' त्या खऱ्या ‘रईस’ची कहाणी ज्यासोबत शाहरुखच्या ‘रईस’ची तुलना होतेय ! – InMarathi

त्या खऱ्या ‘रईस’ची कहाणी ज्यासोबत शाहरुखच्या ‘रईस’ची तुलना होतेय !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

नुकताच शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटाचा मोस्ट अवेटेड ट्रेलर लॉन्च झाला. ट्रेलर पाहून एक गोष्ट तर नक्की झालीये की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड धुमाकूळ घालणार ! या आधी डॉन चित्रपटामध्ये आपण शाहरुखने लीलया वठवलेलं गुन्हेगारी विश्वातलं पात्र पाहिलं. पण तो डॉन काहीसा मॉडर्न होता आणि हा रईस आहे अस्सल देसी.

आता आपण वळूया चित्रपटाच्या कहाणीकडे- अशी चर्चा सुरु आहे की रईस’ चित्रपटाची कथा बेतली आहे अब्दुल रईस लतीफ या दारू तस्कर माफियाच्या जीवनावर !

अब्दुल लतीफ हा अहमदाबादचा डॉन तर होताच, पण त्याला गुजरातचा किंग म्हणूनही ओळखले जायचे. १९८० च्या दशकामध्ये अब्दुल लतीफचा भरपूर बोलबाला होता. अंडरवर्ल्ड मध्ये त्याची उठबस होती. याच अब्दुल लतीफची भूमिका साकारतोय शाहरुख खान आणि त्याचा पाठीमागे हात धुवून लागलेल्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारतोय नवाजुद्दिन सिद्दिकी असं ट्रेलर पाहून अनेकांचं एकमत झालंय.

raees-abdul-latif-story-marathipizza01

स्रोत

अब्दुल लतीफची नेमकी कहाणी आहे तरी काय?

अहमदाबादच्या दर्यापूर भागात राहणाऱ्या अब्दुल लतीफ याने कालूपूर ओव्हरब्रिजच्या जवळ देशी दारू विकण्याचा धंदा सुरु केला. हा धंदा म्हणजे गुन्हेगारी विश्वात अब्दुल लतीफचे पहिले पाऊल होते. कालांतराने त्याने विदेशी दारूची विक्री करण्यासही सुरुवात केली. या धंद्यातून चांगली कमाई होत आहे हे पाहून त्याने शहराच्या कोट विभागातून काही गुंडांना हाताशी घेतले आणि आपली स्वत:ची एक गँग बनवली. अब्दुल लतीफने हत्यारांचा पुरवठा करणाऱ्या शरीफ खान या व्यक्तीशी हात मिळवणी केली आणि हत्यारांचा व्यापार देखील सुरु केला. अश्याचप्रकारे एक एक पाऊल टाकत अब्दुल लतीफ गँगस्टर बनला. पण तो स्वत: कधीही कोणत्या गँगवॉरमध्ये प्रत्यक्ष उतरला नाही. अब्दुल लतीफ याचे अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहीमशी जवळचे संबंध होते आणि मुंबई येथे झालेल्या १९९२च्या स्फोटात त्यानेच शस्त्रे पुरवली होती असा प्राथमिक संशय त्याच्यावर घेण्यात आला. अब्दुल लतीफच्या कारकिर्दीत त्याच्यावर एकूण ९७ केसेस रजिस्टर केल्या होत्या, ज्यापैकी १५ केसेसमध्ये त्याच्यावर हत्येचा चार्ज लावण्यात आला होता. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर १० ऑक्टोंबर १९९५ रोजी दिल्लीच्या जामा मस्जिदमध्ये सापळा लावून एटीएसने त्याला अटक केली. त्यानंतर दोन वर्षांनी तुरुंगातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये तो मारला गेला.

raees-abdul-latif-story-marathipizza03

स्रोत

चित्रपट निर्मात्यांच म्हणण मात्र वेगळ आहे. त्यांच्या मते,

अब्दुल रईस लतीफच्या जीवनाचा आणि ‘रईस’ चित्रपटाचा कोणताही संबंध नाही. चित्रपटाची कथा पूर्णत: काल्पनिक असून कोणत्याही गुन्हेगराचा उद्धार करण्याचा आमचा हेतू नाही.

परंतु चित्रपटामध्ये शाहरुखने वठवलेल्या पात्राची देहबोली अगदी अब्दुल रईस लतीफशी मिळतीजुळती आहे आणि ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येत की शाहरुखच्या तोंडून निघालेल्या बहुतांश डायलॉगच्या शेवटी “ऐसा” हा शब्द येतोच. प्रत्येक वाक्याच्या शेवटी “ऐसा” बोलण्याची अब्दुल लतीफला सवय होती आणि त्या गोष्टीसाठी गुन्हेगारी जगात तो अतिशय प्रसिद्ध होता.

raees-abdul-latif-story-marathipizza04

स्रोत

नक्की चित्रपटाची कथा कोणाशी संबंधित आहे किंवा नाही ते २५ जानेवारी रोजी चित्रपट रिलीज झाल्यावर कळेलच  तोवर दम धरायलाच हवा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?