' पहिल्या रात्रीची ‘ही’ विचित्र प्रथा बंगालमध्ये आजही पाळली जाते! – InMarathi

पहिल्या रात्रीची ‘ही’ विचित्र प्रथा बंगालमध्ये आजही पाळली जाते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लग्न म्हणजे दोन लोकांचाच नाही तर दोन कुटुंबांचा मिलाप. लग्नात दोन कुटुंब एकत्र येतात. लग्न हा कुठल्याही मुलीच्या जीवनातील सर्वात सुंदर प्रसंग असतो. अनेक मुली ह्या प्रसंगाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात. कारण ह्या प्रसंगानंतर त्यांचे जीवन पूर्णपणे बदलते.

लग्नानंतरची पहिली रात्र ही नवविवाहित जोडप्यांसाठी खूप खास असते. जवळपास जगातील सर्वच संस्कृतींमध्ये लग्नानंतरची पहिल्या रात्रीची प्रथा आहे.

 

First Night InMarathi Feature

 

पण बंगालमध्ये एक वेगळीच परंपरा निभावली जाते. ही काळरात्र, काळी रात्र म्हणजेच अशुभ रात्रीची प्रथा आहे. ही तीच रात्र आहे जेव्हा नवविवाहितांना एकमेकांपासून दूर राहावे लागते.

ज्यादिवशी नवविवाहिता आपल्या नव्या घरी येते ती रात्र ह्या जोडप्यांसाठी एवढी अशुभ का असते? ह्यामागे एक दंतकथा प्रचलित आहे.

भगवान शंकराची कन्या मनसा ही सापांची देवी होती. ती स्वतःचा स्वीकार देवांमध्ये व्हावा ह्यासाठी नेहमी झटायची. तिला वाटायचं की तिची देखील सर्वांनी पूजा करावी. पण तिला कुणीही स्वीकारले नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – नवरदेवावर तलवार उगारणे तर कुठे कपडे फाडून टाकणे: लग्न लावण्याच्या अजब रिती

 

maa-manasa InMarathi

 

चांद सौदागर हा एक श्रीमंत व्यापारी होता आणि ज्यांचे वडील श्रीमंत अनुयायींपैकी एक होते. त्यांना विचारले की, त्यांनी देवाच्या रुपात तिची उपासना करावी. पण गर्विष्ठ चांद सौदागरने ह्यासाठी नकार दिला. त्याने मनसाला देवी देखील मानले नाही.

त्यानंतर मनसाने त्याला शाप दिला. त्याची सर्व जहाजे समुद्रात गहाळ झाली. त्याच्या सहा मुलांचा मृत्यू झाला आणि त्याची संपत्ती नष्ट झाली. त्यानंतर देखील ह्या जिद्दी व्यापाऱ्याने स्वतःची चूक मान्य केली नाही. शेवटी त्याचा सर्वात लहान मुलगा लखिंदर ह्याच्या लग्नाचा दिवस आला.

मनसा देवीला अस्वीकृती दिल्याने तिने रागात येऊन त्या नवविवाहित जोडप्याला शाप दिला की,

नवविवाहिता पहिल्यांदा घरी आल्यावर हे नवीन जोडपं जी पहिली रात्र सोबत घालवेल तेव्हा नवरदेवाचा सापाच्या दंशाने मृत्यू होईल.

चांद सौदागरने महान वास्तुशिल्पकार विश्वकर्मा ह्यांच्याकडून नवविवाहित जोडप्यासाठी एक महाल बनविला. हा महाल प्रत्येक ठिकाणहून सील बंद होता. त्या महालात कुठलीही भेद किंवा छिद्र नव्हतं. जेणेकरून ह्या महालात कुठूनही साप येऊ शकणार नाही.

पण मनसा खूप हुशार होती. तिने विश्वकर्माला भयभीत केले आणि त्यामुळे विश्वकर्मानी ह्या महालात एक छोटे छिद्र ठेवले ज्यातून एक छोटासा साप जाऊ शकेल.

 

Begal wedding Inmarathi

 

नवविवाहित जोडपं ह्या महालात आपल्या पहिल्या रात्रीसाठी थांबलं होतं. लखिंदर ह्याच्या आईने नवीन नवरीला म्हणजेच बेहुला हिला मनसाच्या शापाबाबत सांगितले. त्यानंतर बेहुलाने पूर्ण रात्र आपल्या पतीचे रक्षण करण्याचे ठरवले.

तेव्हा कालनागिनीने ह्या महालात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण बेहुलाने अतिशय नम्रपणे तिच्या समोर दुधाची वाटी ठेवली. ते बघून कालनागिन लखिंदरला कुठल्याही प्रकारचे नुकसान न पोहोचवता परतली.

हे ही वाचा – नव्या नवरीची कौमार्य चाचणी : ‘ही’ घृणास्पद प्रथा पाहून चीड आल्यावाचून राहत नाही…

 

nagin Inmarathi

 

मग मनसाने निद्रेला बेहुलाला झोपविण्याकरिता पाठविले. त्यानंतर बेहुलाला झोप आली व कालनागाने छिद्रातून प्रवेश घेत लखिंदरला दंश केला ज्याने त्याचा मृत्यू झाला.

सकाळी सर्वत्र शोक पसरला होता पण बेहुला मात्र शांत होती. त्याकाळी सापाच्या दंशाने मृत्यू पावलेल्या लोकांचे अंतिम संस्कार केले जात नव्हते तर, त्यांना तरंगणाऱ्या चपळावर सोडून दिले जायचे.

 तेव्हा बेहुला हिने अशी घोषणा केली की ती देखील आपल्या पतीच्या मृतदेहासोबत दुसऱ्या जगात जाईल. तिथे देवीला शांत करेल आणि आपल्या पतीला परत जिवंत करेल.

अनेक कठीण परिस्थितींना पार करत बेहुला ही अखेर मनसाला भेटण्यात यशस्वी झाली. मनसा देवीची सावत्र माता पार्वती ही ह्या विधवेची दुर्दशा बघून भावूक झाली. तिने मनसाला बेहुलाच्या पतीला जीवनदान देण्याचा आदेश दिला.

 

kaal ratri bengal-inmarathi04

 

सर्प देवी मनसाने हा आदेश स्वीकारला पण एका अटीवर! ती अट म्हणजे चांद सौदागर ह्याने तिची पूजा करावी आणि पृथ्वीतलावर तिच्या पूजा अर्चनेचा प्रचार करावा.

बेहुलाला तिचा पती, सहा दीर आणि आपली नष्ट झालेली सर्व संपत्ती सोबत परतताना बघून चांद सौदागर भावूक झाला आणि सर्प देवी मनसाची पूजा करण्यासाठी तयार झाला. पण केवळ आपल्या डाव्या हाताने.

ह्यामुळे सर्प देवी मनसा संतुष्ट झाली, तिला देवांमध्ये एक स्थान मिळाले. त्यानंतर बेहुला आणि तिचे कुटुंब सुख, शांततेत नांदू लागले.

तेव्हापासूनच ही कालरात्रीची परंपरा सुरु झाली. त्यामुळे आजही नवविवाहित जोडपे पहिल्या रात्री वेगळे राहतात.

 

Build_Sexual_Tension Inmarathi

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा – ह्या स्पेशल कारणांमुळे अनेकांना, बंगाली मुली “भारी” वाटतात!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?