ओवाळणार नाही फक्त राखी बांधेन, ख्रिश्चन धर्म परिवर्तनाचा खेदजनक अनुभव
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखक : डॉ. मोहन पवार
—
माझी एक नात्यातली मावशी आहे, तिच्या विधवा मुलीसह (माझी मावसबहीन) ती एका खेड्यात राहते, दोघीही अंगणवाडी सेविका आहेत, कामाच्या निमित्ताने नाशिकमध्ये राहत असलो तरी इतरांसाखेच सनावाराला गावी जाणे ही माझ्यासाठीही नित्याची बाब आहे गावी गेल्यावर जशी इतर सर्व नातेवाईकांची भेट घेत असतो तसा मावशीच्या घरी भेट देणे ठरलेलेच.
रक्षाबंधनाला गावी गेल्यानंतर इतर बहिणींप्रमाणे राखी बांधण्यासाठी मी या बहिनीकडेही गेलो, गेल्यानंतर ती मला म्हणाली ‘मी तुला ओवाळणार वगैरे नाही फक्त राखी बांधेल’ हे वाक्य ऐकून मी अवाक झालो.
नेमके प्रकरण काय आहे, हे कळायला मला मार्ग राहिला नाही. दरम्यान राखी बांधून झाल्यानंतर मी सहजच तिच्या घरात नजर फिरवली असता प्रकरणाची गंभीरता माझ्या लक्षात आली.
आधी तिच्या घरात भिंतीवर टांगलेले हिंदू देवदेवतांचे सर्व फोटो तसेच घराच्या कोपऱ्यात असणारा देव्हारा गायब होता त्यांची जागा आता कुंवारी मारियम व श्रीकृष्णासारख्या भासणाऱ्या येशूच्या फोटोंनी घेतली होती.
एकूण मामला थोडाथोडका नव्हे तर फारच गंभीर असल्याचे माझ्या लक्षात आले व त्यांना माझ्या स्वभावाची जाणीव असल्याने हे सर्व समजल्यानंतर मी रागावेल याची माहिती असल्याने त्यांनी मुद्दामहून माझ्यापासून या सर्व गोष्टी लपवल्याचेही माझ्या लक्षात आले.
त्याही थोड्या घाईत असल्याने मी लगेच विषय काढण्याचे टाळून सायंकाळी निवांत वेळेत त्यांच्याशी बोलण्याचा निर्णय घेऊन बाहेर पडलो.
सायंकाळी दोघींना विचारात घेऊन निवांतपणे विचारपूस केली असता समोर आलेले सत्य असे की, अंगणवाडी सेविका म्हणून निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभी असणारी म्हातारवयाकडे झुकलेली माझी मावशी रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी अशा वयोमानाने येणाऱ्या आजाराने त्रस्त आहे.
त्यातही संपूर्ण आयुष्य कष्टात गेल्यामुळे मानसिक व शारीरिक तणावामुळे येणारा ‘फायब्रोमायाल्जिया’ हा आजार जडलेला आहे.(यावर काही फिक्स असा उपचार उबलब्ध नसून, लक्षणांनुसार गोळ्या औषधे घेणे तसेच शारीरिक व मानसिक तणावातून मुक्तता हाच याचा इलाज आहे. हे मी इथे मुद्दाम नमूद करतोय) अर्थातच अनेक वेगवेगळ्या डॉक्टरांकडून उपचार घेऊनही तिला आराम मिळत नव्हता.
साधारण ७-८ महिन्यांपूर्वी तिच्या एका समवयस्क ख्रिच्चन मैत्रिणीने या सर्व व्याधींमधून सुटका होण्यासाठी तिला चर्च मध्ये येऊन फादर देतात ते कसले तरी पानी नियमित पिण्याचा व येशूची साधना करण्याचा आग्रह केला.
आजारपणातून मुक्ततेसाठी काहीही करण्यासाठी तयार असलेली मावशी मग हाही प्रयत्न करून बघू असा विचार करून नियमित चर्चमध्ये जाऊ लागली व तिच्या म्हणण्यानुसार तिला आजारांपासून काही प्रमाणात आराम ही मिळाला (कारण मनापासून केलेल्या साधनेने मनशांती मिळते व त्यायोगे व्यक्तीची इच्छाशक्ती व मानसिक खांबीरता वाढून शारीरीक व्याधींनाही आराम मिळतो हे विज्ञान ही मान्य करते).
मावशीला आराम मिळाल्यानंतर तिच्या बरोबर राहणारी गरिबीने व विविध व्याधींनी त्रासलेली मुलगी त्याच मार्गावर गेली व आता त्या संपूर्ण घरातूनच हिंदू देवदेवता हद्दपार झाले आहेत. अधिक माहिती घेतली असता परिसरातील अनेक हिंदू स्त्रियाच नव्हे तर कुटुंबेच्या कुटुंबे चर्चमध्ये जात असल्याची माहिती मिळाली.
मावशीने सांगितल्यानुसार त्यांना यासाठी धर्म बदलण्याची वगैरे सक्ती केलेली नसून चर्चमधील फादरने फारच कमी (?) बंधने घातली गेली आहेत..जसे की
-हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश करायचा नाही
-घरातही हिंदू देवीदेवतांची पूजा करायची नाही
-हिंदू सणवार साजरे करायचे नाहीत
-फक्त आणी फक्त प्रभू येशूची साधना करायची
-कालांतराने ज्याला वाटेल त्यानेच बाप्तिस्मा वगैरे घेऊन ख्रिच्चन धर्म स्वीकारायचा (होय अवघ्या ८ महिन्यात जुन्या काळातली ७ वि शिकलेल्या मावशीला बाप्तिस्मा पासून ख्रिच्चन धर्मातल्या सर्व परंपरांची इथंभूत माहिती आहे).
मावशीच्या कपाटात आता फक्त येशू व ख्रिच्चन धर्माशी निगडित पुस्तके आहेत, मोबाईलमध्ये हिंदू भावगीतांच्या चालींवर रचलेली येशूचा महिमा सांगणारी ध्यानगीते आहेत (तिच्या सांगण्यानुसार तिच्या ख्रिच्चन मैत्रिणीने तिला हे सर्व मोबाईल मध्ये भरून दिले आहेत).
हे सर्व ऐकून भयचक्क झालेल्या मला मात्र घरी जाऊन रात्रभर झोप लागली नाही.
रागावून किंवा चिडून हा प्रश्न सुटणार नाही हे एव्हाना माझ्या लक्षात आले होते त्यामुळे सकाळी उठून परत एकदा मावशीचे घर गाठून ख्रिच्चन मिशणार्यांच्या धर्मांतराच्या या स्लो पॉइजन पद्धतीबद्दल त्यांना शक्य तेवढे समजावन्याचा प्रयत्न मी केला. त्यांनी माझ्या हो ला हो केलेला असला तरी त्यांच्या एकूण हावभावावरून या फेरीला माझी हार झालीय.
हे सत्य स्वीकारून पुढील वेळी मावशीसाहित या स्लो पॉइजनला बळी पडलेल्या आसपासच्या सर्वांना एकत्र करून त्यांचे मनपरिवर्तन करण्याच्या निच्छयासाहित मी परतीच्या प्रवासाला निघालो.
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.