Site icon InMarathi

इंडियन आयडॉल मध्ये स्पर्धकावर शारीरिक अत्याचार? स्पर्धकाची धक्कादायक कहाणी…

indian-idol-inmarathi

MSN.com

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

‘इंडियन आयडॉल (Indian Idol)’ हा भारतामधील टीव्हीवर येणारी एक गायन स्पर्धा आहे. ब्रिटनमधील पॉप आयडॉलची भारतीय आवृत्ती असलेल्या इंडियन आयडॉलचा पहिला सिझन ऑक्टोबर २००४ ते मार्च २००५ दरम्यान सोनी टीव्हीवर प्रदर्शित करण्यात आला होता.

तेव्हापासून आजवर इंडियन आयडॉलचे एकूण ९ सिझन तयार करण्यात आले. सध्या ह्याचा १० वा सिझन दर शनिवारी आणि रविवारी प्रदर्शित होत असतो.

मागील १० सिझनपासून ह्या कार्यक्रमामध्ये अनेक स्पर्धक ह्या मंचावर गाणे गात आले आहेत. हा एक रियालिटी शो आहे, ज्यामध्ये बॉलीवूड इंडस्ट्री मधील नामवंत कलाकार ह्यांना जज म्हणून घेतले जाते. जे ह्या स्पर्धकांना त्यांच्या परफॉर्मन्स वरून त्यांना मार्क देतात त्यांची प्रशंसा करतात. अखेरीस प्रेक्षकांच्या वोट वरून ह्या स्पर्धकांपैकी कोण विजेता होणार हे ठरतं.

इंडियन आयडॉलची माजी होस्ट मिनी माथूर हिने एका माजी प्रतिस्पर्धीच्या शोच्या सेट वर मूलभूत सुविधांचा अभाव आणि हिंसाचाराच्या आरोपाच्या ट्वीटला प्रतिसाद दिल्यानंतर एक नवा वाद समोर आला आहे.

 

msn.com

निशांत कौशिक हा २०१२ च्या स्पर्धेत ऑडीशन प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीत पोहोचलेला स्पर्धक आहे. ज्याने ट्विटरवर इंडियन आयडॉल ह्या कार्यक्रमातील काही स्पर्धकांचा कश्याप्रकारे दुरुपयोग केला जातो ह्यावर ट्वीट्सची एक अख्खी मालिकाच लिहिली आहे.

तो लिहितो की,

“इंडियन आयडॉल हा एक मंच आहे जिथे तुमच्या स्वप्नांचा चुराडा होणे निश्चित आहे, येथे तुमच्यातील प्रतिभेला वाव मिळतो ही निव्वळ एक अंधश्रद्धा आहे.”

त्यांनी वर्णन केले की कित्येक तास तास परीक्षेच्या रांगेत उभे राहिले तरी खाद्यपदार्थ, पाणी किंवा टॉयलेट्स न वापरता स्पर्धक उभे राहिले.

त्याने ह्याबाबत वर्णन करताना सांगितले की, येथे येणारे स्पर्धक हे तासंतास रांगेत उभे असतात त्यांना अन्न, पाणी एवढचं नाही तर शौचालायची देखील सोय नसते. जर कधी रांग सोडून जायचं म्हटलं तर त्याची जागा जाणे निश्चित आहे. कधी कधी तर ह्या स्पर्धकांना २४-२४ तास त्या ठिकाणी थांबवावं लागतं.

 

ह्या कार्यक्रमाचे २००४-२००७ पर्यंतचे सिझन होस्ट केलेल्या मिनी माथुर ने ह्यावर भाष्य करत लिहिले की, मला हा मेसेज पाठविल्याबद्दल धन्यवाद. मी २०१२ च्या सीझनमध्ये नव्हते परंतु वास्तविकता आणि टीव्हीवर जे काही बोलले गेले आहे त्यातील बहुतांश गोष्टी मला माहिती आहेत.

मी ह्या शो मधून बाहेर निघण्याचं कारण देखील ह्यापैकीच एक आहे. येथे नेहमी खोटी भावना निर्माण करण्याचं काम केले जाते.

ह्यामध्ये निशांत ह्याने लिहिले की, ऑडीशन हे कधी सुऊ होईल ह्याची काहीही शास्वती नसते. दुपारच्या १ वाजेपर्यंत तर जजेसचा काहीही पत्ता नसतो. पण तरी देखील त्याच मैदानात पुन्हा सर्व स्पर्धकांना एकत्रित केले जाते जिथे मागील वर्षीच्या विजेत्याला बोलविल्या गेले होते.

त्यानंतर निशांतने सांगितले की, कश्याप्रकारे ह्या शोच्या क्रूचे लोक येथे येणाऱ्या स्पर्धकांना जबरदस्ती मागीलवर्षीच्या विजेत्याचे नावं घ्यायला सांगतात. तसेच त्यांच्याकडून “मलाही इंडियन आयडॉल व्हायचंय” असे बोलण्यास प्रवृत्त करतात. ह्यासाठी त्या स्पर्धकांचे कितीतरीवेळा रिटेक घेतले जातात.

आणि जर स्पर्धक आणखी रिटेक देऊ शकत नसेल तर, तेथील सहकारी त्या स्पर्धकासोबत दुर्व्यवहार करतात, त्यांना त्रास देतात, तसेच त्यांना ऑडीशन देता येणार नाही असी धमकीही देतात. त्याला ज्या ऑडीशनचे आश्वासन दिले गेले असते ते देखील होत नाही.

 

ह्याबाबत आणखी वर्णन करताना निशांतने अनेक क्लृप्त्या उघड केल्या, जिथे गर्दीतील काही स्पर्धकांना त्यांच्या दिसण्यावरून निवडण्यात येते, त्यानंतर त्यांना काही लिखित लाईन्स दिल्या जातात ज्या त्यांना कॅमेरासमोर बोलायच्या असतात.

निशांतने एका आंधळ्या व्यक्तीचे उदाहरण देखील दिले आहे, तसेच एका अश्या व्यक्तीचे उदाहरण देखील दिले आहे जो तुटकी चप्पल घालून होता.

पुढे निशांत लिहितो की,

त्यानंतर त्यांना एका खोलीत नेले जाते आणि त्यांना ‘आम्हाला इंडियन आयडॉल व्ह्यायचं’ असं ओरडायला लावले जाते. ह्यामध्ये एका स्पर्धकाला राग आला आणि त्याने उभं होऊन विचारलं की, ऑडीशन्स कुठे होत आहेत, जजेस कुठे आहेत.

त्यानंतर कृ मेम्बर्सपैकी एकाने उठून त्या स्पर्धकाच्या कानशिलात लगावली. तेही हजारो लोकांच्या समोर. एका स्पर्धकाला कानशिलात लगावणे हे देखील ह्या शो मध्ये होते.

ह्यानंतर निशांतने ह्या शोमध्ये जजेस स्पर्धकांचा कशाप्रकारे पाणउतारा करतात ह्याचे देखील वर्णन केले. निशांतने पाहिले की, जजेस त्या स्पर्धकाची खिल्ली उडवत होते ज्याच्या पायात तुटलेली चप्पल होती. त्याने त्या स्पर्धकाला बाहेर येताच त्याच्या डोळ्यात अश्रू बघितले.

 

koimoi.com

“इंडियन आयडॉलचे माझे अवलोकन असे की, येथे दरवर्षी १० किंवा त्याहून कमी अतिशय योग्य सहभागींना ह्या शोमध्ये निवडले जाते, त्यांना ह्या शोद्वारे सुशोभित केले जाते आणि त्यामुळे त्यांना एक नवी ओळख प्राप्त होते.”

“पण ज्या मार्गाने ह्या शोचे जज आणि कृ मेम्बर्स लाखो लोकांची मनं दुखावतात, त्यांचा अनादर करतात, उपहास करतात आणि त्यांचा अपमान करतात, त्यांना स्पर्धा करण्यासाठी अनुकूल वातावरण नाकारतात”

अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

निशांतने जे काही त्याच्या ह्या ट्वीट्स मधून वर्णन केले, त्यावर विश्वास ठेवणे खरंच कठीण आहे. कारण आपण जे टीव्हीवर बघतो ते तर एडीट केलेलं असतं, त्यात तेच दाखवले जाते जे त्यांना दाखवायचं असते.

आज टीव्हीवर अनेक “रियालिटी शो” येतात ज्यामध्ये रियालिटी किती असते हे सर्वांनाच ठावूक आहे. पण त्याबाबत आक्षेप नाही कारण तो त्यांचा जाहिरातीचा, आपल्या चॅनेलला वाढविण्याचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्याचा एक फंडा असतो.

पण त्यासाठी इतर निरपराध स्पर्धक जे मोठ्या आशेने रात्रंदिवस रांगेत उभे राहून ऑडीशनसाठी जातात, त्यांच्यासोबत अशी तुच्छ, अपमानास्पद वागणूक नक्कीच स्वीकार्य नाही…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version