आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आपल्या देशात संस्कारांना फार महत्व आहे. घराघरांतील लोक आम्ही आमच्या मुलांवर किती चांगले संस्कार करतो ह्याची सतत एकमेकांशी स्पर्धा करत असतात.
एखादा मुलगा मुलीबरोबर दिसला किंवा एखादी मुलगी रात्री उशिरा घरी आली किंवा एखाद्या जोडप्याचा घटस्फोट झाला की लोक म्हणतात, “त्यांच्यावर चांगले संस्कारच नाहीत!” आणि आपल्या मुलांनी अशा “संस्कारहीन” लोकांपासून लांब राहिले पाहिजे. नाहीतर त्यांच्यावरही वाईट संस्कार होतील.
मुलीने उशिरा घरी येणे, सेक्सबद्दल उघडपणे चर्चा करणे, एखाद्या विचित्र रूढीला विरोध करणे, नवरा बायकोने विभक्त होणे अशा अनेक गोष्टी घराघरांत, कॉलनीमध्ये असलेल्या “गॉसिप काकूंच्या” व “सॅटेलाईट काकांच्या” मते संस्कारहीन आहेत.
तुम्हालाही जर ह्या अशा गॉसिप क्वीन काकू आणि रिकामटेकडया काकांच्या “तुमचा मुलगा/मुलगी वाया जात आहेत” ह्या रोषाला बळी पडायचे नसेल तर, कृपया खाली दिलेले चित्रपट अजिबात बघू नका.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
—
नाहीतर इन्स्टंट मॅगी सारखे तुमच्याही मनावर इन्स्टंट वाईट परिणाम होतील.
१. अन फ्रीडम
२०१५ साली आलेल्या ह्या चित्रपटात लेस्बियन संबंधांविषयी भाष्य केले आहे. ह्याच विषयावर दीपा मेहता ह्यांनी १९९६ साली फायर हा चित्रपट केला होता. दोन्हीही चित्रपट सेन्सॉर बोर्डाने आधी बॅन केले व अनेक लोकांनी ह्याचा निषेध केल्यानंतर ते प्रदर्शित झाले.
१९९६ ते २०१५ इतक्या वर्षात सेन्सॉर बोर्डाच्या विचारसरणीत अजिबात बदल घडलेला नाही. ते काळाबरोबर पुढे जायला तयार नाहीत. ठेविले अनंते तैसेची राहावे ह्यावर सेन्सॉर बोर्डाचा पूर्ण विश्वास आहे. पण तुम्हाला बोलणी खायची असतील तर तुम्ही हा चित्रपट नेटफ्लिक्स वर बघू शकता.
२. द पेंटेड हाऊस – चायम पूसिया वीडू
सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटावर बंदी घातली कारण ह्यात स्त्री पात्र संपूर्ण न्यूड दाखवले आहे. तशीच ह्या चित्रपटाची कथा म्हणजे एक सनसनीखेज सायकॉलॉजीकल ड्रामा आहे. उत्सुकता असल्यास हा चित्रपट सुद्धा ऑनलाइन उपलब्ध आहे.
३. द पिंक मिरर (गुलाबी आईना)
हा चित्रपट तृतीयपंथी लोकांच्या आयुष्याची गोष्ट सांगतो. कथेची व सादरीकरणाची आवश्यकता असल्याने ह्यात अनेक भडक गोष्टी दाखवल्या आहेत. तसेच ह्या चित्रपटात भाषा सुद्धा कथेची गरज म्हणून बेधडक वापरली आहे.
म्हणूनच सेन्सॉर बोर्डाने ह्या चित्रपटावर बंदी घातली आहे. तुम्हाला हा चित्रपट ऑनलाईन बघता येईल.
४. वॉटर
दीपा मेहतांचा हा आणखी एक वादग्रस्त चित्रपट आहे. या चित्रपटाच्या वेळी चांगलेच वादंग माजले होते.
ह्या चित्रपटात अजूनही काही ठिकाणी विधवांना काय काय सहन करावे लागते ह्याची गोष्ट सांगितली आहे.
विधवांचे केशवपन तसेच अनिष्ट रुढी व परंपरांवर या चित्रपटात प्रकाश टाकला आहे. यातील वादग्रस्त सीन्समुळे सेन्सॉर बोर्डाने ह्या चित्रपटावर बंदी घातली होती. हा चित्रपट तुम्ही ऍमेझॉन वर बघू शकता.
५. लस्ट स्टोरीज
नेटफ्लिक्स वर सुरू असलेली सिरीज लस्ट स्टोरीज ही एका स्त्रीच्या दृष्टिकोनातून लिहिली आहे.
ह्यात व्हायब्रेटर पासून ते ऑरगॅसम पर्यंत सर्व गोष्टी पडद्यावर दाखवल्या आहेत. पण ह्यात सर्वात सनसनीखेज गोष्ट म्हणजे ह्यात स्त्रिया स्वतःच स्वतःला आनंद देत आहेत हे दाखवले आहे.
ते आपल्या समाजात अजूनही अॅक्सेप्टेड नाही.
६. खुजली
ही एक शॉर्ट फिल्म आहे.बहुतेक ह्याच्या क्लिप्स अनेकांनी पाहिल्या असतील. ह्यात एक मध्यमवयीन जोडप्याची सेक्स व BDSM ची इच्छा असते व ते ह्यासाठी काय करतात हे दाखवले आहे . या दोन्ही गोष्टी भारतीय लोकांसाठी एलियन आहेत.
सेक्स ही फक्त नवीन लग्न झालेल्या लोकांसाठी करण्याची गोष्ट आहे, बोलण्याची तर नाहीच!
मध्यमवयीन लोकांनी याविषयी विचार करणे सुद्धा चूक आहे, अशी विचारसरणी समाजात असताना ही शॉर्ट फिल्म अनेक लोकांसाठी धक्कादायक ठरते.
७. मम्माज बॉईज
ह्या चित्रपटात पांडव व द्रौपदी ह्यांच्या लग्नाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. पण ह्यात एक डेंजरस ट्विस्ट आहे. तो ट्विट काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर युट्युब वर हा चित्रपट उपलब्ध आहे तो बघा.
दुसरीकडे तुम्हाला हा चित्रपट बघता येणार नाही कारण सेन्सॉर बोर्डाला ह्या चित्रपटावर आक्षेप आहे.
महाभारताशी भारतीयांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यातच जर भेसळ करून ती गोष्ट काहितरी वेगळीच दाखवली तर, भारतीयांच्या भावना दुखावू शकतील अशी भीती सेन्सॉर बोर्डाला वाटली असावी.
८. ब्राह्मण नमन
हा चित्रपट बघताना त्यात नायक ज्या गोष्टी करतो ते बघून तुम्हाला त्याचा राग येण्याची शक्यता आहे.
तीन मित्रांची ही गोष्ट आहे जे शारीरिक सुखापासून वंचीत असतात. तेच अनुभवायला मिळेल ह्या आशेने ते कोलकाताला जातात. तरुणांना मिळत नसणारे शारीरिक सुख हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.
ही समाजात घडणारी खरी गोष्ट आहे. तुम्हाला ही गोष्ट बघायची असल्यास नेटफ्लिक्स वर बघू शकता.
हे ही वाचा –
===
९. लिपस्टिक अंडर माय बुरखा
ह्या चित्रपटाने मध्यंतरी वादळ निर्माण केले होते. लहान,तरुण, म्हातारी, मध्यमवयीन, श्रीमंत, गरीब अशी स्त्री कुठल्याही वयाची, कुठल्याही घरातली का असेना, तिने स्वतःच्या इच्छा, स्वप्न सगळं बाजूला ठेवून फक्त समाजाने घालून दिलेले नियम पाळत आयुष्य जगायचं!
ते नियम कितीही जाचक आणि निरर्थक असले तरीही तिने ते नियम मोडायचे नाहीत. तसा विचारही करायचा नाही हा ह्या चित्रपटाच्या कथेचा गाभा आहे.
हा चित्रपट तुम्ही अमेझॉन प्राईम वर बघू शकता.
१०. पार्चड
स्त्रियांच्या एकमेकांशी असलेल्या मैत्रीवर हा सुंदर चित्रपट आहे. चांगली व खरी मैत्री आयुष्यात सगळ्या परिस्थितीत पाठीशी उभी राहून खंबीरपणे आधार देते. मैत्रीच्या आधाराने निरर्थक रूढी व पुरुषसत्ताक समाजाला विरोध करता येतो.
अशी ह्या चित्रपटाची गोष्ट आहे. हा चित्रपट सुद्धा तुम्ही अमेझॉन प्राईम वर बघू शकता.
११. अँग्री इंडियन गॉडेसेस
सहा वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या मैत्रिणी त्यांच्यातीलच एका मैत्रिणीच्या लग्नासाठी गोव्याला एकत्र येतात. त्यांना तिचा होणारा नवरा कोण हे माहीत नसतं.
तेव्हाच त्यांना कळतं की ती त्यांच्यातीलच एका मैत्रिणीशी लग्न करणार आहे.
तिच्या ह्या निर्णयाला तिच्या मैत्रिणी पाठिंबा देतात. लग्नाच्या आदल्याच रात्री त्यांच्यातील एकीचा बलात्कार होऊन खून होतो. पुढे त्या काय करतात?
हे बघायचे असेल तर हा चित्रपट नक्की बघा. ह्यात बलात्कार ही स्त्रीचीच चूक आहे असा विचार करणाऱ्यांना सणसणीत चपराक बसते.
१२. कमला की मौत
हा चित्रपट १९८९ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट काळाच्या खूप पुढे होता. ह्यात प्री मॅरीटल सेक्स, नको असलेली गर्भधारणा ह्या गोष्टी बेधडकपणे दाखवल्या होत्या. ह्या गोष्टी अजूनही समाजाने स्वीकारल्या नाहीयेत.
ह्याच इश्यूवर क्या कहना हा चित्रपट सुद्धा आला होता पण तो चित्रपट ह्या कलाकृतीच्या जराही जवळपास जात नाही. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार वर बघू शकता.
–
- “साजूक तुंप”च्या धोतरात गुंतलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत आता गावरान झुणका भाकर धुडगूस घालतेय!
- हास्यास्पद कारणे देऊन पाकिस्तानात या भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आलीय!
–
१३. गांडू
नावावरूनच हा चित्रपट वादग्रस्त वाटतो. हा कृष्णधवल चित्रपट संस्कार लव्हिंग लोकांसाठी अजिबात नाही.
कारण ह्या चित्रपटात भाषा अतिशय बोल्ड व सामान्य लोकांना रुचणार नाही अशी वापरली आहे. शिवाय ह्यात अनेक न्यूडिस्ट प्रसंग सुद्धा आहेत.
तरीही हा चित्रपट अनेक लोकांना आवडला कारण ह्यात एका रॅपरचा प्रवास अतिशय सुंदर प्रकारे दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर बघता येईल.
१४. Loev
हा एक सुंदर रोमँटिक चित्रपट आहे. ह्यात दोन पुरुषांची गे रिलेशनशिप दाखवण्यात आली आहे. ह्यात त्यांच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दाखवलेले नाही तर त्यांचे नाते किती सहज आहे हे दाखवले आहे.
गे नात्यांवर असलेला एक चांगला चित्रपट असे लोकांनी ह्या चित्रपटाचे कौतुक केले आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.
१५. रंग रसिया
हा चित्रपट प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा ह्यांच्यावर आहे.
समाजात स्त्रियांना त्यातल्या त्यात वेश्यांना काय स्थान आहे, त्यांना कसे वागवले जाते, पुरुषांचाही ह्यात सहभाग असून सुद्धा फक्त वेश्यांवरच कसे सगळे आरोप होतात, त्यांनाच कसे सगळे बोल लावतात –
असा ह्या चित्रपटाचा आशय आहे.
शिवाय ह्यात काही आक्षेपार्ह दृश्य सुद्धा आहेत. तुम्हाला नेटफ्लिक्स वर हा चित्रपट बघायला मिळेल.
१६. पप्पू और पापा
ही एक वेब सिरीज आहे. ह्यात फक्त आठ भाग आहेत.
ह्यात लैंगिक शिक्षण हा विषय हाताळण्यात आला आहे. हे आवश्यक असलेले शिक्षण आपण लहान मुलांना देत नाही. ह्या चित्रपटात हा विषय अतिशय उत्तमरित्या हाताळण्यात आला आहे. ही सिरीज युट्यूब वर उपलब्ध आहे.
तर मुलांनो ह्या गोष्टी चुकूनही बघू नका. नाहीतर तुम्ही भलत्या गोष्टी शिकाल आणि उगाच “संस्कारी” लोकांकडून बोलणी ऐकायची वेळ येईल!
–
- हे चित्रपट सुपरफ्लॉप ठरले… पण त्यातली गाणी मात्र आजही तुमच्या ओठांवर असतील…
- फाळणीनंतर भारतात आलेल्या ७ भावांनी ‘तसल्या’ चित्रपटांना दिलं ‘वेगळंच’ भन्नाट वळण!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.