आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
दुर्योधन म्हणजे महाभारतातील सर्वात दुष्ट पात्र ! महाभारत घडण्यासाठी दुर्योधनाचा अहंकार आणि पांडवांप्रती असलेला त्याचा द्वेष कारणीभूत होता हे आपण सर्वजण जाणतोच. अश्या या दुर्योधनाला देवाचे रूप प्राप्त आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही.
आपल्या भारतात दोन टोकांना म्हणजे उत्तरेला आणि दक्षिणेला दुर्योधनाची दोन मंदिरे आहेत आणि तेथील स्थानिक न चुकता दरोरोज दुर्योधनाची पूजा करतात हे विशेष !
एक मंदिर आहे उत्तराखंड राज्यामधील उत्तरकाशी या ठिकाणी !
या भागातील एकूण २२ गावातील स्थानिक दुर्योधनाची पूजा करतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक गावामध्ये दुर्योधनाची आणि इतर कौरवांची छोटी छोटी देऊळे आहेत. या गावांपैकी नेतवाड-जखोल-ओस्ला या गावामध्ये दुर्योधनाचे सर्वात मोठे मंदिर आहे.
गावकऱ्यांची अशी श्रद्धा आहे की दुर्योधन या संपूर्ण भागाला वाईट प्रवृत्तींपासून वाचवतो आणि या भागाचे संरक्षण करतो.
अशी आख्यायिका सांगितली जाते की जेव्हा दुर्योधन मृत्यू पावला तेव्हा येथील स्थानिक इतके रडले, की त्यांच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रुंमधून येथील तामस नदीचा उगम झाला.
या भागात दुर्योधन-कौरव यांच्या नावाने मोठे उत्सव साजरे केले जातात. सर्वात मोठा उत्सव हा वैशाख महिन्यात होतो. या उत्सवावेळी लोक रात्रभर जागरण करतात आणि ज्या माणसाच्या अंगात दुर्योधन येतो तो माणूस रुपन आणि सुपन नद्यांच्या काठी यमराजाने बोलावलेल्या भूतांच्या बैठकीसाठी जातो.
तो भूतांना आणि यमराजाला प्रश्न विचारतो आणि पहाटे पुन्हा मंदिराच्या ठिकाणी परततो. दुर्योधनाला मेंढी अर्पण करण्याची येथे प्रथा आहे असे केल्याने दुर्योधनाची आपल्यावर कृपादृष्टी होते असे येथील गावकऱ्यांचे मत आहे.
दुसरे मंदिर आहे केरळ राज्यात !
केरळ राज्याच्या कोल्लम जिल्ह्यात मलांडा नावाचे एक मंदिर आहे. हे मंदिर दुर्योधन आणि त्याच्या उर्वरित ९९ भावांना म्हणजेच कौरवांना अर्पित आहे. मलांडा मंदिरामध्ये ‘मलायापोप्पम देव’ या नावाने द्रविडी परंपरेने दुर्योधनाची पूजाअर्चा केली जाते.
या भागातील कौरव समाजाचे लोक दुर्योधनाला आपला मूळपुरुष मानतात. दुर्योधनाच्या या मलांडा मंदिरामध्ये भीष्म, द्रोणाचार्य, कर्ण आणि दुशला यांच्याही मूर्ती आढळतात.
मंदिरात येणारे भाविक दुर्योधनाला मद्य, सुपारी, कोंबडा आणि लाल रंगाचे कपडे अर्पण करतात. येथील कौरव समाज मार्च महिन्यात दुर्योधनाच्या नावाने ‘मालाकुडा’ नावाचा सण साजरा करतात. केरळ मधील प्रसिद्ध ‘केत्तूकाझचा’ परंपरा ‘मालाकुडा’ सणापासूनच सुरु झाली आहे.
विविध परंपरांनी नटलेली अशी आहे आपली Incredible भारताची Incredible भूमी !
—
- कौरवांनी याच ठिकाणी पांडवाना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता?!
- आर्य चाणक्यांची ही १५ वाक्यं मनात खोल रुजवा; मग जीवनात अशक्य काहीच नाही!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.