' कार खरेदी करायला पैसे नव्हते म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं – InMarathi

कार खरेदी करायला पैसे नव्हते म्हणून त्याने जुन्या गाडीला Lamborghini च रूप दिलं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

नोकरी लागली की प्रत्येकाची दोन स्वप्न फुलु लागतात.

एक म्हणजे स्वतःचं घर आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या मालकीची आलिशान गाडी.

 

curbed

 

यामध्ये सध्याच्या महागड्या शहरांमध्ये स्वतःच्या मालकीचं घर घेणं हे अनेकांचं स्वप्न लवकर पुर्ण होत नाही, मात्र गाड्यांचे अनेक प्रकार सध्या बाजारात असल्याने गाडी विकत घेण्यासाठी फार वाट पहावी लागत नाही.

गाड्यांची हौस तर सगळ्यांनाच असते. महागडी का होईना पण एखादी छोटी कार हे स्वप्न उराशी बाळगून अनेकजण नोकरीची सुरुवात करतात.

अनेकदा पैशांची चणचण भासते, मात्र तरिही आपलं, आपल्या कुटुंबाची ही इच्छा पुर्ण करण्यासाठी धडपडणा-यांपैकी तुम्ही एक आहात?

 

wired

 

मग हा लेख तुम्हाला नक्कीच प्रेरणा देईल.

पण नवीन कार खरेदी करायची तर चांगले ५-१० लाख खर्च करावे लागतात. ज्यांना परवडतं ते जास्त विचार न करता कार घेऊनही टाकतात, तर काहींकडे पैसे नसतात पण तरीही कारची हौस काही केल्या कमी होत नाही. मग अशी लोक शक्कल लढवायला लागतात आणि अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतात.

अशीच काहीशी कामगिरी करून दाखवली आहे ड्रीटन सेलमानी यांनी !

पूर्वी कोसावा येथे राहणाऱ्या ड्रीटन सेलमानी यांना गाड्यांची प्रचंड आवड. त्यातल्या त्यात Lamborghini तर त्यांची ड्रीम कार! परंतु ही कार घेण्यासाठी  त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते.

स्वतःला कितीही समजावलं तरी ही गाडी त्यांना सारखी खुणावतं होती. पण परिस्थिती नाही म्हणून ते शांत बसले नाहीत.

त्यांच्या याच गरजेतून त्यांच्या अफाट कल्पनाशक्तीला चालना मिळाली. त्यांनी असा काही प्रयोग केला ज्याची आपण प्रत्यक्षात कल्पनाही करु शकणार नाही.

त्यांनी स्वत:च स्वत:च्या हाताने Lamborghini कार बनवण्याचा संकल्प सोडला आणि तो पूर्ण करूनही दाखवला. आता त्यांच्याकडे स्वत:ची Lamborghini कार आहे.

 

second-hand-car-lamborghini-marathipizza01

स्रोत

कदाचित तुम्हाला ही गोष्ट खरी वाटणार नाही, मात्र ही किमया या व्यक्तीने करुन दाखवली आहे.

स्वत:ची Lamborghini कार बनवण्यासाठी सेलमानी यांनी Mitsubishi Eclipse या सेकंड हॅण्ड कारचा आणि Mitsubishi Galant कारच्या इंजिनचा आणि इतर भागांचा अतिशय योग्य वापर केला.

 

second-hand-car-lamborghini-marathipizza02

स्रोत

हीच ती Mitsubishi Eclipse कार, जी सेलमानी यांनी २०१५ साली सेकंड हॅण्डमध्ये खरेदी केली होती. त्यावेळी केवळ प्रवासाच्या उद्देशाने त्यांनी ही कार खरेदी केली, त्याचा वापर सुरु असतानाच त्यांना लॅम्बर्गिनी ही गाडी घेण्याची इच्छा होती.

आणि आता याच गाडीचे रूप पालटून तिचे रुपांतर Lamborghini कार मध्ये झाले आहे.

 

second-hand-car-lamborghini-marathipizza03

स्रोत

त्यांना ही क्लपना सुचली तेंव्हापासून गाडीचं रुप बदलण्यापर्यंत ही सगळी कामं पूर्ण करण्यासाठी सेलमानी यांना पूर्ण १ वर्षाचा कालावधी लागला. तेव्हा कुठे एक दिमाखदार Lamborghini कारचे ते मालक झाले.

ही गाडी तयार करताना त्यांनी गाडीतील तंत्रज्ञानासह आपली आवड जपण्याचा प्रयत्न केला.

त्यांना आवडणारे रंग, डिझाईन या सगळ्याचा वापर करत त्यांनी  या Lamborghini कारमध्ये काळ्या आणि लाल रंगाच्या स्ट्रिप्स लावल्या आहेत, ज्या अल्बानिया देशाच्या झेंड्याचे प्रतिकात्मक रूप आहेत.

 

second-hand-car-lamborghini-marathipizza04

स्रोत

सुरवातीला त्यांनी जेंव्हा हे प्रयत्न सुरु केले तेंव्हा अनेकांना ही गोष्ट खोटी वाटली. काहींनी त्यांची चेष्टा केली तर काहींनी गाडी खराब होत असल्याचेही सल्ले त्यांना दिले.

मात्र लोकांच्या या टोमण्यांकडे फारसं लक्ष न देता ते आपल्या निर्णयावर ठाम होते.

अर्थात हा निर्णय घेतल्यानंतर त्यांची मेहनत सुरु झाली. सगळ्यात आधी वेगवेगळ्या लोकांकडून, इंटरनेट या माध्यमातूून त्यांनी गाडी तयार करण्याची माहिती मिळवली, त्यानंतर वेगवेगळे प्रयोग केले.

अनेकदा काही प्रयोग फसले, काही वेळा नुकसानही झालं, मात्र तरिही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही.

स्वत:च्या हाताने बनवलेल्या या Lamborghini कारमुळे सेलमानी यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे.

जेव्हा ते कार घेऊन बाहेर पडतात तेव्हा लोकांच्या वारंवार वळून पाहणाऱ्या नजरा त्यांचे डोळे भरून कौतुक करत असतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?