' या पदार्थांचं अतिसेवन वेळीच बंद केलं नाहीत तर तुम्ही कॅन्सरच्या विळख्यात अडकू शकाल – InMarathi

या पदार्थांचं अतिसेवन वेळीच बंद केलं नाहीत तर तुम्ही कॅन्सरच्या विळख्यात अडकू शकाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

खवय्येगिरी हा मनुष्यप्राण्याचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अमेरिकेत सर्रास हादडले जाणारे बर्गर असो, काबुली बिर्यानी असो, मामा मिया पास्ता इतालीयानो असो किंवा जापनीज सुशी. जगभरात सगळीकडे जोरदार खाऊगिरी चालते.

भारतात तर असंख्य पक्वान्न बनवली जातात. पारंपारिक आणि घरगुती पद्धतीने बनवलेले अन्न शरीराला पौष्टिक असते.

घरच्या तुपातील पदार्थ वजन वाढवत असले तरी किमान अतिघातक रोगांना निमंत्रण देत नसतात.

आजच्या घडीला सगळं जीवन फास्ट आणि सुपरफास्ट होत आहे. पारंपारिक पदार्थ बनवायला ३-४ तास लागत असताना आता सगळं कसं इन्स्टंट झालंय. नूडल्स, पॉपकॉर्न, सरबत सगळं फक्त ‘बस २ मिनट्स’ मध्ये.

नाही जमत घरी करायला तर फास्टफूड सेन्टर आहेतच. चमचमीत चव असल्याने जिभेचे चोचले पुरवायला कोणीच मागे पुढे पाहत नाहीत. घरी बनवलेले अन्न हल्लीच्या पिढीला तर आवडतही नाही.

दुधीची, पडवळाची भाजी स्वयंपाकघरातून हद्दपार होत आहे. त्याच्या जागी हल्ली इन्स्टंट पदार्थ, किंवा स्टेटस असलेल्या ब्रोकोली, अवाकाडो वगैरे येत आहेत. पार्टीच्या नावाखाली बर्गर, हॉटडॉग, पिझ्झा, चिप्स आणि थंड कार्बोनेटेड सरबते चालतात.

बाकी घरगुती उपमा, शिरा अगदी पंजाबी पराठा देखील कोणाला नको असतो.

 

burger InMarathi

 

जसे सिगारेट च्या पुडक्यावर मोठा वैधानिक इशारा असूनही पिणारे मजेत झुरके मारतात. तसेच अजिनोमोटो, जिलेटीन आणि इतर घातक पदार्थांची सूची वाचून देखील असे पदार्थ खाणाऱ्यांची संख्या कमी होत नाही.

जणू काही ह्यांना स्वतःच्या जीवाची पर्वाच नाही किंवा येणाऱ्या पिढीशी काही संबंध नाही असे वागतात.

कोणता पदार्थ आपल्याला किती घातक आहे आणि त्याचे सेवन किती प्रमाणात करणे योग्य ह्याचा कोणी विचार करतं का..?

काही पदार्थांमुळे ऍलर्जी, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटीस सारखे रोग जडतात हे आपल्याला माहीत असूनही आपण त्यांचे सेवन चालुच ठेवतो. पण कधी कधी काही पदार्थ अतिप्रमाणात खाल्ल्याने आपल्याला कॅन्सरचाही धोका आहे ह्याची कल्पना किती जणांना असते?

होय कॅन्सरचा धोका… खालील काही पदार्थांची यादी पहा. ह्यांचे सेवन जर तुमच्या आयुष्यात खूप जास्ती प्रमाणात होत असेल तर ते त्वरित कमी करा आणि शक्य असल्यास बंद करा.

१. डबाबंद पदार्थ (Canned food) :

बाजारात जास्त काळ टिकणारे काही पदार्थ हवाबंद डब्यात विकत मिळतात. जसे canned टोमॅटो, canned फिश, पाण्याच्या बाटल्या वगैरे. ह्या सगळ्या डब्यांच्या झाकणांना टिकाऊ म्हणून बेसफेनॉल ए (BPA) चे आवरण असते. जे आपल्या मेंदूतील तंतूंसाठी अत्यंत घातक असते.

 

canned-food-inmarathi
financialexpress.com

ब्रेन कॅन्सर होण्यासाठी अशाप्रकारचे डबाबंद पदार्थ कारणीभूत असतात. आपल्या शरीरात हार्मोनल बदल घडून आपल्याला कॅन्सर च्या दारात उभा करणारा हा BPA अशा बंद डब्यात किंवा बऱ्याच प्रकारच्या प्लास्टिक मध्ये आढळतो.

२. सोडायुक्त शीतपेये (Carbonated cold drinks) :

जॉन हॉपकिन्स स्कूल ऑफ मेडिसिन मध्ये एका रिसर्च द्वारे हे प्रमाणित करण्यात आले आहे की, ४मेल नावाचा घटक जो डार्क सोडामध्ये असतो तो माणसाच्या शरीराला घातक असतो.

 

Carbonated cold drinks-inmarathi
pond5.com

बाबा रामदेव तर असल्या पेयांचा वापर स्वछतागृह साफ करण्यास करावा कारण त्याने सगळे किटाणू मरतात, असे सांगतात. आणि असे असून देखील ही शीतपेये विक्रीचा उच्चांक गाठतात.

३. अपारंपारिक शेती (Genetically Modified Food) :

 

Genetically Modified Food-inmarathi
thepatriot.co.zw

अपारंपारिक पद्धतीने उगवलेल्या भाज्या, फळे हे आपल्या शरीरातील DNA ला अपाय पोहचवतात. हल्ली ९०% मका, सोयाबीन हे GMO असतात. अशांचे वारंवार सेवन कॅन्सरला आमंत्रण देते.

४. मैदा (Refined or White Flour) :

 

Refined or White Flour-inmarathi
idealraw.com

अतिशय मऊसूद पीठ आणि पांढराशुभ्र रंग असलेला मैदा हा अनेक पदार्थात मुख्यत्वे जंक फूड मध्ये वापरला जातो. ह्याची गलायसेमिक इंडेक्स खूप जास्ती असते, जी डायबेटीस वाढवायला मदत करते. शरीरातील अतिसाखर कॅन्सर पेशी वाढवायला मदत करणारा घटक आहे.

५. मोठ्या प्राण्यांचे मटण (Red Meat) :

प्राण्यांना आजार होऊ नयेत म्हणून त्यांना विविध औषधे दिली जातात. ती आपल्यासाठी एक प्रकारची घातक रसायने असतात. अशा प्राण्यांचे मटण खाल्ल्यास आपल्या पोटात काही रसायने जातात जसे सोडियम – नायट्रेट, सोडियम असकॉर्बेट, सोडियम डायसेटेट, सोडियम फॉस्फेट, डेक्सट्रोस (एक प्रकारची साखर) आणि GMO.

 

red meat-inmarathi01
popsci.com

हे सगळेच आपल्या पाचन क्रियेसाठी अत्यंत हानिकारक आहेत. हॉट डॉग जो हल्ली खूप प्रसिद्ध पदार्थ आहे तो लहान मुलांना अतिप्रमाणात खाऊ दिल्यास त्यांना ल्युकेमिया होऊ शकतो. हे मोठ्या प्राण्यांचे मटण ग्रील केल्यास कॅरसिनोजेन प्रकारचे रासायनिक द्रव्य बाहेर पडते जे कॅन्सर चा धोका वाढवते.

६. लाह्या (Popcorn) :

 

Microwave Popcorn-inmarathi
rd.com

लहानमुलांसकट सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे पॉपकॉर्न. इन्स्टंट पॉपकॉर्नच्या पिशवीला आतून कॅरसिनोजेन नावाच्या पदार्थाचा लेप असतो आणि ते पॉपकॉर्नमध्ये मिसळून जाते. असे पॉपकॉर्न खाल्ल्यास कॅन्सरचा धोका नक्कीच उद्भवतो.

७. अनैसर्गिक साखर (Artificial Sweetner) :

 

Artificial Sweetner-inmarathi
healthguide.net

अनैसर्गिक साखर बनवायला कॅरसेनोजेनिक रसायनाची गरज पडते जे कॅन्सरच्या पेशी वाढवण्यास कारणीभूत असते.

८. अनैसर्गिक मत्स्यशेतीतील मासे (Farmed Fish) :

 

Farmed Fish-inmarathi
earthtimes.org

मत्स्यशेती जरी चांगले पैसे कमावून देणारा उद्योग असेल तरी त्यातून मानवी शरीराला धोके पोहचू शकतात. मत्स्यशेती करताना त्यातील माशांना रोगाची लागण होऊ नये म्हणून सतत अँटीबायोटिक औषधे दिली जातात. पाण्यात पेस्टीसाईड्स मारले जातात. पारायुक्त विषारी रसायने फावरली जातात. ह्या सगळ्याचाच कॅन्सरशी थेट संबंध आहे.

९. अतिमिठयुक्त पदार्थ आणि लोणची (Salted and Pickled food):

 

Salted and Pickled food-inmarathi
livehistoryindia.com

विकतचे मिठात मुरवलेले पदार्थ आणि लोणची कॅन्सरला आमंत्रण देणारी असतात. ह्या अतिरिक्त मिठामुळे पोटाचा, आतड्याचा कॅन्सर संभवतो. तसेच आपल्या DNA किंवा RNA वर अतिशय वाईट परिणाम होतो.

१०. हैड्रोजेनेटेड तेल (Hydrogenated Oils):

 

Hydrogenated-Oils-inmarathi.jpg
infertility.org

आपले शरीर मेद पेशींची दुरुस्ती करण्यासाठी वापरते. पण अतिरिक्त प्रमाणात हायड्रोजेनेटेड तेल वापरल्यास ते अबनॉर्मल पेशींमध्ये वाढ करते ज्याने परिणामी कॅन्सरचा धोका असतो.

११. मद्य (अल्कोहोल) :

कुठल्याही प्रकारच्या मद्याचे अतिसेवन हे वाईटच. मग ती वाईन असो किंवा बिअर. दारू ही जठराचा कॅन्सर घडवून आणू शकतो. स्त्रियांनी दारू सोबत सिगरेट ही ओढल्यास त्यांना स्तनांच्या कॅन्सरचा धोका असतो.

 

rumours-about-alcohol-marathipizza03

 

अशी कॅन्सरची टांगती तलवार डोक्यावर घेऊन राहण्यापेक्षा आपल्या रोजच्या खानपानाच्या सवयी थोड्या बदलल्या तर आपण एक रोग विरहित आयुष्य जगू शकू. ह्यासाठी काय काय करावे?

◆ डबाबंद अन्नपदार्थ सेवन करण्यापेक्षा ताजी फळे आणि भाज्या खाव्यात
◆ समुद्रातील आणि नदीतील मासे सेवन करावेत, मोठ्या प्राण्यांचे मांस ताजे असल्यास खावे.
◆ शीतपेये, बाटलीतील पाणी आणि कोणत्याही प्रकारचे मद्य टाळावे.
◆ पॉपकॉर्न करावयाचे असल्यास मक्याचे दाणे काढून वाळवून ते भांड्यात फुलवावे.
◆विकतची लोणची, अतिसाखर युक्त पदार्थ खाऊ नयेत.
◆ मैद्याचा वापर कमी करावा.

शेवटी आपल्या देहाची काळजी आपण घेतली पाहिजे. पोट म्हणजे कचरा पेटी नव्हे. योग्य तो आणि योग्य पद्धतीने बनवलेला आहारच सेवन करणे उत्तम. रोगांना बळी पडून आयुष्य कमी करण्यापेक्षा पोटातील अग्नीला उत्तम अशाच अन्नाची आहुती द्यावी.

शेवटी अन्न हे पूर्णब्रम्ह आहे..!!


महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?