एका कारखाना कामगाराचं दणदणीत कर्तृत्व: त्याच्या नावाने झाला जागतिक पुरस्कार सुरू
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
आशियाचा नोबेल म्हणून ओळखला जाणारा मॅगसेसे पुरस्कार मनिला येथील द रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशन तर्फे दरवर्षी देण्यात येतो. फिलिपीन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावाने १९५७ पासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता.
सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणार्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
या पुरस्काराची सुरूवात न्यूयॉर्कमधील रॉकफेलर भावंडांनी केली होती. हा तोच अवॉर्ड आहे जो अरविन्द केजरिवाल आणि किरण बेदी ह्यांना मिळाला होता.
२०१९ मध्ये पत्रकार रवीश कुमार यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

पण ज्याच्या नावावर हा अवॉर्ड दिला जातो तो रॅमन मॅगसेसे आहे तरी कोण? आणि का त्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो? जाणून घेऊ…
रॅमन मॅगसेसे ह्यांचे पूर्ण नाव Ramón Del Fierro Magsaysay, हे फिलिपिन्सचे ७वे राष्ट्रपती होते. ह्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९०७ ला Zambales येथील एका लोहाराच्या कुटुंबात झाला. त्यांची आई एका शाळेत शिक्षिका होती.

१९२७ पर्यंत त्यांनी हाय स्कूलचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण त्यांनी कॉमर्समध्ये केले. आपला खर्च काढण्यासाठी त्यांनी एका ऑटोमोबाईल कंपनीत काम देखील केले.
त्यांचे सर्वात मोठे यश म्हणजे कम्युनिस्ट ह्यांच्याद्वारे देशात चालविण्यात येणाऱ्या Hukbalahap Movement ला संपवणे हे होते. ते फिलिपिन्सचे रक्षा विभागाचे सचिव असताना त्यांनी ही कामगिरी बजावली.
त्यासाठी त्यांनी सेनेत फेरबदल केले, भ्रष्टाचारी आणि कामचुकार लोकांना बाहेरचा रस्ता दाखवत इमानदार आणि कष्टकरी शेतकऱ्यांना ह्यांनी सेनेत भर्ती करवून घेतले. त्यांच्या अभियानाला आधुनिक इतिहासात सर्वात यशस्वी Anti-Guerrilla अभियान मानले गेले.
देशाचा राष्ट्रपती म्हणून त्यांनी त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक ठोस निर्णय घेतले. त्यापैकीच एक म्हणजे त्यांनी अमेरिकेशी आपले संबंध घट्ट केले. एवढचं नाही तर फिलिपिन्समध्ये भूमी सुधार रॅमन मॅगसेसे ह्यांच्याच कार्यकाळात झाला.
फिलिपिन्समध्ये त्यांची ओळख एक समाजवादी नेता म्हणून होती. ज्या देशात राष्ट्रपतीला ‘His Excellency’ असं म्हणण्याची प्रथा होती तिथे त्यांनी स्वतःला ‘Mr. President’ म्हणवून घेतले.

दुसरे महायुद्ध सुरु झाल्यानंतर ते फिलिपिन्सच्या सेनेत भर्ती झाले. त्यांच्यातील लीडरशिप क्वालिटी ही ह्याच दरम्यान समोर आली, जेव्हा त्यांनी जपानी सेनेविरोधात आपल्या सेनेचे नेतृत्व केले. त्यानंतर देशभरात त्यांच्या वीरतेचे गुण गायिले गेले.
२२ एप्रिल १९४६ ला लेबर पार्टीकडून संसदचे सदस्य बनले. त्यानंतर त्यांना गुरील्ला युद्धाला संपविण्यासाठी चयनित कमिटीचे अध्यक्ष बनविण्यात आले.
१९४९ साली ते पुन्हा संसद म्हणून निवडले गेले. ह्यावेळी त्यांना रक्षा कमिटीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. तेव्हा त्यांनी युद्धाला पूर्णपणे संपविण्याचा मसुदा तत्कालीन राष्ट्रपती ह्यांनी सोपवला, ज्यामध्ये ते यशस्वी देखील झाले.
–
–
ह्यानंतर त्यांनी स्वतः राष्ट्रपतीची निवडणूक लढण्याचा निश्चय केला. त्यांना देशाच्या जनतेने देखील भरभरून प्रतिसाद दिला आणि ते निवडणूक जिंकून राष्ट्रपती बनले.

रॅमन मॅगसेसे ह्यांच्या कार्यकाळ फिलिपिन्सच्या इतिहासातील सुवर्णकाळ मानला जातो. त्यादरम्यान फिलिपिन्स हा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात स्वच्छ देश बनला.
रॅमन मॅगसेसे ह्यांना राष्ट्रपती असताना एका वर्षात साठ हजार तक्रारी मिळाल्या ज्यापैकी तीस हजार तक्रारींचे लगेच निवारण देखील करण्यात आले. तर २५ हजार तक्रारींमध्ये सरकारी संस्थांची मदत घेण्यात आली.
त्यांनी ६५ हजार एकर जमीन गरीब कुटुंबांना दिली. म्हणूनच रॅमन मॅगसेसे ह्यांना सामान्य जनतेचे राष्ट्रपती म्हटले जायचे.
अशा ह्या रॅमन मॅगसेसे ह्यांचे १६ मार्च १९५७ रोजी Manila येथून परतताना विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युच्या पुढील महिन्यात त्यांच्या स्मृतीस Rockefeller Brothers Fund ट्रस्टच्या वतीने रॅमन मॅगसेसे ह्या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
–
- इंग्रजांनी “मोस्ट डेंजरस मॅन” ठरवलेला हा मराठी क्रांतिकारक आपण साफ विसरलो आहोत
- जाणून घ्या त्या पुरस्काराबद्दल, जो मिळवण्यासाठी प्रत्येक कलाकार आयुष्यभर झटत असतो!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.