' “शाहरुख खान, तू सच्चा मुस्लिम नाहीस” : गणपती बसवल्याबद्दल मुस्लिमांची शाहरुखवर टीका – InMarathi

“शाहरुख खान, तू सच्चा मुस्लिम नाहीस” : गणपती बसवल्याबद्दल मुस्लिमांची शाहरुखवर टीका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सध्या अवघ्या महाराष्ट्रात उत्साहाचे व धामधुमीचे वातावरण आहे. महाराष्ट्राचे लाडके दैवत गणपतीबाप्पांचे घराघरांत आगमन झाले आहे व लहान थोर सगळेच गणपती बाप्पांची प्रार्थना व सेवा करण्यात गुंतले आहेत.

सर्वसामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळेच उत्साहात गणेशोत्सव साजरा करतात. मग ह्यात बॉलिवूड स्टार्स तरी कसे मागे राहतील?

अनेक बॉलिवूड अभिनेते व अभिनेत्री दर वर्षी भक्तिभावाने घरात श्रींची स्थापना करतात.

नाना पाटेकर, कपूर परिवार , सलमान खान, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी कुन्द्रा, श्रद्धा कपूर तसेच शाहरुख खान सुद्धा दर वर्षी घरात श्रींची स्थापना करून गणेशोत्सव साजरा करतात.

 

celebrity-ganeshotsav-inmarathi
Bollywoodlife.com

आपल्याप्रमाणेच आपले लाडके अभिनेते सुद्धा सण कसे साजरे करतात ह्याची सर्वच फॅन्सना उत्सुकता असते. पूर्वी सोशल मीडियाचा उगम झाला नसताना वर्तमानपत्र किंवा टीव्हीवरच्या बातम्यांवरून लोक अंदाज लावायचे की कुठला सेलेब्रिटी सण कसा साजरा करतो!

आता मात्र सोशल मीडियामुळे सेलेब्रिटी स्वतःच आपल्या घरी आपण काय करतो हे त्यांच्या फेसबुक, ट्विटर किंवा इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो पोस्ट करून फॅन्सना आपल्या सेलिब्रेशन्सचे अपडेट्स देत असतात.

ह्या गणेशोत्सवात सुद्धा अनेक सेलेब्रिटीजने आपापल्या अकाउंटवरून आपापल्या घरातल्या बाप्पांचे फोटो पोस्ट केले.

त्यावर सामान्य लोकांनी प्रतिक्रिया सुध्दा दिल्या. बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानला मात्र गणपती बसवल्याबद्दल अनेक मुस्लिम लोकांनी नावे ठेवली, त्याच्यावर टीका केली.

शाहरुखने फेसबुकवर त्याच्या धाकट्या मुलाचा म्हणजेच अब्रामचा गणपतीबाप्पाला हात जोडत असलेला फोटो पोस्ट केला होता. त्यावर कॅप्शन असे होते की

“आमच्या घरचे गणपती “पप्पा”, अब्राम बाप्पांना “पप्पा” म्हणतो.” शाहरुखने ही पोस्ट टाकल्यावर त्यावर अर्थातच प्रतिक्रिया उमटणार होत्याच!

 

त्याचे अनेक फॅन्स छोट्या अब्रामचा फोटो बघून खुश झाले तर अनेक मुस्लीम लोकांना मात्र शाहरूखचे घरी गणपती बसवणे आवडले नाही व त्यांनी शाहरुखवर यथेच्छ टीका केली.

अनेकांनी तर शाहरुखच्या धार्मिक श्रद्धेवर शंका घेत त्याला “तू सच्चा मुस्लिम नाहीस” असे म्हटले.

एका व्यक्तीने शाहरुखला म्हटले,

“आमचा गणपती? तू मुस्लीम असुनही असे कसे करू शकतोस?” तर ह्या पुढे जाऊन एक व्यक्ती म्हणाली की , “श्रद्धा असणे ह्यात काही चूक नाही परंतु त्याला “खोट्या देवाची” भक्ती करण्याची काहीही गरज नाही.”

नूर जहान नूर मोहम्मद नावाच्या व्यक्तीने शाहरुखला म्हटले की,

“ह्याला काय वाटलं हा अमर आहे? तू असे कसे करू शकलास? तू विसरलास का तुला मृत्यूनंतर अखिरत, जन्नत किंवा जहन्नुम मिळेल? तू काही सगळ्यांच्या वर नाहीस. ह्याला कुणीतरी योग्य मार्गावर आणण्याची गरज आहे. कृपा करून ह्याला कन्फ्युज करू नका.”

ह्याच कमेंटवर इमेन अल्लाल ह्या व्यक्तीने दुजोरा देऊन रिप्लाय केला की,

“तुझे बरोबर आहे भावा! हे भारतीय सण साजरे करणे हा आपल्यासाठी योग्य मार्ग नव्हे.”

 

comments-inmarathi
facebook.com

अनेक व्यक्तींनी तर हिंदूंच्या भावना दुखावतील अश्या नेहमीप्रमाणे कमेंट्स केल्या आहेत. नूर अहमद नावाच्या व्यक्तीने कमेंट केली आहे की,

“देव तोच आहे ज्याला कोणीही बघू शकत नाही. त्याला रंग, रूप, आकार नाही. तो अजन्मा आहे. त्याला कोणतेही आई वडील नाहीत. मग सच्चा मुस्लिम अर्धा हत्ती व अर्धा माणूस असलेल्या मूर्तीची पूजा व भक्ती कसा काय करू शकतो?”

तर अनेकांनी शाहरूखला मूर्तीपूजा इस्लाममध्ये गुन्हा आहे ह्याची आठवण करून दिली आहे. मुहम्मद दाऊद खान हैदरझी ह्याने असे म्हटले आहे की,

“शेम ऑन यु! एक मुसलमान असून सुद्धा तू मूर्तीची पूजा करतोस. ह्याने तुझे काहीही भले होणार नाही. ह्या जन्मानंतर तसेच कयामतच्या वेळी तुला प्रश्न विचारले जातील. तुझा इमान पक्का ठेव आणि आपल्या परिवारासह एक सच्चा मुसलमान हो!”

तर नीता अजहरी नावाच्या व्यक्तीने शाहरूखला विचारले आहे की,

“सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही नेमक्या कुठल्या धर्माचे आहात? माझ्या मते तुम्ही मुसलमान आहात.”

तर ताहीर राहू नावाची व्यक्ती म्हणते की,

“सो कॉल्ड मुस्लिम माणसा, तुला स्वत:ची लाज वाटली पाहिजे.”

 

sadhu-inmarathi
facebook.com

अमिनातू सानी ह्या माणसाचे म्हणणे आहे की मूर्तीपूजा इस्लाम मध्ये हराम मानली गेली आहे. कदाचित शाहरुख हा खरा मुस्लिम नाही. सुलेमान नावाच्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, “this is a madness as a muslim.

ईस्लाम मध्ये घरात मूर्ती आणणेच निषिद्ध मानले गेले आहे. आणि तुझा तर मुलगाच मूर्तिपुढे उभा आहे. हे करण्याची इस्लाममध्ये परवानगी नाही.”

एका फॅन ला शाहरुखची काळजी वाटून त्याने कमेंट केली आहे की,

“सर्व धर्मांचा आदर करावा ,पण शाहरुख हे बरोबर नाही. मला तुझी काळजी वाटते. एक मुस्लिम म्हणून निदान अखिरतचा तरी विचार करा. मला तुमची काळजी वाटते म्हणून सांगतो आहे.”

तर एक फॅन म्हणते की शाहरुख नक्की जहन्नुममध्ये जाणार आहे.

घरात गणपतीची स्थापना केल्याने तसेच अब्रामचा गणपतीला नमस्कार करतानाचा फोटो टाकल्याने शाहरुखला अनेक टोकाच्या कमेंट्स तसेच टीकेला सामोरे जावे लागले आहे. परंतु अनेक फॅन्स मात्र शाहरुखच्या बाजूने उभे राहिले आहेत. अनेकांनी शाहरूखला पाठिंबा दिला आहे.

 

abram-inmarathi

 

अनेक हिंदू फॅन्सने शाहरुखची पत्नी गौरी ही हिंदू असल्याची ह्या टीका करणाऱ्यांना आठवण करून दिली आहे. जिथे अनेक हिंदू फॅन्स शाहरुख ची बाजू घेताना दिसत आहेत तिथे अनेक मुस्लिम फॅन्सने सुद्धा शाहरुखचे कौतुक करत त्याला पाठिंबा दिला आहे. मुहम्मद कैफी ही व्यक्ती म्हणते की,

“एसआरके हा प्रत्येक भारतीय सण साजरा करतो. सॅल्युट टू यु सर!”

शानु मोहम्मद ही व्यक्ती म्हणते की,

“आम्ही केरळी लोकांनी खूप मोठ्या पुराचा सामना केला. आमच्या मदतीसाठी सर्व धर्माचे लोक धावून आले. आम्ही सर्वांनी एकत्र काम केले. एकत्र जेवलो, झोपलो. आम्ही एकत्र मंदिर, मशीद व चर्च स्वच्छ केले. एक चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न कर. देव आपल्यावर कधीही रागावणार नाही. लव्ह यू एसआरके. तू एक खूप चांगला पिता आणि खूप चांगला माणूस आहेस.”

शाहरुख अली नावाची व्यक्ती म्हणते की गणपती बाप्पा मोरया हा गजर ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. कारण? प्रेम व शांतता!”

 

sadhu-inmarathi
facebook.com

हसबुल खान नावाची व्यक्ती म्हणते,

“कम ऑन गाईज! त्याने काय करावे हा त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आपण अश्या देशात राहतो जिथे सर्व लोक सर्व सण साजरे करतात. तुमची संकुचित विचारसरणी खालच्या दर्जाची आहे.”

शाहरुख खानला अनेक मुस्लिम बांधव पाठिंबा देत आहेत परंतु दुर्दैवाने त्यांच्यापेक्षा टीका करणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे.आपल्या देशाच्या घटनेने आपल्या सर्वांनाच धार्मिक स्वातंत्र्य दिले असल्याने कुणावर श्रद्धा ठेवायची हा ज्याचा त्याचा खाजगी प्रश्न आहे.

परंतु हे कट्टर लोक मात्र जिथे तिथे आपलेच म्हणणे खरे करण्याच्या प्रयत्नात असतात. शाहरुखवर सच्चा मुसलमान नसल्याची टीका करणारे स्वतः तरी स्वतःचा धर्म पूर्णपणे पाळतात का हा खरा प्रश्न आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?