“क्रिकेटप्रेमी” असाल, तर ‘सिक्सर किंग’ बद्दलच्या या अविश्वसनीय गोष्टी वाचल्याच पाहिजेत
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
क्रिस गेल क्रिकेट विश्वातील एक फार मोठे नाव…
एकेकाळी अत्यंत गरीब परिस्थितीत असलेला क्रिस आपल्या कौशल्यांच्या आणि मेहनतीच्या बळावर क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत झाला.
कुठलाही क्रिकेट वेडा माणूस असो, क्रिस गेल आणि त्याच्या षटकारांविषयी भरभरून बोलतोच.
त्याचे मैदानातील वावरणे, त्याची डान्स करायची स्टाईल तर अगदी प्रत्येकाच्या चर्चेचा विषय आहे.
गेलबद्दल अशाच काही अज्ञात गोष्टी आणि त्याच्या कारकिर्दीचे विविध पैलू जाणून घेऊयात..
क्रिस गेलचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ मध्ये जमैका मधील किंगस्टन येथे झाला. क्रिसचे पूर्ण नाव ‘ख्रिस्तोफर हेन्री गेल’ असे आहे. यांना लाडाने ‘क्रेम्प’ किंवा ‘मिस्टर कुल’ असेही म्हटलं जायचं.
क्रिस गेल हा क्रिकेटमधील ऑलराऊंडर खेळाडू आहे. उजव्या हाताने बॉलिंग आणि डाव्या हाताने बॅटिंग करणे ही त्याची विशेषता आहे.
लहानपणी क्रिस गेल आणि त्याचा परिवार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून गेलाय. हा परिवार इतका गरीब होता की यांच्याकडे दोन वेळचे जेवायला सुद्धा पैसे नसायचे.
प्लास्टिक विकून, कचऱ्यातील भंगार शोधून त्यावर या परिवाराची गुजराण चालायची. क्रिस एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता की त्याला कित्येकदा पोट भरण्यासाठी चोरी सुद्धा करावी लागायची.
पण अश्या परिस्थितीत सुद्धा त्याने क्रिकेटवर जीवापाड प्रेम केले. मोठा क्रिकेटर बनण्याची महत्वकांक्षा त्याला त्या गरिबीतून आजच्या स्थानावर घेऊन आली आहे.
क्रिस गेलने आपल्या कारकिर्दीची सुरुवात जमैकासाठी खेळण्यापासून केली.
सुरुवातीला गेल काही चांगला परफॉर्मन्स दाखवू शकला नाही.
आपल्या पहिल्या वन डे मॅचमध्ये त्याने फक्त एक रन काढला होता. पण प्रयत्न चालूच ठेवून खेळात सुधारणा केली.
भारताच्या विरोधात क्रिसने पहिली वन डे १९९९ मध्ये खेळली होती.
हे ही वाचा :
- सिक्सर किंग युवराजच्या या खास आठवणी क्रिकेटप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत
- क्रिकेट म्हणजे अगदीच जवळचा विषय, मग या ६ अफलातून डॉक्युमेंट्रीज चुकवू नका!
२००२ मध्ये क्रिस गेल वेस्ट इंडिजचा असा खेळाडू बनला ज्याने एकाच वर्षात १००० रन बनवले. त्याला तिथून रनमशीन असे ओळखले जाऊ लागले.
वर्ल्ड कपमध्ये द्विशतक बनवणाऱ्या खेळाडूत विवीयन रिचर्ड्स आणि ब्रायन लारा सोबत क्रिस गेलचे नाव सुद्धा आहे.
इंटरनॅशनल वन डे क्रिकेट मधील एक मॅच मध्ये १५० पेक्षा जास्त धावा तीन पेक्षा अधिक वेळा काढणाऱ्या पाच खेळाडूंमध्ये क्रिस गेल सुद्धा आहे. असे अनेक रेकॉर्ड्स क्रिसच्या नावावर जमा आहेत.
एकेकाळी अन्नासाठी झगडणाऱ्या क्रिसचे सध्याचे उत्पन्न ७ बिलियन डॉलर्स पर्यंत आहे.
त्याने जमेकामध्ये एक आलिशान बंगला घेतला आहे, त्याची किंमत २५ करोड पेक्षा जास्त आहे. त्याच्या ताफ्यामध्ये मर्सिडीज, ऑडी, लंबोर्गीनी, रेंज रोव्हर अश्या अनेक महागड्या गाड्या आहेत.
जाणून घेऊयात क्रिस गेल बाबत काही माहीत नसलेल्या गोष्टी :
१. क्रिस गेलच्या हृदयात छिद्र आहे!
नोव्हेंबर २००५ मध्ये वेस्ट इंडिज संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना मॅच सुरू असतानाच अचानक गेलच्या छातीत दुखायला सुरुवात झाली. तो मैदानातच चक्कर येऊन कोसळला.
त्याला तात्काळ दवाखान्यात हलवले असता वैद्यकीय तपासणीतून असे आढळून आले की त्याच्या हृदयात छिद्र आहे. या बातमीमुळे वेस्ट इंडिजच नव्हे तर अख्खे क्रिकेट विश्व हादरून गेले.
एका उमद्या खेळाडूवर आलेले हे संकट पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.
क्रिस पुन्हा मैदानात उतरून फटकेबाजी करेल की, नाही ही शंका सर्वांनाच अस्वस्थ करत होती.
पण यातून लवकरच सावरून गेल पुन्हा मैदानात उतरला आणि आपल्या अफाट शैलीने त्याने सर्वांच्याच शंका दूर केल्या.
२. गेलची क्रिकेट खेळण्याची प्रेरणा –
तुम्ही मैदानात त्याचे चित्रविचित्र डान्स बघितले आहेत, त्याची गंगनम स्टाईल वरची अदा सगळ्यांनीच एन्जॉय केली आहे, एका मागून एक उत्तुंग षटकार खेचण्याची त्याची शैली वादातीत आहे.
पण हा क्रिस गेल आपल्या सर्वांसमोर कुणी आणला? तर त्याचे प्रशिक्षक हे काही आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच नव्हते, ना कुणी मोठे सेलेब्रिटी क्रिकेटपटू होते.
त्याला क्रिकेट शिकवलं त्याच्या शाळेतल्या शिक्षिकेने. होय! एका प्राथमिक शिक्षिकेने त्याच्या बॅटिंगमधील कौशल्य विकसित केले आहेत.
मिसेस जून हॅमिल्टन असे त्यांचे नाव. सध्या गेल जरी क्रिकेट विश्वाचा राजा असला तरी त्याचे पाय अजूनही जमिनीवर घट्ट आहेत. तो आपल्या शिक्षिकेला विसरला नाही.
आपल्या कारकिर्दीतील शंभराव्या टेस्ट मॅच साठी २०१४ मध्ये त्याने मिसेस हॅमिल्टन यांना समारंभपूर्वक आमंत्रित केले होते.
हे ही वाचा –
- मुद्दाम ‘नो बॉल’ टाकून हा क्रिकेटर ठरला देशासाठी ‘गद्दार’- वाचा, नेमकं काय झालं होतं?
- दोन भाऊ एकत्र आले, की ताकद कैक पटींनी वाढते! अशाच काही भन्नाट जोड्यांबद्दल…
३. गेल काही वर्षांपासून पाठदुखीने त्रस्त आहे
होय, तो मैदानावर खेळताना आपण त्याच्या खेळाचा आनंद लुटत असलो तरी तो गेल्या तीन चार वर्षांपासून पाठदुखीने अतिशय त्रस्त आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे.
तो स्वतः सुद्धा हे जाणवू देत नाही आणि वेदना लपवून आपल्या फलंदाजीने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अति क्रिकेट खेळल्याचा हा परिणाम आहे.
टेस्ट मॅच, वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट या सर्व क्रिकेट प्रकारात गेलचा सहभाग असतो. त्यामुळे ही पाठदुखी उद्भवली आहे.
क्रिकेट कमी खेळण्याचा सल्ला जरी त्याला मिळाला असला तरी प्रेक्षकांच्या अपेक्षा त्याला खेळण्यासाठी भाग पाडतो.
४. क्रिसचा दिलदारपणा
क्रिस ज्या गरीब परिस्थितीमधून वर आलाय तीच परिस्थिती त्याला जगावेगळं वागण्याचा आत्मविश्वास देते.
क्रिस दिलदार मनाचा आहे याची साक्ष त्याचे सहकारी नेहमीच देतात. तो अनेकांना अनेक प्रकारची मदत करतो.
एवढंच नव्हे तर वेस्ट इंडिज विरोधात दुसरी टीम जिंकली तरी सुद्धा तो विजेत्यांचे अभिनंदन त्याच उत्साहात करतो.
क्रिस गेलबद्दल काही खास गोष्टी :
गेलने २००४ या एकाच वर्षात चार शतक आणि चौदा अर्धशतक ठोकले आहेत.
गेल टेस्ट मॅचच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारा एकमेव क्रिकेट खेळाडू आहे.
आयपीएल मध्ये एवढ्या तीस चेंडूमध्ये शतक ठोकण्याचा रेकॉर्ड गेलच्या नावावर आहे.
वन डे मध्ये त्याने १५० पेक्षा जास्त विकेट काढल्या आहेत.
तीनशेच्या आसपास ट्वेन्टी ट्वेन्टी मॅचेस खेळून जवळपास २० शतक आणि ६५ अर्धशतक काढायचा पराक्रम क्रिस गेलने केला आहे.
पार्टी आणि डान्स करणे हे गेलचे विक पॉईंट्स आहेत.
क्रिस गेल नेहमी ३३३ नंबरचा शर्ट वापरतो.
तर असा हा आपला सर्वांचा आवडता षटकारांचा बादशहा, रनमशीन क्रिस गेल!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.