तासाला तब्बल २५००० किमीचा पल्ला गाठणारं आधुनिक अँटीपॅड विमान
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
आपण चित्रपटामध्ये अनेकदा अशी विमाने पहिली असतील जी एका सेकंदामध्ये एका ठिकाणाहुन दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात. त्यांचा वेग इतका जबरदस्त असतो की डोळ्याची पापणी लवते न लवतेच तो ही विमाने कुठल्या कुठे पोचलेली असतात. पण हे फक्त चित्रपटामध्येच होऊ शकतं असा विचार करून आपण म्हणतो की खऱ्या जगात हे केवळ अशक्य आहे. अश्या विमानांबद्दल तुमचा विचार अजूनही बदलला नसेल तर तुमचा विचार आता बदला कारण, एका अत्याधुनिक अँटीपोड विमानाची संकल्पना पुढे आलीये, जे विमान प्रत्यक्षात अवतरल्यावर एका तासात तब्बल २५ हजार किमीचा प्रवास करू शकतं. म्हणजे चित्रपटामधील विमानांसारखं अवघ्या काही सेकंदामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात!
Bombardier कंपनीचे इंजिनियर Charles Bombardier यांनी कॉन्सेप्ट प्लेनचं एक असं डिजाईन तयार केलं आहे, जे केवळ ९० मिनिटांत जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला तुम्हाला पोहोचवू शकतं.
अँटीपोड नावाचं हे सुपरसॉनिक विमान कॉनकॉर्ड सुपरसॉनिक पेक्षा १० पट जास्त वेगवान आहे. या विमानात बसल्यावर न्युयॉर्क ते लंडन शहरापर्यंतचा प्रवास हा अवघ्या २० मिनिटांत पूर्ण करता येईल (ज्याला सामान्य विमानाने सुमारे पावणे सात तास लागतात.). कंपनी असा देखील दावा करत आहे की खुद्द नासाने या विमानाच्या संकल्पनेचे परीक्षण केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार –
या विमानामधून ४० हजार फुट उंचीवरून ५ मॅक वेगाने भरारी घेतली जाऊ शकते. त्यानंतर विमानामध्ये लावलेले सुपरसॉनिक इंजिन सुरु करून ही गती २५ मॅक पर्यंत वाढवता येऊ शकते.
‘Supersonic Ccombustion Ramjet Engine’ नावाच्या या खास सुपरसॉनिक इंजिनद्वारा पकडला जाणारा हा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा तब्बल २१ पट जास्त असेल. एका सामान्य बोईंग 747 विमानाचा कमाल वेग तशी ५७० मैल इतका असतो. त्या तुलनेत अँटीपोड विमानाचा कमाल वेग ताशी १६००० मैल इतका जबरदस्त असेल. हे विमान या गतीवर उडावे यासाठी Long Penetration Mode चा वापर केला जाईल. नुकतंच या माध्यमाचं परीक्षण नासाने केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एयर फोर्स वन या विमानाने प्रवास करतात. या विमानाचा ताशी वेग ५९४ मैल इतका आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे विमान एका तासासाठी जर उड्डाण घेत असेल तर त्यासाठी जवळपास १ करोड ३५ लाख रुपये इतका खर्च येतो.
आता तुम्ही विचार करा या प्रचंड वेगाचे अँटीपोड विमान तयार करण्यासाठी येणारा खर्च देखील किती प्रचंड असेल…!
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.