Site icon InMarathi

रझाकारांच्या ह्या ‘क्रूर’ कृत्यांच्या आठवणी आजही अनेकांच्या अंगावर काटा उभा करतात

razakars inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आधुनिक भारताच्या इतिहासात भारतीय स्वातंत्र्यसंग्राम ही सगळ्यात महत्वाची गोष्ट.

दीडशे वर्ष भारतावर राज्य केलेल्या, भारताच्या जनतेवर अव्याहत अत्याचार केलेल्या जुलमी ब्रिटीश राजवटीच्या विरोधात लढा देऊन भारताने स्वातंत्र्य मिळवले. तो दिवस म्हणजे १५ ऑगस्ट १९४७.

ब्रिटीशांचा युनियन जॅक खाली उतरून त्याच्या जागेवर भारताचा तिरंगा अभिमानाने मिरवू लागला.

 

NYOOZ

 

स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वतःच्या आयुष्याची, कुटुंबाची आणि धनाचीही आहुती देणाऱ्या हजारो सैनिकांचे डोळे तृप्त करणारा तो क्षण होता.

भारत स्वातंत्र्य तर झाला, पण तिथून पुढचा मार्ग किती खडतर असणार याची कल्पना फार कमी लोकांना होती.

सर्वात पहिले आव्हान भारतासमोर होते ते म्हणजे देशातील आपापल्या संस्थानाच्या अधिकारक्षेत्रात राज्य करणाऱ्या संस्थानिक राजांना भारत या संघराज्यात समाविष्ट करून घेणे.

 

Euratlas.net

 

हे काम वरकरणी वाटते तितके सोपे नव्हते.

पाचशेपेक्षा जास्त स्वतंत्र संस्थाने भारतात अस्तित्वात होती आणि त्या सगळ्या संस्थानिकांशी करार करून, काहींना धाक दाखवून, तर काहींना समजावून सांगत एका ध्वजाखाली आणायचे होते.

त्याशिवाय देश एकसंघ होणार नव्हता. स्वातंत्र्य भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात येण्यासाठी ही गोष्ट महत्वाची होती.

सरदार पेटेल यांच्या मुत्सद्देगिरीमुळे अनेक संस्थाने भारतात लगेच विलीन झाली. पण काही संस्थानांच्या विलिनीकारणाचा तिढा अजून सुटला नव्हता. त्यापैकीच एक संस्थान म्हणजे हैद्राबाद.

हैद्राबादचा निजाम हा त्याकाळचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणला जात असे. त्याचा भारतात विलीन होण्यास नकार होता. भारताचा मध्यावर एक स्वतंत्र राष्ट्र त्याला हवे होते.

आपल्या राज्याच्या आजूबाजूच्या परिसरात गस्त घालण्यासाठी त्याने “रझाकार” नावाची वेगळी फौज तैनात केली होती.

 

newindianexpress.com

 

या रझाकार सैन्याने आणि निजामाने प्रजेवर केलेले अत्याचार आजही आठवले तर अंगावर काटा उभा राहतो. नेमका कोण होता हा निजाम? आला कुठून?

तो भारताच्या मध्यावर असलेल्या एका राज्याचा इतका बलाढ्य शासक कसा बनला?

त्याने भारतातील निष्पाप लोकांवर कसे अत्याचार केले? जाणून घेऊयात..

आपल्या देशाच्या आजूबाजूला अनेक मुस्लिम राष्ट्रे असल्याने सगळीकडून ते लोक चालून आले आणि अनेक वर्षे भारतावर राज्य केले, सगळी संपत्ती लुटून नेली.

वर्षानुवर्षे इथेच स्थायिक झाले. लूटमार तर केलीच पण आपल्या देवतांची देवळे जमीनदोस्त केली. अनेक ठिकाणी स्त्रियांवर अत्याचार केले. दाग दागिने लुटले, लोकांची घरं लुटली, मारहाण केली.

आणि मोठी दहशत निर्माण केली. इतिहासात आपण पाहिले अनेक शाह्या इथे तळ ठोकून होत्या, निझाम शाही, आदिल शाही, कुतुबशाही, औरंगजेब,बाबर, हुमायून, कुतूबुद्दीन, हे क्रूर मुस्लिम लुटारू आपला देश लुटून गेले.

ह्यातला निझाम शहा हा शेवटचा, हैद्राबाद राज्य बळकावून त्यावर राज्य करत होता.वास्तविक पाहता त्यावेळी फक्त १४% मुस्लिम लोक हे आपली ताकद दाखवत होते.

हैद्राबाद राज्य हे हिंदू बहुल राज्य होते पण निजामशहा त्यावर राज्य करत होता.

 

india.com

 

या निजामाने काही कमांडो पळाले होते, त्यांचा प्रमुख होता कासम रझवी. ह्या कामांडोना “रझाकार” म्हणत.

हे रझाकार निजामाचे कायदे सगळ्यांनी पाळावे म्हणून दहशत निर्माण करून कायदे पाळायला लावायचे. न पाळणाऱ्याला कडक शासन केले जायचे.

त्याची हत्त्या केली जायची, त्याचे घर, शेतीवाडी लुटली जायची, त्यांच्या बायकांना बंदी बनवून अत्याचार केले जायचे.

तेलंगणातले लोक ह्या रझाकरांच्या जोर जाबरदस्तीला त्रासले होते, पण आवाज उठवू शकत नव्हते, आवाज करणाऱ्याचा आवाज कायमचा बंद केला जायचा.

त्यावेळी भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. ब्रिटीश तर फक्त भारतातली संपत्ती लुटायलाच आले होते, आधुनिक शस्त्रास्त्रांच्या जोरावर ते भारतावर राज्य करत होते.

त्यावेळी तेलंगणा हैद्राबाद हे स्वतंत्र राज्य होते पण तिथे निजामाची सत्ता होती. पण तो स्वतंत्र राज्य म्हणून मान्य करत नव्हता कारण संपूर्ण भारत हा त्याच्या ताब्यात घेण्याचा त्याचा मनसुबा होता.

पण ‘ब्रिटिश इंडिया’ असल्यामुळे तो हैद्राबाद सम्राट म्हणून मिरवत होता.

निजामाचे रझाकर रोज त्रास देत होते, हे रझाकर मजलिस-ए- इत्ते हादुल मुसलमीन ह्या राजकीय पक्षाचे हस्तक होते, म्हणजेच MIM हा पक्ष.

त्यामुळे ह्या रझाकरांच्या वर दबाव आणण्यासाठी तेलंगणातल्या लोकांनी ” स्वामी रामानंद तीर्थ ” ह्यांच्या नेतृत्वाखाली” आंध्र हिंदू महासभा” स्थापन केली. आणि रझाकरांना विरोध करायला सुरुवात केली.

 

BBC

 

त्यामुळे रझाकर आणखीनच उग्र झाले, त्यांनी तेलंगणातल्या अनेक लोकांचे बळी घेतले. स्त्रियांवर बलात्कार केले, ज्यामुळे तेलंगणातल्या लोकांचा विरोध कमी होईल.

पण लढा आणखीनच वाढला. सगळीकडून विरोध वाढला. कारण हिंदूंची संख्या जास्त होती.

इकडे भारतीय क्रांतीविरांचाही विरोध ब्रिटिशांना भारी पडायला लागला आणि त्यांनी भारत सोडायची तयारी सुरू केली. इंग्रजांनी भारत सोडला. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले.

पण… निझाम हैद्राबाद वेगळे करायला तयार होईना. त्याच्याशी नवीन भारत सरकारने अनेकवेळा चर्चा केली पण तो मान्य करेना. २९ नोव्हेंबर १९४७ रोजी निझाम ‘स्टँड स्टील’ ह्या करारासाठी तयार झाला.

पण रझाकारांच्या अत्याचारात काहीही फरक पडला नाही.

शेवटी सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे गृह मंत्री होते त्यांनी मोठाच निर्णय घेतला की आता निझामावर आणि त्याच्या ह्या पाळलेल्या रझाकरांवर पोलीस कारवाई करायची.

आणि “ऑपरेशन पोलो” सुरुवात करायचा आदेश दिला गेला.

 

the better india

 

भारतीय सैन्याचे प्रमुख मेजर जनरल जे.एन. चौधरी ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेना राज्यात ५ वेगवेगळ्या भागातून घुसली.रझाकर अनेक ठिकाणी भारतीय सेनेशी लढले पण त्यांचा टिकाव लागला नाही.

शरण येण्या पूर्वीची ही त्यांची धडपड होती. तो दिवस होता १८ सप्टेंबर १९४८.

मीर लायक अली हा निझामाचा प्रधान मंत्री आणि रझाकरांचा म्होरक्या कासम रझवी दोघांनाही अटक केले गेले.

आणि २३ सप्टेंबरला हैद्राबाद भारताचे घटक राज्य म्हणून घोषित केले गेले.

हैदराबादमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. पुढे १९४९ पर्यंत मेजर जनरल चौधरी ह्यांनी हैदराबादचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले. आणि नंतर एम . के. वेल्लोडी हे हैदराबादचे मुख्यमंत्री झाले.

पुढे MIM वर बंदी घालण्यात आली…….

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version