने रिलीज केलेला या चमच्याची संकल्पना स्पष्ट करणारा हा विडीयो नक्की पहा

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version