आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : नचिकेत शिरुडे
===
कोणीतरी बरोबरच म्हणेल शे,
जे तुम्हले भेटणार नाही पुऱ्या दुनियामा , ते तूम्हले भेटी खान्देशमा!
असा आमना खान्देश शे, छोटा शे पण दिलान दुनियापेक्षा मोठा शे. चला लोकेसोन तुम्हले आम्ही आज खान्देशना काही असा किस्सा सांगणार हाय की, तुम्ही भी म्हणाल, “ना कोणतं राज्य, ना कोणता देश, अख्ख्या दुनियामा भारी आमना खान्देश” !
आमना खान्देश म्हणजे जळगाव, धुळे, नंदूरबार, मालेगाव, बागलाण भाग एकत्र करीसन तयार व्ह्स, आमना खान्देश ले खान्देश नाव कसं पडणं ते तुम्हले आम्ही आता सांगणार हाये, दम धरिसन वाचा..
आमना खान्देशनी आराध्य दैवत शे आमनी कानबाई माता. मागना हजारो वरीस पासून आमना खान्देशी लोके “कानबाई” ना तीन दिवस ना थाट ठेवतस. कानबाई माता ना थाट जव्हय ऱ्हास तवय आमना खान्देशी लोकेसन्या घरले सोन्यानी चमक ऱ्हास.मुंबई पुना मा शिकाले जायेल , राहाले जायेल पोरे एक टाइम दिवाळी मा घर नाही येणार पन कानबाई ना थाट ना टाइम घरले येतस.
तीन दिन कानबाई माता आमना घरले रहाले येस. या कानबाई माता ना हा समदा प्रदेश शे म्हणून ह्या प्रदेशले लोके “कान्हदेश” म्हणत. पण जसा टाइम गया तसा त्याना अपभ्रंश व्हइ सण “खान्देश” व्हइ गया.
कानबाई माता ना उत्सव आमना कडे भला फेमस शे. आम्ही कानबाई माता ना उत्सवले मस्त नव्या कपडा घालतस, कानबाई नि गावभर मिरवणूक काढतस, मस्त कानबाई स्पेशल गाणे लाईसन नाचतस. मस्त मज्जा ऱ्हास कानबाईना टाईमले आमना गावाकडे.
दूर दूर ना नातेवाईक घरी येतस त्यानंमुळे आनंद , चैतन्य यांनमा वाढ व्ह्स, सर्व आनंदी आनंद व्हइ जास, मग वरीस भरणा दुःखे आमना लोके इसरी जातस, आमनी कानबाई माता आमना जीवन मा उल्हास लई सन येस.
जशी आमनी कानबाई माता शे तशी दुसरी गोष्ट आमना खान्देशनि फेमस शे ती म्हणजे खान्देशना इतिहास. आमना खान्देश भला प्राचीन प्रांत शे, आमना खान्देशले प्रभू श्रीराम , भगवान श्री कृष्ण , पांडव या सर्व महापात्रेसना पदस्पर्श लाभेल शे.
आमना खान्देशने वैभवशाली वाकाटक, सातवाहन या समद्या राजा लोकेस्न राज्य देखेल शे. आमना खान्देशने मुघल – सुलतान नि राजवट देखेल शे, आमना खान्देशने चक्रधर स्वामी ना महानुभाव पंथ अनुभवेल शे, आमना खान्देशने संत मुक्ताईना वारकरी पंथ अनुभवेल शे.
आमना खान्देशना पाटणादेवीना जंगलमा भास्कराचार्य सारखा गणिततज्ञ राहत व्हता. राजा ना राज तसा ब्रिटीश लोकेस्ना राज भी आम्ही देखेल शे, काँग्रेसनं ग्रामीण राष्ट्रीय अधिवेशन आमना फैजपूर मा व्हएल होतं, त्याले महात्मा गांधी येल व्हतात.
आमना खान्देशन मानचिन्ह हाय आमनी अहिराणी भाषा. मराठी भाषा अन अहिराणी भाषा मझात बराच फरक शे. आमनी अहिराणी भाषा मराठी, गुजराती आन हिंदी भाषा एकत्रित व्हईसन तयार व्हयेल शे.
आमना भाषाले खरं वैभव प्राप्त करी दिन आमना खान्देशनि कन्या बहिणाबाई चौधरीने. आमना मायबोली मा बहिणाबाईनी लिखेल कविता आज भी लोकेस्ले जिंदगीनि दास्तान सांगी जातस. आमनि बहिणाबाई जास्त शिकेल नव्हती पण. बठ्ठ्या दुनियेले शिकाडी गयी की जिंदगी ना खरा आनंद कसा मा शे ते.
आमना खान्देश प्रांतले बरंच वैभव लाभेल शे अन आमना कडे एक से एक टॅलेंट लोके शेतस. दुनिया भरणा पिक्चरे देखीसन आमना मालेगावना पोरे कंटाळी जायेल व्हतात. मालेगाव मा भी सुपर मॅन बनाडाना अन हॉलिवूडले टक्कर देवानि, हा इचार लई सन आमना मालेगावना पोरेसनी जुगाड लाया अन खान्देशी मॉलीवूड चालू कय व्हतं.
मग त्याना प्रोडक्शन खाले त्यासनि मालेगाव ना सुपर मॅन बनाडा व्हता, मालेगाव ना क्रिश बनाडा. त्यासना हाऊ प्रोग्रॅम देखीसन सब टीव्ही वालास्नि मालेगाव ना चिंटू बनाडा. आज भी आमना कड या पिक्चरे लोके देखतंस, येन माच लोकेसनी सुख शोधेल शे.
===
- खान्देशच्या इतिहासातील “पहिले पारंपारिक वाद्य पथक”…!
- काय आहे आपल्या देशातील राज्यांच्या नावामागील लॉजिक? जाणून घ्या…
===
असाच आमना खान्देशी डीजे गाना भी भलता चालतस. भाऊ मना सम्राट , गोसावी मी पाचोरावाला अन सावन ना महिनामा, ह्या गाना ऐकीसन आमना लोके येड्यांना गत नाचतस. जर लगीनना रातले हळद ना टाइम या गाणा वाजना नाहीत तर लगीन व्हएलच नाही शे, असं वाटू लागस.
अशीच आजून एक गोष्ट शे, जी वर्ल्ड फेमसशे. ती म्हणजे सारंग खेड्यानि जत्रा. आठे जत्रा ना टाइम घोडेसना खूप मोठा बाजार लागस, घोड्यासनी स्पर्धा व्हस, करोडो ना व्यवहार व्हस. आज भी त्याच पद्धतीने चालस जशी पूर्वी चाले.
आमना कडे राजकारण भी भलं चालस. आमना गाव कडला राजकारण पेक्षा त्यानातून भेटणारा पैश्यास्वर डोळा ठेवतस. मंग त्यानातून सुरू व्ह्स प्रचार आन प्रचारवरनी रोजंदारी. शेत मा जाई सण काम करा पेक्षा प्रचार कराले लोकेस्ले मजा येस. समदा नाही पण थोडा बहुत लोके ऐसाच करतस. त्यानमुळे आमना एक मुख्यमंत्री आत लोंग सत्ता मा नाही बसेल शे, तरी आमना लोके नाही सुधरत.
कसा बी असनात तरी आमना खान्देशी लोके स्वभावले प्रेमळ अन मदतगार राहतस. पण जेव्हडा त्या चांगला राहतस तेवढा तुम्ही राहिलं नाही तर मग मॅटर लै बिघडी जास. आमना कड म्हणच शे तशी “खान्देशीनि यारी म्हणजे घोड्यांनी सवारी अन, खान्देशीशी बिघाडी मंग गधडाभी लथाडी!”
आमना खान्देशी लोकेसनी एक विशेषता ऱ्हास, आमना बोलाना एक पॅटर्न ऱ्हास, त्याना गत सर्वा खान्देशी लोके बोलतस. त्यांमुळे खान्देशी माणुसले गर्दी मा भी कोणिबी वळखिलेस. तुमले एकच सांगस जर, तुमना कोणी खान्देशी दोस्त अशी तर त्याले धरी ठेवा, तो दगा फटका करायचा नाही.
तुम्हले मदतच करायचा वरून तुमले भूक लागी तेव्हा बिनधास्त त्यांना घर जाईसन पिठलं भाकरी, वांग्यान भरीत, मिरची ना खुडा, चटणी अन बाजरीन्या भाकरीन जेवण करिसन या. नाही तुमना आत्मा तृप्त व्हइना मंग बोला.
अशी आमना खान्देशनि माहिती, आमना भूमीना छोटा परिचय. तुम्ही येईसन देखी जा. तुम्ही भी देखीसन म्हणशाल,
” जे आम्हले नाही दिसणं जम्मू काश्मीर मा ते देख आम्ही खान्देशमा..!.”
जय हिंद! जय महाराष्ट्र! जय खान्देश!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.